अधिक महिन्यात रोज “हे” स्तोत्र ऐका, लाभ होणारच म्हणजे होणारच

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,

अधिक मास १८ जुलैपासून सुरू झालेला आहे आणि या अधिक मासात जास्तीत जास्त पुण्य मिळवायचा असेल, किंवा अशी एखादी प्रभावी सेवा करायची असेल ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल तर त्यासाठी एक स्तोत्र आहे.

हे स्तोत्र तुम्ही रोज म्हटलं किंवा रोज जरी शक्य झाले नाही तर दिवसाआड म्हणा किंवा अधिकमासाच्या विशिष्ट दिवशी जसा चतुर्थी असेल एकादशी असेल अशा काही खास दिवशी सुद्धा म्हटलात तरीही त्या तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. कोणता आहे ते स्तोत्र चला जाणून घेऊयात.

मित्रांनो १८ जुलैपासून अधिक श्रावण सुरू झाला. आणि तो असणारे १७ऑगस्ट पर्यंत त्यानंतर मुख्य श्रावणा अर्थात निज श्रावण सुरू होईल. या अधिक मासालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची भक्ती केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते.

अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात उपासना म्हणून महिनाभर रोज न चुकता एक स्तोत्र म्हणा किंवा कमीत कमी ऐका असे सांगितले जाते आणि ते स्तोत्र आहे श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकताना म्हणताना भगवान श्री हरी विष्णू विष्णूंची स्तुती कानावर पडून महिनाभर श्रवण भक्ती होऊ शकते. विष्णुसहस्रनाम हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे.

ते नुसत म्हणून उपयोग नाही त्याचे अचूक उच्चारही झाले पाहिजेत. म्हणून तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर महिनाभर तुम्ही श्रवणाचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही दिवंगत गायिका सुब्बालक्ष्मी यांचं नाव ऐकलंच असेल, त्यांनी फक्त शास्त्रीय संगीतातच नाही तर अध्यात्मिक संगीतात स्तोत्रपठण करून सिंहाचा वाटा उचललेला आहे.

म्हणूनच तर आजही अनेक घरांमध्ये सकाळ ची सुरुवात त्यांनी गायलेल्या व्यंकटेश्वर या स्तोत्राने होते. अधिक मासात सुद्धा आपल्या नित्य उपासनेला जोड द्यायचे आहे ती विष्णू सहस्त्रनाम ऐकण्याची. मोजून २८मिनिटात हे स्तोत्र ऐकून पूर्ण होते. त्यामुळे सकाळी आपले आवरून कामासाठी बाहेर पडताना हे स्तोत्र आरामात ऐकून होईल.

युट्युब वर या स्तोत्राची लिंक सहज उपलब्ध आहे. आता बघुयात अधिक मासा मध्ये या स्तोत्राचे ऐकल्याचे काय काय फायदे आहेत. आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांमधून मार्ग मिळतो. गर्भधारणे संबंधित समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात.

ग्रह दशा कुठलीही असो, विष्णू सहस्त्रनामाचा पठण केल्याने मनःशांती लाभते. आणि भय कमी होते. आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल आणि घरामध्ये वादविवाद होत असतील तर, विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण करावे निश्चितच त्याचा लाभ होतो. विष्णुसहस्रनामाचे पठण कधी आणि कसे करावे.

हे स्तोत्र नित्य उपासनेत म्हटल्यास अधिक लाभ होतो. पनीरवी शक्य झाले नसले तरीसुद्धा अधिकमासात हे स्तोत्र आवर्जून ऐकावे. अधिक मासात १०८वेळा आहे स्तोत्र म्हणणाऱ्यास किंवा याचा संकल्प केल्यास त्याचा अधिक लाभ होतो असा अनेकांचा अनुभव आहे. सत्यनारायणाच्या पूजेत सुद्धा हे स्तोत्र म्हटले जाते.

म्हणून तर अधिक महिन्यांमध्ये आता तर अधिक श्रावण मध्ये जर तुम्ही सत्यनारायण करणार असाल तर हे स्तोत्र आवर्जून म्हणा किंवा कमीत कमी ऐका. आता जर एखादा स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर ते म्हणायला कसे शिकायचे तर आज इंटरनेटवर सगळी स्तोत्र उपलब्ध आहेत.

सुरुवातीला ती स्तोत्र लक्ष देऊन ऐका काही दिवस फक्त रोज ऐकायचे काम करा. आणि त्यानंतर त्या शब्दांवरून नजर फिरवा आणि कानांनी ऐका हळूहळू तुम्हाला त्या शब्दांचे उच्चार चांगले जमू लागतील. आणि मग तुम्ही ते स्तोत्र म्हणू शकाल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *