नमस्कार मित्रांनो.
मंडळी तुम्ही कधी या एका गोष्टीचा विचार केला का की जेव्हा जेव्हा शनी ग्रहाची संबंधित काहीतरी त्रास असतो तेव्हा तेव्हा मारुतीची उपासना करायला सांगितली जाते. पण का शनी ग्रहाची पीडा आहे तर मारुतीची उपासना का करायची. यामागे काय शास्त्र आहे यामागे काही कथा ऐका नक्की याला आधार काय आहे. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.
मंडळी जेव्हा जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये शनी ग्रहाची संबंधित समस्या येतात. कुणाला शनीची साडेसाती असते कुणाला शनीची अडीचकी असते कुणाला दशा महादशा यासारख्या समस्या येतात तेव्हा आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी जाणवू लागतात. होणारी काम थांबतात रखडतात पुढे जातात किंवा मानसिक त्रास होतो.
वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. पण शनी महाराज हे दयाळू आहेत. शनि महाराज आपल्याला संयम शिकवतात. फक्त त्यांची शिकवण्याची पद्धत जरा कडक आहे. जे आपल्याला झेपता झेपत नाही. आणि म्हणूनच मग आपण त्यावर उपाय करायला लागतो. शनी पिढे पासून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीरायाचे पाय धरले जातात.
पण मग मारुतीरायाचे पाय का धरले जातात शनि आणि मारुतीची मंदिरा सुद्धा नेहमी जवळजवळ असतात. किंबहुना काही ठिकाणी तर एकाच मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी शेजारी असतात. शनि आणि मारुती दोघांचंही स्वरूप उग्र आहे. वात हे त्यांच तत्व आहे. दोघांचेही जन्म उष्ण वायूपासून झाले आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनि महाराज आणि मारुतीराय दोघांच्याही ठिकाणी रुद्रांश आहे. शनि हा वैष्णवी शक्तीचा कार्य करीत असलेला रुद्रांश आहे. तर मारुती हा फक्त रुद्रांशच आहे. या दोघांचेही जन्मवार तर एक आहेतच पण इतकाच नाही आवडीनिवडी सुद्धा सारख्या आहेत. त्या दोघांनाही गोडेतेल रुई उडीद इत्यादी वस्तू प्रिय आहेत.
शनि हा मारुतीप्रमाणेच रुजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा आहे. पण ज्याचे त्याच्याशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणे पिडा देतो. शनी आणि मारुती दोघेही वैराग्याची मूर्ती आहे. शनी आणि मारुतीचे उपासक शनिवार पाळतात. आणि एकाच प्रकारचा पूजोपचार दोघांनाही समर्पित करतात. शनि हा सूर्याचा पुत्र आहे.
तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे. म्हणूनच शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीरायाची उपासना करतात. शनि आणि मारुती या दोघांमध्ये इतक साम्य आढळण्याच कारण म्हणजे एक कथा आहे. एक कथा अशी सांगितली जाते की प्रत्यक्ष देवाही देवही ज्याला भिऊन होते अशा शनीची दृष्टी एकदा मारुतीरायाकडे वळली. त्यांनी वज्रदेही मारुतीच्या मस्तकावर आवाहन केल.
शनीच्या अहंकाराचा नाश करण्याच्या हेतूने मारुतीने वानर चेष्टा सुरू केल्या. त्याने पर्वत झाडे उपटून शनीच्या डोक्यावर आपटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शनि शांत झाला आणि त्याने मारुतीची क्षमा मागितली. मारुतीने त्याला काही अटींवर मुक्त केल. तेव्हा शनिने तेल शनिवार या आपल्या गोष्टी मारुतीला दिल्या त्याच्या उपासकांना पीडा न देण्याचं मान्य केल. आणि शनी आणि मारुतीची मैत्री झाली.
शनि महाराज आणि मारुतीराया यांच्या बद्दल आणखीनही एक कथा सांगितली जाते. एकदा मारुती सागर तटावर रामचिंतनात मग्न बसलेले पाहून तिथून जाणाऱ्या शनि महाराजांनी त्यांच्या राशीला जायचं ठरवल. मारुतीने त्यांची खूप समजूत घातली परंतु शनिने ऐकलं नाही. त्याने मारुतीला त्याचे हात धरून ओढल.
तेव्हा क्रोधीत झालेल्या मारुतीरायाने आपले पुच्छ खूप वाढवून शनीला पायापासून गळ्यापर्यंत गुंडाळल. आणि मारुती रामसेतूकडे जोरात पळत गेला. तेव्हा शनि ही त्याच्याबरोबर आपटत आपटत गेला त्याचे सर्वांग ठिपकारले. शेवटी मारुतीरायाने शनि महाराजांना दोन दोन युद्धासाठी आव्हानच दिले. तेव्हा त्यांनी क्षमा मागितली.
मारुतीच्या भक्तांच्या वाट्यात जाणार नाही या अटीवर मारुतीरायांनी शनि महाराजांना क्षमा केली. आणि म्हणूनच शनी महाराजांच्या कृपा टाळण्यासाठी मारुतीची उपासना केली जाते. शनि वरिष्ट असेल तर शनीच्या अनुकूलतेसाठी दर्शनीवारी मारुतीची उपासना पूजा केली जाते. उपवास करून मारुतीला तेल आणि रुईची माळ उडीद वाहतात.
मारुतीरायाला अकरा प्रदक्षिणा घालतात. शनीचे वलय मारुतीच्या पुच्छाप्रमाणे दिसते. आकाशातील शनीची उडी ही मारुतीप्रमाणे फार मोठी आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा शनी पीडा होते तेव्हा तेव्हा मारुतीरायाचे पाय धरायला सांगितले जातात. जय बजरंग बली जय शनि महाराज.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.