बुधाचा कर्क प्रवेश, ६ राशींना अनेक लाभ गुंतवणूकीतून नफा, १६ दिवस ६ राशींना लाभच लाभ..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

येणारे १६ दिवस या ६ राशींसाठी लाभदायक असणार आहेत त्यांना गुंतवणुकीतून नफा होईल आणि आणखीनही बऱ्याच बाबतीत त्यांना लाभ झालेला दिसून येईल कोणत्या आहेत त्या सहाराशी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो उत्तम बुद्ध तर्क क्षमता यांचा कारक मानला गेलेला बुध ग्रह या बुध ग्रहाने ८ जुलैला कर्क राशि मध्ये प्रवेश केलेला आहे आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्राने देखील सिंह राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच बुध ग्रह कर्क राशीत विराजमान झालेला आहे. चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीतील बुधाचा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो.

विशेष म्हणजे २४ जुलै रोजी बुधाच कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणारे आणि त्याआधी काही दिवसांनी सूर्याचा कर्क राशित प्रवेश होणार आहे. ज्यामुळे बुध आणि सूर्य एका राशीत येतील आणि एक द्वितीय योग जुळून येईल. बुधाच्या कर्क राशीतील प्रवेशाने करियर आणि आर्थिक परिस्थितीवर चांगलाच प्रभाव पडेल.

तर मग आता येणारे हे १६ दिवस लाभदायक पाहायला मिळतील. त्यांना नशीबाची साथ मिळेल करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल. आणखीनही बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडतील हो पण काही राशींसाठी हे त्रासदायक सुद्धा ठरू शकते बरं का! म्हणजे काही राशींसाठी हे गोचर चांगले आहे तर काही राशींसाठी मात्र तापदायक आहे.

१) मेष रास- मेष राशींच्या व्यक्तींसाठी बु धाचा कर्क प्रवेश संमिश्र म्हणावा लागेल. म्हणजे अगदीच तापदायकही नाही आणि अगदीच लाभदायक ही नाही त्यांचा येणारा काळ फारसा अनुकूल मानला जाणार नाही पण काही कारणाने तणाव वाढू शकतो.

कौटुंबिक समस्या वाढू शकतात. करिअरमध्ये सुद्धा काही छोट्या-मोठ्या अडचणी जानाऊ शकतात. त्यामुळे थोडीशी निराशा येऊ शकते. पण कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या नुकसान होऊ शकते त्यामुळे चढ उतार करायला तयार राहा. थोडे धैर्याने घेतले तर हाही काळ निघून जाईल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना मात्र बुद्धाचा कर्क प्रवेश लाभदायक म्हणावा लागेल त्यांचा उत्साह वाढेल अनेक सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यात घडवून येतील नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते.

परदेशातून नोकरीसाठी कॉल सुद्धा येऊ शकतो लाभाच्या वेगवेगळ्या संधी त्यांना मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक सदस्यांसोबत त्यांचा वेळ चांगला जाईल. घरात काही शुभ कार्य होऊ शकतात.

३) मिथुन रास- मिथुन राशीसाठी सुद्धा संमिश्र ठरेल काही चढ उतार त्यांना सुद्धा पहावे लागतील. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आता संमिश्र यासाठी की आर्थिक लाभ मिळतील पण त्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.

तरच यश मिळेल. पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो व्यवसायावर प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कोणाशी विनाकारण वाद घालने तुम्ही या काळात टाळावे.

४) कर्क रास- कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हे १६ दिवस काही असे संमिश्रच ठरू शकतील. कोणतेही काम करत असाल तर विचार करून करावे प्रवास करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे काही लोकांची बदली होऊ शकते. आयुष्यात त्यामुळे थोडासा तणाव येऊ शकतो लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. वैयक्तिक जीवनात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

५) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींना सुद्धा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो एकाच वेळी अनेक समस्या समोर येऊन उभे राहतील. कोणतेही काम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात आर्थिक बाबतीत मात्र तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील आणि त्यामुळे आनंद होईल.

६) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश लाभदायक आहे. अहो धनलाभ होणार आहे त्यांना मग अजून काय पाहिजे ? भावंडांच्या मदतीने गरजा पूर्ण होतील. नवीन लोक भेटतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील.

नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतील. व्यवसायिकांना चांगला फायदा होऊ शकेल कठोर परिश्रमाने पैसा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य ही मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ तुम्ही या काळात घालवाल.

७) तुळ रास- तूळ लोकांच्या लोकांच्या नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. मित्र साथ देतील भागीदारीत व्यवसाय केल्यास त्यांना नफा सुद्धा मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल कुटुंबातील सदस्यांना पाहून मन प्रसन्न होईल. या काळात पैशाचा मात्र तुम्हाला हुशारीने वापर करावा लागेल.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अचानक काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. मुलांसोबत वाद वाढू शकतात कोणालाही कर्जावर किंवा उसने पैसे देऊ नका अन्यथा पैसे अडकू शकतात.

९) धनु रास- धनु राशींच्या व्यक्तींना सुद्धा काही समस्या बघाव्या लागतील काही कारणास्तव इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. या काळात विरोधक त्रास देऊ शकतात . विनाकारण खर्च वाढू शकतात.

१०) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींसाठी मात्र हा काळ सकारात्मक आहे. कामाबद्दल खूप जागृत राहावे लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतील पैसे मिळवण्यात यश मिळेल गुंतवणुकीच्या बाबतीत फायदा होईल धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यापारी पैसा मिळवण्यात यशस्वी होतील. व्यवसाय विस्तारण्यासाठी योजना आखू शकते.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक लाभाचा म्हणावा लागेल काही छोट्या गोष्टी सोडल्या तर सर्व काही चांगले होऊ शकते व्यवसायिक आघाडीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो दुसरीकडे विरोधकांना मात्र कडवी झुंज द्यावी लागेल.

१२) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तींसाठी बू धाचा कर्क प्रवेश शुभ म्हणावा आणावा लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल करियर बद्दल समाधानी राहू शकाल भौतिक इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील.

कामा वेळेवर पूर्ण करू शकाल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता . कठोर परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त होईल आणि जीवनामध्ये यशस्वी यश मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *