नमस्कार मित्रांनो.
महाभारत हा हिंदू सभ्यता आणि हिंदू संस्कृतीचा पवित्र ग्रंथ याचा अधर्माची धर्माच्या लढ्यावर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केलेला आहे तो उपदेश म्हणजेच गीता हिंदू धर्मात गीतेचा महत्व अनन्यसाधारण आहे.
श्रीकृष्णांना अर्जुनाला केलेला हा उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्याची माहिती करून देतात त्यानुसार काय सांगतात श्रीकृष्ण आणि कोणत्या स्थितीत व्यक्तीने वचन देऊ नये या संबंधित माहिती चला जाणून.
श्रीमद् भागवत गीते श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जीवनात कोणत्याही प्रकारची कठीण परिस्थिती येऊ नये म्हणून या तीन मंत्राचे नेहमी स्मरण करावे. आनंदात कोणालाही वचन देऊ नये रागात उत्तर देऊ नये. आणि दुःखात कोणताही निर्णय घेऊ नये. सत्याच्या मार्गावर कधीही माणसाने साथ सोडू नये. भलेही सत्याचा मार्ग कितीही काटेरी असला तरी शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो.
असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. भगवान श्रीकृष्ण गीते मध्ये सांगत आहेत की, जो माणूस सरळ आणि स्पष्ट बोलतो त्याला कठोर शब्द असू शकतात परंतु अशी व्यक्ती कधीही कोणाचीही फसवणूक करत नाही. म्हणूनच स्पष्टपणे बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
याबरोबरच श्रीमद् भागवत गीतेमध्ये अस लिहिल आहे की, जर एखाद्याची विचारसरणी चांगली असेल तर इतर लोक त्याला आपोआप आवडू लागतात. जर तुमचा हेतू सरळ असेल तर सगळी कामे आपोआप होतात. म्हणूनच इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे.
आयुष्यात अनेक वेळा आपण अनेक अडचणींमधून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीतरी आपल्याला साथ देत असल्याचा आपल्याला जाणवते. त्यात अदृश्य शक्तीचं नाव आहे देव. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, राग येणे वाईट आहे परंतु राग जिथे आवश्यक आहे तिथे दाखवला पाहिजे. अन्यथा आपण काहीतरी चुकीच करत आहे हे लोकांना कधीच कळणार नाही.
अशा परिस्थितीत नेहमीच तो तुम्हाला तुमच्याशी समान वागणूक देईल. गीतेत म्हटलं आहे की सत्य कधीच असा दावा करत नाही की मी सत्य आहे पण असं त्या नेहमी दावा करते की मी सत्य आहे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते की त्याला सगळे चांगले वाटते. त्यासाठी कधीही पराभवाची भीती बाळगू नये. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव विसरून टाकू शकतो.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तुत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपोआप आदराने झुकतात. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, आपले भाग्य हे आपल्या भूतकाळातील परिणामांचा सत्य आहे. त्याचप्रमाणे आज आपण करत असलेली कृती आपला उद्या ठरवेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.