घरातील जुन्या देव्हाऱ्याचे काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे. चुकूनही ही चूक करू नका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

देवघर आपल्या घरातली सगळ्यात पवित्र साधा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रसार इथूनच होतो. मनाला शांती इथेच मिळते.अस हे देवघर छान सजवलेल स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण अशातच जर देवघर तुटल किंवा देवघर बदलाची वेळ आली तर किंवा आपल्याला एखाद्या नवीन डिझाईनच देवघर हव असेल तर आपण जुन्या देवघराच काय कराव बर ते कोणाला द्याव. कदाचित विसर्जन कराव चला जाणून घेऊयात.

मंडळी देवघर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. देवघरातला मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपण स्वतःमध्ये साठवून घेत असतो.आपण आपल्या गरजेनुसार छोटा मोठा देवघर घेतो आणि ते आपल्या घरामध्ये स्थापित करतो. पण जेव्हा देवघर बदलाची वेळ येते मग ते कुठल्याही कारणाने असू द्या.

देवघर खराब झाला असेल किंवा आता आपण नवीन घर घेतलय आणि आपल्यला देवघर पण नवीन घेयचय पा देवघराची डिझाईन आपल्याला नवीन नवीन डिजाईनचे घर घ्यायचे आहे. अशा सारखे अनेक कारणे असू शकतात. पण कुठल्या का कारणाने देवघर बदलायची वेळ आली तर पहिला प्रश्न समोर येतो की आपण जुन्या देवघराचा आता काय करायच.

ते कुणाला द्याव का ते विकाव का किंवा ते विसर्जन कराव का असा प्रश्न सर्रास पडतो आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून आपण करणार आहोत. ज्योतिषांच्या मते घरात ठेवलेल. देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेला असत जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो.तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरात राहते. त्याचवेळी जेव्हा आपण कोणाला विकण्याचा किंवा देण्याचा विचार करता.

तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्या देवघरा सोबत जाते. तर तुम्हाला तुमचा देवघर कुणाला द्यायच असेल किंवा देण्याचा विचार तुम्ही करत असाल विकण्याचा विचार करत असाल दान करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जुन्या मंदिरातन सगळे देवी देवता चित्र मूर्ती काढल्यानंतर नवीन देवघराची घरामध्ये स्थापना करा.

त्यामध्ये सर्व देवतांची पूजा करा. नवीन देवघरामध्ये देवतांची स्थापना करताना मंत्र उच्चाराने विधिवत स्थापना करून घ्यावी आणि मग ते देवघर तुम्ही कोणालाही देऊ शकता.करण तुमच्या घरात आता नवीन देवघराची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर कोणत्या दिवशी नवीन देवघर घरामध्ये ठेवाव सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस नवीन देवघर घरात स्थापन करण्यासाठी उत्तम मानले जातात.

मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी मात्र नवीन देवघराची स्थापना करण्यास मनाई आहे. देवघर कोणत्या दिशेला असाव हा की तुमचा एक प्रश्न असतो. घरामध्ये देवघरासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकतात. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात.

देवघर ईशान्य दिशेला जातात व कारण या दिशेला देवतांचा वास असतो. मित्रांनो लक्षात घ्या की देवघर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा घ्या पण त्यामध्ये देवतांच्या चित्र मूर्ती देवतांच्या चित्रमुर्तींची गर्दी करू नये. खूप वेगवेगळ्या प्रकारचे देवानंद देवघरात मांडू नये. प्रमुख देवता असाव्यात कुलदेवता असाव्यात त्यामुळे काय होत कुलदेवत्यांच्या व्यवस्थित पूजा होते.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देवघरात आणून ठेवले तर तुम्हाला त्यांच्या पूजेची पद्धत माहीत नसेल तर त्या देवतांची हेळसांड होते आणि मग आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे कुठलीही देवता घरात स्थापन करण्यापूर्वी त्या देवतेच्या पूजेचा विधी आणि त्या देवतेचे गुणधर्म कुळाचार माहित करून घ्यावे आणि तेवढेच देवी देवता आपल्या घरामध्ये ठेवावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *