नमस्कार मित्रांनो.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला एक पवित्र महिना मानला जातो. कारण हा महिना महादेवांचा भक्तीचा महिना आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्ती या महिन्यात महादेवांचे मनोभावे पूजन करतात त्यांचे सर्व दुःख व कष्ट दूर होतात.त्यांच्या कोणत्याही कार्यत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि इतर सर्व देवी देवतांचेही कृपा त्यांना प्राप्त होते. श्रावन महिन्यात महादेवाच्या सर्व मंदिरांमध्ये भक्तांचे गर्दी असते. हा भक्तीचा महिना असल्यामुळे या महिन्यात असे काही कार्य सांगितले गेले आहेत.
जे कार्य आपण चुकूनही करू नयेत. या महिन्यात जे व्यक्ती या चुका करतात त्यांच्यावर महादेवांची कृपा कधीच होत नाही आणि नेहमी अडचणींचा सामनाही करावा लागतो. आज मी तुम्हाला श्रद्धा भावनेनेच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही श्रावण महिन्यात कोणते कार्य करू नयेत ते सांगणार आहे. ज्यामुळे आपले मन तर प्रसन्न राहील त्याबरोबरच शरीरही आरोग्य पूर्ण आहे आणि आपल्यावर महादेवाची कृपा ही होईल.
महादेवांचे पूजन करताना पिंडीवर कधीही हळद वाहू नये. कारण हळद ही सौभाग्याचे प्रतिक आहे आणि महादेवांची पिंड ही पुरुष तत्त्वाशी संबंधित आहे. म्हणून हळद पिंडीवर अर्पण न करता खाली पार्वती मातेला अर्पण करावी. श्रावण महिन्यात दुधाचे सेवन अधिक वर्जित केले गेले आहे. कारण श्रावण महिना हा पावसात येतो आणि श्रावणात सगळीकडे हिरवळ आलेली असते.
वातावरण बदलामुळे त्या हिरवळीवर कितीतरी विषारी जीव जंतूंची वाढ झालेली असते आणि तेच गवत गाय व म्हशी खातात आणि त्या गवताबरोबरच ते सर्व विषारी जीवजंतू त्यांच्या पोटात जातात. आणि तोच विषारी अर्क त्यांच्या दुधात उतरतो आणि हेच दूध आपण सेवन केले तर आपली तब्येत बिघडते.आपल्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. जास्त दुधाच्या सेवनाने आपल्याला वाताचा प्रभावही जाणू शकतो.
म्हणून श्रावणात दुधाचे सेवन टाळावे किंवा जर दूध घ्यायचे असेल. तर चांगल्या प्रकारे उकळून त्यातील जीव जंतूंचा आणि विषारी पदार्थांचा नाश करून मगच ते दूध सेवन करावे. श्रावण महिन्यात पालेभाज्यांचेही सेवन करू नये कारण वातावरण बदलामुळे पालेभाज्यांमध्ये वातप्रवृत्ती वाढवणारे घटक जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि त्यांचे सेवन केले तर आपला वाद वाढतो त्याबरोबरच या दिवसांमध्ये कीटक व पतंगांची ही संख्या वाढलेली असते.
त्यांचाही पालेभाज्यांवर प्रादुर्भाव असतो म्हणून श्रावणात पालेभाज्यांचे सेवन करणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. श्रावण महिन्यात वांगे ही खाऊ नये. शास्त्रानुसार चातुर्मासाचे चार महिने वांग्याचे सेवन करू नये याची खरे कारण हे आहे की श्रावणात पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे वांग्यांना खूप कीड लागते वांग्यांमध्ये किडे निर्माण होतात व आपण वांग्याचे सेवन केल्यास आपले आरोग्य बिघडते. श्रावण महिना हा पवित्र आणि शुद्ध महिना असल्याने आपले आचरणही पवित्र व शुद्धच असावे.
वाईट कामे करण्यापासून आपण स्वतःला परावर्तन केले पाहिजे कोणाला त्रास होणार नाही आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करावेत जर हे शक्य नसेल तर तामसिक भोजन म्हणजे मांस मासे कांदे लसूण अशा पदार्थांपासून तरी दूर राहावे. कारण श्रावण महिन्यात आपले पचन क्षमता बंद झालेले असते. कारण पावसाचे वातावरण बर नसते ढगाळ वातावरण असल्याने सूर्य व चंद्राची किरणे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत व त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन लवकर होत नाही.
आपल्या पोटावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. श्रावणात ताजे सकस आणि हलके अन्न खावे.जे आपल्याला पचायलाही सोपे जाते. हे थोड्याशा पूजेनेही संतुष्ट होतात कारण ते भोळे सांभा आहेत. श्रावण महिन्यात दररोज महादेवांच्या पिंडीवर एक तांब्या पाणी व एक चमचाभर दूध अर्पण करावे.
वाटीभर किंवा ग्लासभर दूध महादेवांना अर्पण करू नये. फक्त एक चमचा दूध महादेवांना अर्पण करून बाकीचे दूध एखाद्या गरीब व्यक्तीला द्यावे किंवा श्रावणात दररोज एक दुधाची पुडी एखाद्या गरिबाला द्यावी व एक चमचाभर दूध महादेवांना अर्पण करावे. यामुळे महादेव जास्त प्रसन्न होते आणि आपल्यावर त्यांची कृपा लवकरात लवकर होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.