म्हणून ११८ वर्षापासून बंद आहे हा दरवाजा, या मंदिराचे गर्भदवार इतके वर्ष बंद होण्यामागचे होते हे कारण..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१० रुपयाच्या नोटेच्या माग कोणार्क सूर्य मंदिराचे चित्र तुम्ही पाहिल असेल हे भारतातील प्रमुख सूर्य मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अशा देण्यात आल होत की सूर्याची पहिले किरण पूजा स्थानावर आणि देवांच्या मूर्तीवर पडतात. शिवाय सूर्य मंदिराची वास्तुकला थक्क करणारी तर आहेच.मात्र या मंदिराचा इतिहास भगवान श्रीकृष्णाच्या पुत्राशी संबंधित आहे.

इतकच नाही तर या मंदिरामध्ये लोक जातात दर्शन घ्यायला मात्र ११८ वर्षापासून त्या मंदिरात बंद असलेल्या द्वार हे रहस्यमय आहे आणि तरीही अनेक भाविक पर्यटक देश विदेशातून मोठ्या संख्येने दरवर्षी या मंदिराला भेट देतात. या दरवाज्याच्या मागे नक्की काय रहस्य आहे आणि या मंदिराच काय वैशिष्ट्य आहे. ओडिसाच्या पुरी या जिल्ह्यातील कोणार्क सूर्य मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. त्यासोबतच अध्यात्म्याच्या दृष्टीकोनातूनही याला महत्व आहे. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे.

हिंदू धर्मात सूर्यदेवाला सर्व रोगांचा नाश करणारी मानले गेला आहे. आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे या मंदिराला युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आपल स्थान निर्माण केल आहे. त्या मंदिराची आख्यायिका अशी सांगण्यात येते की पुरानांनुसार भगवान श्रीकृष्णांचे पुत्र साम याने एकदा नारद मुनिशी गैरवर्तन केल. त्यामुळे नारदजी रागावले आधी त्यांनी त्याला शाप दिला. शापामुळे सामाला कुष्ठरोग झाला.

सांबाने कोणार्केतील चंद्रभागेमध्ये संगमावर १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. सर्व रोगांचा नाश करणाऱ्या सूर्य देवांनी त्याचे रोगही दूर केले. म्हणूनच सामाने सूर्यदेवाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. हे बरे झाल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करत असताना त्यांना सूर्य देवाची मूर्ती सापडली. त्या मूर्तीबाबत असे मानले जाते की ही मूर्ती खुद्द भगवान विश्वकर्मा यांनी सूर्य देवाच्या शरीराच्या एका भागातून बनवली होती. मात्र ही मूर्ती ऊर्जा जगन्नाथ मंदिरात ठेवण्यात आले आहे.

ओडिशाच्या पुरी पासून ३५ किलोमीटर अंतरावर कोणार्क नावाचे शहर आहे. त्या शहरांमध्ये हे सूर्य मंदिर वसलेल आहे. कोणार्क शब्द हा कोण आणि अर्क या दोन शब्दापासून बनलेला आहे. ज्यामध्ये अर्क म्हणजे सूर्यदेव या मंदिरात भगवान सूर्य रथावर अरुढ आहेत. या मंदिराच्या रचनेबद्दल, कलाकृती बद्दल जेवढे बोलले जाईल तेवढेच त्यांच्या एका रहस्य बद्दल बोलल जात ते म्हणजे इतिहास तज्ज्ञांच्या माहितीनुसार या मंदिराची निर्मिती तेराव्या शतकात करण्यात आली होती.

इसवी सन १२३६ ते १२६४ कालखंडात गंग वंशाचे पहिले राजे नरसिंहदेव यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. या मंदिराच्या बांधकामात प्रामुख्याने वाळू ग्रॅनाईट दगड आणि मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आला होता. बारा वर्षे सुमारे बाराशे मजुरांनी दिवस रात्र मेहनत करून मंदिराचे बांधकाम केले होते. त्यांची उंची सुमारे २२९ फूट असल्याचे सांगितले जाते. याची रचना अशी करण्यात आली आहे की सकाळी सूर्याची पहिली किरण बरोबर मंदिराच्या दारावर पडतात.

हे मंदिर म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर काळाचा वेग प्रतिबंधित करते. हे मंदिर सूर्य देवाच्या रथाच्या आकारात बांधण्यात आला आहे. या रथात चाकांच्या बारा जोड्या आहेत. त्याचबरोबर सात घोडे हा रथ ओढताना दिसतात. हे सात घोडे सात दिवसांचे प्रतीक आहे. असेही म्हणलं जातं की बारा जाके वर्षातील बारा महिन्यांचे प्रत्येक आहे. कुठे तरी चाकांच्या या बारा जोड्या दिवसाचे २४ तास देखील दिसतात.

यातील ४ चाकी अजूनही वेळ सांगण्यासाठी वापरली जातात. मंदिरात आठ ताडीची झाडे देखील आहेत जी दिवसातील आठ प्रहर दर्शवतात. शिवाय अशी देखील धारणा आहे की सूर्य देव सात घोडे असलेल्या रथावर स्वार होऊन ब्रम्हांडाचा प्रवास करतात. म्हणून या मंदिराची रचना रथासारखी करण्यात आली आहे. शिवाय या मागची गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात सूर्य देवांना संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवनातच स्तोत्र म्हटल जात. महाराज नरहसिंमा देव आराध्य मानले जायच.

म्हणून भगवान सूर्यदेवांना समर्पित या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती आणि या मंदिरात सूर्य देवांच्या तीन मोठ्या स्थापित केल्या गेल्या आहेत. मंदिरामध्ये सूर्यदेव सूर्य मावळणे यादरम्यान सकाळची स्फूर्ती संध्याकाळचा थकवा अशा सर्व भावभावनांचा अंतर्मा करून पायऱ्यांवरील शिल्पाची निर्मिती केली आहे. इथे बनलेल प्रत्येक शिल्प काहीतरी सांगत असे म्हणतात.येथील वास्तुवैभव आणि मानवी निष्ठेचा सुसंवादी मिलाफ मानला जातो.

मंदिराचा प्रत्येक इंच अतुलनीय सौंदर्य आणि कृपेच्या कलाकृतीने परिपूर्ण आहे. हजारो शिल्पे मानव वाद्य प्रेमी दरबारातील प्रतिमा शिखर आणि युद्ध यांच्या प्रतिमाने भरलेले यांचे विषयीही मनमोहक आहेत. हे मंदिर त्यांच्या कामुक मुद्रा असलेल्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणार्कच्या मंदिराच्या बांधकामामध्ये दिसून येतो. एक सिंह आहे त्याच्या खाली हत्ती दाबला गेला आहे तर त्याच्या खाली माणूस आहे.

एक्सपर्टनुसार याचा अर्थ म्हणजे सिंह म्हणजे माणसाचा अहंकार तर हत्ती म्हणजे माणसाच्या भावना म्हणूनच आपल्या अहंकारापायी भावनांच्या जाळ्यात अडकून रहातो तो मनुष्य आपल्या अहंकारावर ताबा मिळवून कोणताही व्यक्ती खऱ्या अर्थाने मानसात येऊ शकतो. असा त्याचा अर्थ लागतो. त्याचबरोबर मंदिराच्या वरच्या टोकापासून भगवान सूर्याचा उदय आणि अस्त होताना दिसतो.

येथून बघितल की अस वाटत की जणू संपूर्ण मंदिरात लाल रंग विखुरलेला आहे आणि मंदिराच्या अंगणात लाल सोन पसरलेला आहे. हे मंदिर पूर्वभिमुख असून त्याचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. देऊल गर्भगृह नटमंडप आणि जगन मोहन मंडप हे तिन्ही देखील एकाच दिशेला आहेत. सर्वात आधी नटमंडपात ज्या गेट मधून प्रवेश करता येतो ते प्रवेशद्वार आहे. त्यानंतर जग मोहन आणि गर्भगृह एकाच ठिकाणी आहे.

अशा या मंदिराच रहस्य म्हणजे या मंदिराची चुंबकीय शक्ती लोकप्रिय आख्यायिकानुसार मंदिराच्या वरच्या बाजूला बावन टन चुंब होत. हे चुंबक मंदिराच्या वरच्या बाजूला बसवण्यात आल होत. या चुंबकाच्या आधारे मंदिरातील सूर्य देवाची मूर्ती पूर्ण वेळ हवेत तरंगत जायची असे सांगितले जाते.शिवा हे मंदिर अगोदर किनाऱ्यावर होत. हळूहळू पाणी कमी झाल तसे हे मंदिर पाण्यापासून दूर झाल. मात्र हे मंदिर जेव्हा समुद्राच्या जवळ होत.

मात्र जेव्हा हे मंदिर समुद्राच्या जवळ होत तेव्हा याचा त्रास समुद्री प्रवाशांना व्हायचा. चुंबकाचा प्रवाह इतका जबरदस्त होता की समुद्रातून जाणारी जहाजे या चुंबकामुळे भरकट असेत आणि मंदिराच्या दिशेने ओढली जात असत. त्यामुळेच खलाशांनी ते मौल्यवान चुंबक आपल्याबरोबर नेल असे सांगितल जात. या गोष्टीचा मंदिरावर परिणाम झाला. याचे खांब भिंती एकमेकांपासून विरुद्ध होऊ लागले.

ज्यामुळे मंदिराची पडझड सुरू झाली. आज कोणार्क जे मंदिर आपण बघतो ते खर तर पूर्ण मंदिर नाही असेही काही इतिहासकार सांगतात. कारण या मंदिराच्या तीन मंडपातून केवळ एक मंडप पर्यटकांना दिसतो बाकी दोन दिसत नाहीत. काहीजण म्हणतात ते परदेशी हल्ल्यात नाहीसे झाले तर काहीजण म्हणतात हे पूर्ण बांधलच गेल नव्हत. म्हणून हळूहळू आपोआप पडून गेल.

सोळाव्या शतकाच्या वेळी जेव्हा मंदिरातून भगवान सूर्याची मूर्ती हटवण्यात आली होती तेव्हा पूजा करणे सुद्धा बंद झाल. म्हणून भावी इकडे जायचे कमी झालेत. म्हणून कोणार्क नगर हळूहळू जंगलात रूपांतर झाले आहे. या दरम्यान मंदिराची खूप पडझड झाली. काही वर्षांनी जेव्हा मंदिर परत शोधण्यात आल तेव्हा त्याची परिस्थिती खूप खराब झाली होती. यामुळे आज केवळ एक मंडप सर्वांना बघायला मिळतो. पण या मंडपात यायचे सर्व रस्ते ११८ वर्षे आधीच बंद करण्यात आले होते.

शिवाय याबद्दल इतिहासकार सांगतात. १९ व्या शतक संपताना मंदिराचा शेवटचा मंडप सुद्धा पडायला आला होता. जर याला पडण्यापासून थांबवाचे असेल तर एकच मार्ग होता. त्यानुसार १९३० मध्ये तत्कालीन गव्हर्नर जॉन उडबल यांनी मंदिरात रेती भरून सर्व दरवाजे सील केले नंतर खूप वेळात मंदिराच्या दरवाज्याला बोल गेल आहे.

मात्र तसे झाले नाही. म्हणून आजही या मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मात्र जानेवारी २०२२ मध्ये ही रेती सुरक्षितपणे हटवण्याची कार्य पुरातत्व विभागाने करत असलेली ची माहिती सुद्धा सांगण्यात आली होती. म्हणून आता ही रेती कधी हटवण्यात येईल याचीच वाट सर्वजण बघत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *