अधिकातील महिन्याची पहिली ‘विनायक चतुर्थी’ पूजा मुहूर्त रवियोग आणि भद्रकाळ एकाच दिवशी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अधिक महिन्याची पहिली चतुर्थी आहे २१ जुलैला अधिक श्रावण महिन्यात पहिली चतुर्थी असते अधिक महिन्याची आणि दुसरी श्रावण महिन्याचे असते. विनायक चतुर्थीला रवी योग तयार होत आहे. मात्र या दिवशी भद्रकालाही आहे. श्रावण अधिक महिन्यातील ही चतुर्थी तब्बल १९ वर्षानंतर आल्यामुळे यंदाच्या अधिक महिन्यातील विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाला आहे.

अधिक महिन्याची पहिली विनायक चतुर्थी कधी आहे. तिचा पूजा मुहूर्त काय असेल रवी योग कधी आहे आणि भद्रकाल कधी असेल चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. अधिक श्रावण महिन्यात आलेल्या विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व म्हणजे चतुर्थी तिथीचे स्वामी आहेत श्री गणेश तर अधिक महास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्रावण हा महादेवाचा आवडता महिना अशा स्थितीत श्रावण महिन्यातील चतुर्थी तिथीला प्रयत्न करणाऱ्या या तिन्ही देवतांच्या आशीर्वादाने अशक्य कामे शक्य होतील.

अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. त्यामुळेच या महिन्यातील प्रत्येक व्रत विशेष महत्त्व आहे. शिवाय असे हे मानले जाते की अधिकमासात दिलेल्या धार्मिक कार्याचा इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनापेक्षा अधिक पटीने फळ मिळत.
पुराणानुसार जे विनायक चतुर्थीला जे गणेशाची पूजा करतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

शिवाय संतान प्राप्तीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानल जात आणि विनायक चतुर्थीच्या प्रभावाने प्रत्येक संकट आणि अडथळे सुद्धा दूर होतात. तर अधिक चतुर्थीचा मुहूर्त कधी जाणून घेऊयात. अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी २१ जुलै रोजी सकाळी ०६:५८ मिनिटापासून सुरू होईल ही स्थिती २२ जुलै ०९:२६ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीच्या आधारे शुक्रवार दिनांक २१ जुलै रोजी अधिक श्रावणातील विनायक चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी उपवास ठेवून श्री गणेशाची पूजा करावी असे सांगितले जाते.

आता अधिक श्रावणातील पूजा मुहूर्त काय असेल २१ जुलै रोजी सकाळी ११:०५ मी पासून ते दुपारी ०१:५० मिनिटांपर्यंत असेल. या शुभकाळात लाभ उन्नती मुहूर्त आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्त ही आहे. चतुर्थीच्या दिवशी

लाभ उन्नती मुहूर्त: सकाळी १०:४४मि पासून असेल तो दुपारी १२:२७ मि पर्यंत असेल.

अमृत सर्वोत्तम मुहूर्त : दुपारी १२:२७ मि पासून ते दुपारी २:१० मिनिटांपर्यंत असणार आहे.

आता अधिक श्रावण चतुर्थीला रवी योग सुद्धा जुळून येत आहे.तर रवी युगातील श्रावण अधिक चतुर्थी अधिक श्रावणातील पहिली चतुर्थी रवी योगात आहे.

रवियोग : २१ जुलै २०२३ दुपारी ०१:५८ मि पासून रवी योग सुरू होत आहे. तर हा योग रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी पहाटे ०५:३७ मि पर्यंत असेल. रवी योग हा शुभ योग आहे. या योगामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते.विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्राकालही आहे. पण हे भद्रा पूजेच्या कालांतराने होत आहे.

विनायक चतुर्थी भद्राकाळ : २१ जुलै २०२३रोजी
रात्री ०८:१२ मि पासून तो दुसऱ्या दिवशी २२ जुलै २०२३ रोजी पहाटे ०५:३७ मि पर्यंत असेल. या बदलाचा वास पृथ्वीवर आहे. या भद्रकाळात कोणत्याही शुभ कार्य करू नये. आता विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय असेल.

चंद्रोदय : २१ जुलै २०२३ सकाळी ८:२९ मि पासून आणि चंद्रास्त होईल रात्री ०९:४५ मिटांनी

विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा चुकूनही करू नये. अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थी ची पूजा विधी सुद्धा जाणून घेऊया. अधिकमासात विनायक चतुर्थीला दुपारी पूर्वेकडे तोंड करून १०८ दुर्वाच्या पानांनी श्री गणेशाची पूजा करावी. शिवाय गाईच्या तुपाचा दिवा लावून ‘वक्रतुण्डाय हुं’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

नाम जप केल्यावर या दुर्वाच्या पानांनी पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या पाणी घरभर शिंपडाव. अस मानल जात की यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात समृद्धी नांदते. शिवाय अधिक श्रावण मासात विनायक चतुर्थी व्रतामध्ये गणेशाची पूजा विधीवत केली असता बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व काम शुभ आणि सफल होतात. कामातील अडथळे सुद्धा दूर होतात आणि श्री गणेशाच्या कृपेने माणसाच्या जीवनात मी समृद्धी नांदते. अशी धार्मिक श्रद्धा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *