या ५ राशी प्रत्येक संकटात धैर्याने काढतात मार्ग तुमची रास कोणती? या ५ राशींचे लोक असतात “धडाकेबाज”

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ५ राशी अशा आहेत ज्यांना आपण अगदी धडाकेबाज म्हणू शकतो. म्हणजे काय कितीही मोठे संकट येऊ द्या त्या बिलकुल धैर्य सोडत नाहीत. आणि त्या संकटातूनही मार्ग काढतात एरवी सुद्धा त्यांच्या कामातून धडाकेबाजपणा जाणवेल पण मग कोणत्या आहेत त्या राशी तुमच्या आजूबाजूला आहेत का?

जर तुम्ही जोडीदार शोधत असाल तर असा धडाकेबाज जोडीदार तुम्हाला आवडत असेल, तर याच पाच राशींपैकी एखादा जोडीदार निवडा चला जाणून घेऊयात कोणते आहेत त्या पाच धडाकेबाज राशी. मंडळी तस तर संकटाचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना शोधूनी पाहे, असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेल आहे.

त्यामुळे प्रत्येकावर संकट आणि दुःख हे येतच राहतात कोणीही असे नाहीये की जे खूप सुखी आहे. फक्त फरक एवढाच आहे की आपण त्या संकटांना तोंड कसे देतो यावरच आपले सुखदुःखा अवलंबून असते. म्हणजे काही लोक असे असतात की संकट आले की घाबरून जातात आणि मुळूमुळू रडत बसतात.

काहीजण असे असतात शांतपणे संयमाने संकटाचा सामना करतात तर काहीजण संकटाच्या छातीवर पाय देऊन उभे राहतात आणि त्या संकटाशी दोन हात करतात अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत परिस्थितीशी झुंज देण्याच्या त्यापैकी पाच राशी अगदी धडाकेबाज म्हटल्या जातात.

१) मेष रास- मेष रास ही मुळातच अग्नी तत्वाची रास आहे. आणि या राशीचा शासक अर्थात या राशीचा स्वामी आहे मंगळ यश या राशीच्या लोकांची साथ कधी सोडत नाही .कारण हे यशाच्या मागे हात धुऊन लागतात. या राशीचे लोक धैर्यवान आणि निर्भय स्वभावाचे असतात. म्हणजे घाबरणे यांना माहीतच नसते कोणत्याही नवीन गोष्टींमध्ये पुढे जाऊन काम करण्यात ते उत्साही असतात.

त्यामुळे ते जीवनातील अडथळ्यात मात करतात. नवीन संधीचा फायदा घेतात कुठल्याही गोष्टीपासून मागे हटत नाहीत यांचा दृढ निश्चय आत्मविश्वास हीच यांच्या यशाची किल्ली असते. फक्त मंगळाच्या प्रभावाने मेष राशींच्या लोकांच्या स्वभावात थोडा उतावळेपणा असतो. उतावळेपणा म्हणजे काय तर अगदी घाईघाईत तडकाफडकी निर्णय घेण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही.

२) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जो त्यांना यशकडे घेऊन जातो सिंह राशींच्या व्यक्तींचा उत्साह उत्कटता स्वतःकडे नवीन ओळख निर्माण करण्याची त्यांची प्रवृत्ती असते त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आणि सामर्थ्य असते जीवनात मोठा विजय प्राप्त करण्यासाठी सिंह राशीचे लोक अगदी सक्षम असतात. त्यांनी थोडासा त्यांच्या युगावर कंट्रोल केला त्यांच्या अहंकारावर कंट्रोल मिळवला तर ते मोठे यश मिळवू शकतात.

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांचा दृढ निश्चय स्वभाव आणि आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाण्याची क्षमता त्यांना जीवनात यश मिळवून देते वृश्चिक राशीच्या लोकांचं कसं असतं माहित आहे का की एकदा त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ही गोष्ट आपल्याला मिळवायची आहे की हे आपले ध्येय आहे.

तर त्या गोष्टीसाठी ते प्रचंड मेहनत करतात चिकाटीने काम करतात आणि हो साम दाम दंड भेद प्रकार हे वापरतात पण स्वतःचे उद्दिष्ट हे साध्य करतात वृश्चिक राशीचे लोक बदलांचा पटकन स्वीकार करतात. आणि प्रतिकूल परिस्थितीत योद्धा म्हणून सक्षम राहतात ते प्रत्येक अडथळ्यावर मात करत जीवनातील परीक्षा जिंकतात.

४) मकर रास- मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे आणि या राशीच्या स्वभाव म्हणजे शिस्तबद्धता हीच गोष्ट त्यांना त्यांच्या यशाच्या दिशेने जाण्यास मदत करते. ध्येयपूर्तीच्या दिशेने दृढ निश्चय आणि प्रगतीच्या मार्गावर हळूहळू का होईना आपण सतत पुढे जात राहणे या लोकांना यश मिळवून देतात. या राशीचे लोक धडाडीचे असले धडाकेबाज असले तरी संयमी असतात. संयमाने आव्हानांना सामोरे जातात आणि अडचणींवर मात करतात.

५) धनु रास- धनु राशीचे लोक आशावादी असतात आणि हाच आशावाद त्यांना यशाची एक एक पायरी चढवत जातो धनु राशीचे लोक बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात आव्हानांना धैर्याने सामोरे जातात एखादी गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता त्यांना विजय मिळवून देण्यातही मदत करते.

मग मंडळी तुमच्याकडेही या राशीचे आजूबाजूला लोक आहेत का? आणि तुमचा असा काही अनुभव आहे का हे वर्णन त्यांच्याशी किती टक्के जुळत आहे कमेंट करून सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *