आज पासून सुरू झाला ‘खरा श्रावण’ बघा अशी करा श्रावणी महिन्याची सुरुवात.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

यंदा गुरुवारपासून म्हणजेच १७ ऑगस्ट पासून खऱ्या श्रावणाला सुरुवात झाली आहे. तर १७ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत नेहमीच श्रावण असणार आहे. सर्व महिन्यांपैकी श्रावण महिना मला अत्यंत प्रिय आहे असं स्वतः भगवान भोलेनाथ यांनी सांगितला आहे अशी कथा आहे.

शिवाय श्रावण महिन्याचे महात्म्य ऐकण्यासारखे आहे या महिन्यात श्रावण नक्षत्र सारखे पौर्णिमा असते म्हणूनच याला श्रावण असेही म्हणतात याचे महात्मे नुसते ऐकून यश मिळवून देणार आहे असे सांगितले जाते म्हणूनच याला श्रावण महिना म्हणतात. चला तर मग श्रावण महिन्याचे महात्म्य जाणून घेऊयात.

यंदा गुरुवारपासून भगवान शंकरांचा पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे ह्या महिन्यात भगवान शंकरांची पवित्र पूजा आराधना उपवास केले जातात त्यामुळे आपल्याला अनेक पटीने फळ प्राप्त होते असे म्हणतात. भगवान शिव स्वतः आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या महिन्यात पृथ्वीवर असतात असे सांगितले जाते म्हणूनच श्रावण हा श्रवण भक्तीचा आणि शिवभक्तीचा महिमा मानला जातो.

चातुर्मासातील श्रावण महिन्यात भगवान शिव पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये वर्णन केलेले आहे याचबरोबर श्रावण महिन्यात शुद्ध अवंतिका पूजन श्रावण सोमवार मंगळागौर पंचमी नागपंचमी श्रावण पोर्णिमा रक्षाबंधन श्रावण वैद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जयंती यांसारख्या अनेक सणांचा आनंद आपल्याला श्रावण महिन्यात घेण्यात येतो.

शिवाय श्रावण महिन्यात आ काली मृत्यू दूर करण्यासाठी आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी आणि सर्व रोग दूर करण्यासाठी सुद्धा विशेष मानला जातो. त्यासाठी विशेष पूजा सुद्धा केली जाते. एका आख्यायिकेनुसार मार्तंड ऋषींचा पुत्र मार्कंडे याने श्रावण महिन्यात दीर्घायुष्यासाठी मोठी तपश्चर्या करून भगवान शिवाची कृपा प्राप्त केली होती.

त्यामुळे मृत्यू देवता यमराज ही मंत्र शक्ती समोर नतमस्तक झाले होते असे म्हणतात. तर श्रावण महिन्यातील उपवासालाही खूप महत्त्व आहे श्रावणात संकल्प घेऊन आपल्या अत्यंत प्रिय वस्तूंचा त्याग करून ब्राह्मणांना दान करावे यामुळे पुण्यप्राप्ती होऊन सुखाचा अनुभव येतो.

तर खऱ्या श्रावणाची उत्सुकता तुम्हालाही होती होती का? तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शिवाला आणि देवी पार्वतीला कशाप्रकारे प्रसन्न करता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *