अधिक मास अमावस्या शंकराला वाह या ३ गोष्टी आणि करा प्रसन्न. देवही होतील तुमच्यावर मेहरबान.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अमावस्या ही तिथी खरंतर खूप खास असते काही गोष्टी आवर्जून कराव्यात आणि काही गोष्टी चुकूनही करू नये असे सांगितले जाते. त्यातही ती अमावस्या असेल अधिक ची अमावस्या तर विचारायलानको. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी किंवा तुमच्यावर कुठलंही संकट असेल तर दूर व्हावे म्हणून एक उपाय करू शकता. काय उपाय करायचा आहे चला जाणून घेऊयात .

अधिक महिना खर तर खूप खास असतो या महिन्यांमध्ये केलेल्या साधनेचे फळ अधिक पटीने जास्त मिळते पण त्यातही अधिक महिन्याचे अमावस्या खूप खास आहे. या अमावस्येला काही गोष्टी तुम्ही आवर्जून कराच तुमच्यावर जर एखाद्या संकट आलेला असेल तर ते आर्थिक असुद्यात शारीरिक असुद्यात किंवा मानसिक असू द्या.

त्या संकटातून सुद्धा तुम्ही बाहेर पडाल आणि जर कुठल्याही संकट नसेल तर येणाऱ्या संकटांपासून तुमच्या संरक्षण होईल. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल त्याचबरोबर तुमच्या मनालाही शांती मिळेल. पण करायचं काय? महादेवांना भोलेनाथांना तीन गोष्टी अर्पण करायचे आहेत.

तसं तर अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. पण अधिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाची पूजा करा आणि त्यांना तीन गोष्टी अर्पण करा आणि त्यामुळे निश्चितच लाभ होणार आहे पण लाभ कशा प्रकारचा असणार आहे तेही आता आपण जाणून घेऊयात. अमावस्येच्या दिवशी स्नान दान व नैवेद्य यांसारखे दान करून भाविकांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

त्याचबरोबर जीवनात येणारे अनेक प्रकारच्या संकटांपासून तुमची सुटका होते. अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोष निवारण्यासाठी सुद्धा पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्या दिवशी आवर्जून करावी अशी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे. त्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा लाभ होतो. ऑगस्ट महिन्यातली अमावस्या आहे १५ ऑगस्टला आणि या दिवशी भगवान शिवशंकरांना जलाभिषेक अवश्य करावा.

त्यांना शमीची पाने व बेलपत्र पण करावे असे केल्याने जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेलच पण त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळेल. कनेराच फुल अवश्य अर्पण करा त्यामुळे शारीरिक त्रासातून मुक्ती मिळते एखादा आजार असेल जर तो बरा होत नसेल तर मुक्तच मिळत.

नसेल कशातूनच आराम मिळत नसेल तर तुम्ही काय करा अमावस्येच्या दिवशी कनेराचा फुल भगवान शिवशंकरांना अर्पण करा. या दिवशी पूर्ण भक्ती भवाने महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला पितृदोषातून मिळते. पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यामध्ये मावशीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय अधिक लाभदायक ठरतात.

या दिवशी पहाटे उठून स्नान करून नदीत पिंडदान केल्याने सुद्धा पितरांना मोक्ष प्राप्ती होते. अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने सुद्धा पित रांची शांती होते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *