नागपंचमीचा उपवास का करावा? नागपंचमी प्रत्येक स्त्रियांनी करा अशी प्रार्थना आणि भावाचा उपवास.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

श्रावणी सोमवार मंगळागौर जिवंतिका पूजन नरसिंह पूजन या प्रथाप्रमाणे श्रावणात सणांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेषनाग वासुके पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते.

महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे याचबरोबर श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागा कडे पाहिले जाते. श्रावण महिना भगवान शिवाची उपासना करण्यासाठी उत्तम मानला आहे .यामुळे नागपंचमी आणि नागपंचमी यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याचबरोबर या दिवशी महिला भावाचा उपवास करतात शिवाय नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभही आहे असं सांगण्यात येत चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. श्रावण मास म्हणजे सणांचा महिना असही या मासाच आगळ वैशिष्ट्य आहे.

श्रावणातील पहिला सण नागपंचमी या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्र परिधान करतात अलंकार परिधान करून सुद्धा नागदेवतेची पूजा करतात. आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज असते. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो.

उपवासाच्या दिवशी फराळ केले जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला उपवास सोडला जातो. असे म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते.

म्हणजेच पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा केली जाते. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते, नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध साखर उकडाची पुरणाची दिंड करून त्याला नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषता गव्हाची खीर चण्याची डाळ गुळ यापासून बनलेल्या उकडीची दिंड तयार केली जाते.

याबरोबरच भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयोध्यांचे प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हे उपवास करण्यामागे कारण आहे. या विषयासंबंधात एक प्रचलित कथा आहे. असे सांगतात की सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीचा आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्यश्वरीने अन्न ग्रहण केले नाही.

सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्यांना नाग रूपाला आपला भाऊ मानल त्यावेळी नागदेवतेने वचन दिले जी बहीण माझे भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. याबरोबरच असे म्हणतात की नागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी देव दैवतत्व प्रकट स्वरूपात कार्यरत असतात.

मात्र नागपंचमीच्या दिवशी दैवतत्वे प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक नागाचे पूजन करणे अधिक लाभदायक होते. कारण सजीव रूपात ईश्वरीय तत्व आकृष्ट करण्याची अधिक क्षमता नागपंचमीच्या दिवशी नागात किंवा सापात असते असे म्हणतात. याबरोबरच नागपंचमीच्या दिवशी वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात.

शिवाय नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी देवाला कडकडून आणि भावपूर्ण करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने ईश्वरीय राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी असे सांगण्यात येते. आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उपवास करणे महत्त्वाचे मानले जाते.

याबरोबरच जी स्त्री नागांच्या आकृत्यांचा भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्व प्राप्त होते असेही म्हटले जाते. या विधींमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी नागांचे पूजन करणे म्हणजेच नागदेवतेस प्रसन्न करून घेणे.

नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करणे म्हणजेच सगुण रूपांमध्ये भगवान शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळेच त्यादिवशी वातावरणात आलेल्या शिव लहरी आक्रोष्ट होऊन त्या भाविकाला ३६५ दिवस उपयुक्त ठरतात असे सांगितले जाते. तर नागपंचमीच्या दिवशी उपवास का करतात ह्या मागचे हे शास्त्रीय कारण जर तुम्हाला पटले असेल तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *