भावासाठी राखी खरेदी करताय? एखादा बघा मगच खरेदीला लागा. ही चूक अजिबात करू नका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

रक्षाबंधनापूर्वी तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्याचा विचार करताय का करत असाल तर त्याआधी काही गोष्टी जाणून घेण तुमच्यासाठी गरजेचे आहे बर का रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात आणि ही सुंदर राखी खरेदी करताना अनेकदा बहिणीकडून काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली जात नाही.

त्याचा परिणाम अनेकदा आपल्यालाही जाणवतो.म्हणूनच हा लेखा एखादा वाचा. जेणेकरून राखी विकत घेताना तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा चला तर मग लेखाला सुरुवात करूया. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन ३१ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.

वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या हल्ली बाजारात पाहायला मिळतात. अशातच आपल्या भावासाठी राखी विकत घेण हे बहिणीसाठी अत्यंत हळवा कोपरा असतो. त्यामुळेच राखी विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणे ही अत्यंत महत्त्वाच असत. राखी खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावरची राखी बांधत आहात. त्यावर कोणताही अशुभ चिन्ह नसाव याची काळजी घ्या.

आजकाल बाजारात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि कार्टून राख्या उपलब्ध आहेत. या दिसायला अतिशय आकर्षक वाटतात पण त्यावर काही अशुभ चिन्ह सुद्धा बनवली जातात.अशा राख्या खरेदी करून त्याला तुमच्या भावाच्या मनगटावर बांधताना तुम्ही त्याच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकता. त्यामुळे आपल्या प्रिय भावासाठी राखी खरेदी करताना.

त्या राखीवर कोणतेही अशुभ चिन्ह नाही ना याची काळजी नक्की घ्या. अशुभ चिन्ह असलेली राखी कधीच खरेदी करू नका. याबरोबरच भावाच्या मनगटावर अशी राखी बांधू नका. ज्यावर देवी देवतांचे चित्र असेल देवी देवतांची चित्र असलेली राखी खरेदी करू नये. कारण मनगटावर देवतेची चित्र असलेली राखी बांधणे हा देवतेचा अपमान मानला जातो. याशिवाय भावाच्या मनगटावर ही राखी जास्त वेळ बांधल्याने ती अपवित्र होते.

अशावेळी चुकूनही भावाच्या मनगटावर अशा देवी देवतांची चित्र असलेली राखी बांधूने अस सांगण्यात येतात. याशिवाय तुटलेली किंवा भंगलेली राखी सुद्धा वापरू नये. अस केल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. राखी बांधण्यापूर्वी आपली राखी कोणत्याही प्रकारे तुटू नये याची नीट तपासणी करून घ्यावी.

जर तुम्ही चुकूनही अशी राखी खरेदी केली असेल तर ती तुमच्या भावाच्या मनगटावर अजिबात बांधू नका तुटलेली राखी अशुभ मानली जाते. याबरोबरच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या सुख-समृद्धीची कामना करतात पवित्र राखी नेहमी भावाला बांधली जाते. त्यामुळे त्यात काळा रंगाचा वापर असेल अशी राखी बांधणे टाळाव.

याशिवाय भावाच्या मनगटावर कळ्या रंगाची राखी कधीही बांधू नये कारण हिंदू धर्मात काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक असल्यास म्हटले गेलेय.अशा परिस्थितीत जर एखाद्या बहिणीने आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी बांधली. तर तिला तिच्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो अस म्हणतात.

तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर रक्षा सूत्र अर्थात राखी बांधते आणि भाऊ तिला जन्मभर रक्षण करण्याचे वचन देतो तर असा हा हिंदू धर्मातला पवित्र सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आणि हेच रक्षा सूत्र म्हणजेच राखी खरेदी करताना तुम्ही अशा प्रकारची काळजी नक्की घ्या चुकूनही अशा प्रकारच्या राहत्या खरेदी करू नका ज्यामुळे त्याची परिणाम तुम्हाला किंवा तुमच्या भावाला भोगावे लागू शकतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *