६७ दिवस महालक्ष्मी योग,५ राशींना राजयोग वरदान पद-पैसा प्रतिष्ठा-वाढ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी येणारे ६७ दिवस अस काही ग्रहमान तयार होत आहे की, ज्याचा लाभ ५ राशींना होणार आहे महालक्ष्मी योगही तयार होत आहे. आणि त्याच योगामुळे या पाच राशींच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येईल. कोणत्या आहेत त्या राशी आणि इतर राशींवरती कोणता परिणाम होणार आहे चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अनुकूल म्हणावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा काय चांगला आहेच विचारशक्ती आकलन शक्ती त्यांची वाढणार आहे. नोकरदारांना सुद्धा अनेक चांगल्या संधी या काळात मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुकही होऊ शकते. व्यवसाय विस्तार करायचा विचार करत असाल तर हा काळ नक्कीच चांगला आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशींच्या लोकांसाठी येणारा काळ हा संभाषणात सुस्पष्टता देणारा असेल, बोलण्यात सकारात्मकता दिसून येईल इतरांना आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बौद्धिक स्तरावर विकास होईल कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काय चांगला जाणारच आहे. प्रेम संबंधात आहात का तुमच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. शिक्षण उद्योग विक्री आणि उत्पन्न या क्षेत्राशी संबंधित हा काळ शुभ म्हणावा लागेल.

३) मिथुन रास- मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काळ बुधाचा प्रभाव दिसून येईल आरोग्य चांगले राहील व्यायाम आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरेल. फिरायला जाण्याचे प्लॅन तुम्ही बनवू शकता काम पूर्ण करण्यासाठी भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखक साहित्यिक आणि संपादक यांच्यासाठी हा काळ भाग्याचा म्हणावा लागेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे.

४) कर्क रास- कर्क राशीला मात्र थोडासा सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो कारण खर्चात अचानक वाढ होईल समस्या देखील उद्भवू शकतात. हे सगळं जरी खरं असलं तरी विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ अनुकूल राहील कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच म्हणावा लागेल. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयामुळे फायदा नक्कीच होईल. या काळात गुंतवणूक करणे मात्र टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते आर्थिक बाबतीमध्ये कर्क राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.

५) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा काळ धनलाभदायक म्हणावा लागेल कारण आर्थिक स्थिती मजबूत झालेली असेल, पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा लाभ तुम्हाला आत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमची हिम्मतही वाढणार आहे मोठी जोखीम उचलण्याची आणि एखाद्या संधीचं सोनं करण्याची संधी सोडू नका. आरोग्याच्या बाबतीत मात्र गाफीलही राहू नका

६) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ परिणामदायक ठरू शकेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तर हा काळ चांगला आहेच. अनावश्यक बाबतीत खर्च मात्र तुम्हाला टाळावा लागेल उत्पन्न आणि खर्चात संतुलन न राहिल्याने बजेट बिघडू शकते म्हणून ही सावधगिरी बाळगायची आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी मात्र अनेक शुभ संधी घेऊन येईल परदेश प्रवासातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज तुम्हालाही आहे.

७) तुळ रास- तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ विशेष लाभदायक म्हणावा लागेल कारण नोकरदारांना तर हा काळ भाग्यवान ठरू शकेल कमी कष्ट करून उत्पन्न वाढवू शकाल कला आणि सांस्कृतिक गोष्टींची निगडित लोकांसाठी तर हा काळ शुभच म्हणावा लागेल झटपट पैसे कमावण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांमध्ये मात्र सहभागी होऊ नका.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा काळ अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी त्यांचा प्रभाव पडेल तुमच्या प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो कारण की अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तुम्हाला जॉब प्रोफाइल मध्ये काही बदल करावे लागू शकतात मित्रांच्या मदतीने तुम्हाला एका चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मात्र मिळू शकते नियोजनानुसार काम करून व्यवसायात चांगला नफा मिळवण्याची शक्यता पैशांच्या बाबतीत मात्र सावध राहण्याची गरज आहे .

९) धनु रास- धनु राशीच्या लोकांना येणारा काळ सकारात्मक आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवास कराल तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं वरिष्ठ आणि बॉस यांचे चांगले सहकार्य मिळेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष लाभ होण्याची शक्यता आहे एखाद्या मालमत्तेत किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा तुम्ही निर्णय या काळात घेऊ शकता.

१०) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींसाठी हा काळा मात्र संमिश्र म्हणावा लागेल कारण त्यांना आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. आणि या काळामध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल, तर मात्र तुमच्यासाठी काही चांगल्या संधी असतील. मेहनत करावी लागेल पण नशिबाची पूर्ण साथ ही मिळेल.

११) कुंभ रास- कुंभ राशींच्या व्यक्ती ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे जे प्रेमविवाहाच्या विचारात आहेत तुम्हाला काही काळ प्रतीक्षा अजून करावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी अधिक चांगली होईल सहकारी वर्ग अधिकारी वर्ग खुल्या मनाने तुमचे प्रशंसा करतील. व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी देखील हा काळ लाभदायक आहे.

१२) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तींनी जरा शांत राहण्याची गरज आहे कारण जोडीदाराच्या काही वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात त्यामुळे तिथे देखील तुम्हाला सावध राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचे राजकारण त्यापासून तुम्ही दूर राहा.

आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे पैसा हा विचार करून खर्च करा. जमिनीत गुंतवणूक करणे सध्यातरी टाळा. कर्ज घेण्यासाठी हा काळ अनुकूल नाही मानसिक तणाव राहू शकेल आणि त्यासाठी नियमित ध्यान करा योग करा त्याने तुम्हाला मनशांती मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *