घरात हनुमानाचा कसा फोटो लावावा? जाणून घ्या सविस्तर येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ज्या घरामध्ये बजरंगबलीचा चित्र असतं त्या घरामध्ये मंगळ शनी पितृदोष यांचा प्रभाव कमी असतो. आणि प्रत्येक प्रकारचा संकट टळक हनुमानजींचे चित्र घरात लावण्यासाठी काही खास नियम आहेत. तसंच हनुमानजीनचे चित्र घरात लावण चांगलही मानल जात. पण ते कस लावाव कोणत्या दिशेला लावावं त्याचबरोबर बजरंगबलीचा कोणत्या प्रकारचे चित्र लावल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ होतो. चला जाणून घेऊया.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हनुमानजींचे चित्र घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे संकट आणि अडथळे दूर होतात. चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरापासून दूर राहते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये हनुमानाचे चित्र लावण्यासाठी काही नियम सांगितलेत. वास्तुशास्त्रानुसार बजरंग बलीचे चित्र नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावाव.

बसलेल्या स्थितीतील हे चित्र लाल रंगाचे असावे. हनुमानजींचे दक्षिणा भिमुख चित्र अधिक शुभ मानले जाते. कारण हनुमानजींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखवला आहे. हनुमानजींचे चित्र किंवा फोटो लावल्यावर दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती या चित्राकडे पाहून थांबते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे घरात सुख समृद्धी येथे अचानक येणारी संकटे टळतात.

त्याचबरोबर मंगळ हा ग्रह तुमच्यासाठी अशुभ असेल तर त्याचेही शुभ परिणाम मिळू लागतात. तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद मिळू लागेल. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य ही चांगले राहते. सगळ्यात महत्त्वाचं मंगळ दोष दूर होतो. आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो अशा पद्धतीने लावला असेल की त्यांचं मुख उत्तरे कडे झालेला असेल.

तर या फोटोचा काय परिणाम होतो किंवा या चित्राचा काय परिणाम होतो. याला उत्तरामुखी हनुमानजींचे रूप मानलं जात. आणि या रूपाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावण्याचा फायदा काय? वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पंचमुखी आनुमानाची मूर्ती असते त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. आणि धनात वृद्धी होते.

इमारतीमध्ये पाण्याचा स्त्रोत चुकीच्या दिशेला असेल तर या वास्तुदोषमुळे कुटुंबात शत्रू अडथळे रोग आणि विकृष्ट निर्माण होते. हा दोष दूर करण्यासाठी त्या वास्तुत असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावायला सांगितले जाते. पण हनुमानाचे मुख मात्र त्या जलस्रोताकडे आहे अशा पद्धतीने ते लावाव. पंचमुखी हनुमानाचे चित्र तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरही लावू शकतात. अशा ठिकाणी लावू शकता जिथे ते सर्वांना दिसेल.

अस केल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. आता बघूया राम दरबार असलेले चित्र घरात लावण्याचा फायदा. तुमच्या घरी पाहुणे येऊन बसतील अशा दिवाणखान्यात श्रीराम दरबाराचा फोटो लावावा. त्यामध्ये हनुमानजी भगवान श्री रामजींच्या चरणी बसलेले आहेत. याशिवाय दिवाणखान्यात अर्थात हॉलमध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्रही तुम्ही लावू शकता.

तुम्ही हनुमान चित्रही घरात लावू शकता. राम दरबाराचे चित्र घरात लावल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. जर तुम्ही घरामध्ये हनुमानाचे पर्वत घेऊन जातानाच किंवा पर्वत उचलताना चित्र जर लावले तर तुमच्या धैर्य विश्वास यामध्ये वाढ होईल. जबाबदारीचे भावना विकसित होईल.

कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरणार नाही. प्रत्येक समस्येला तुम्ही धैर्याने सामोरे जाल. वीर हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांना धैर्य प्राप्त होते. आता जर तुम्ही घरामध्ये उडणारे हनुमंताचे चित्र लावलं तर तुमची प्रगती होते. तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सगळेच अडथळे दूर होतात. तुम्हाला उत्साह वाटू लागेल आणि यशाच्या मार्गावर तुम्ही सतत वाटचाल करत आहात.

आता जर तुम्ही घरामध्ये असं चित्र लावलं की श्रीरामाच्या भजनामध्ये हनुमान मग्न आहेत. आणि जर हे चित्र तुमच्या मध्ये भक्तीचा विकास करेल. तुमची भक्ती आणि तुमची श्रद्धा हेच तुमच्या जीवनाचा आधार आहे. त्यामुळे एकाग्रता आणि शक्ती देखील वाढेल.

आता जर घरात आपण असा फोटो लावला की हनुमान आणि राम एकमेकांना मिठी मारत आहेत. तर हे चित्रात अद्भुत आहे. जे कुटुंबात एकता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करतात. कुटुंबातीलक सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाचे भावना निर्माण होते. डोळे बंद करून ध्यानस्थ हनुमानजींच चित्र लावलं तर त्यामुळे मनाला शांती मिळते.

ध्यानाचाही विकास होतो त्याचबरोबर असे चित्र लावल्याने मोक्षाची इच्छा आपल्या मनात निर्माण होते. संकट मोचन हनुमान आहेत हे विसरू नका. उजव्या गुडघ्यावर बसून आशीर्वाद देतानाचा हनुमानजींचे चित्र तुम्ही पाहिलायका त्यांना संकट मोचन हनुमान असे म्हणतात.

घराच्या दक्षिण दिशेला हे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारचे संकट आपल्या घरावर येत नाही. मग मंडळी आता तुमच्या घरात हनुमानाचे कोणत्या प्रकारचे चित्र आहे त्यावरनं तुमचा अनुभव कसा आहे हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सुद्धा आनुमानाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *