१८ जुलै- १६ ऑगस्ट अधिक महिन्यात करायच्या या २० गोष्टी, जाणून घ्या सविस्तर मध्ये.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१८ जुलै ते १६ ऑगस्ट आहे अधिकचा महिना अर्थात धोंड्याचा महिना हा महिना साधारणता ३ वर्षांनी येतो आणि म्हणूनच या महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी या महिन्यात केल्या जातात जसे जावयाला घरी जेवायला बोलावतात ,वेगवेगळी व्रत केली जातात, वेगवेगळ्या नियमही केले जातात अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

बऱ्याच गोष्टी आपल्याला लाभाच्या सुद्धा आहेत म्हणजे आपण त्या अधिक महिन्यात केल्या तर विशिष्ट लाभ सुद्धा होतात. एक काम करूया एक एक करून त्या सगळ्याच गोष्टी आपण माहीत करून घेऊयात.

अधिक मास अधिक पुण्य देणारा महिना आहे अथर्ववेदात या मासाला भगवान महावीष्णूंचे घर म्हटलेलं आहे. म्हणूनच अधिक महिन्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना पूजा नाम जप केला जातो. भगवान महाविष्णू या अधिकमासाचे अधिपती आहेत. अधिकमासाची कथा कृष्ण अवतार नरसिंह अवतार यांच्याशी निगडित आहे.

म्हणून ह्या महिन्यात भगवान आणि भगवान नरसिंह यांची पूजा केली जाते. या महिन्यात भगवद्गीता ,श्रीराम कथा ,गजेंद्र मोक्ष कथा, नरसिंह कथा यांचे पारायण केले जाते त्यादृष्टीने ही उपासना अधिक फलदायी मानली जाते. जी व्यक्ती या महिन्यात व्रत उपासना करते ती सर्व पापातून मुक्त होते आणि मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती होते अशी ही श्रद्धा आहे .

या महिन्यामध्ये पूजा पाठ धार्मिक कृत्य दानधर्म केले जातात कायमस्वरूपी दारिद्र्य आणि दुःख त्यामुळे नष्ट होते अधिक मासात जेवढी उपासना तुम्ही कराल त्या उपासनेमुळे प्रापंचिक दुःखातून तरुण जाल. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने जप तप साधन करून भगवान नरसिंह ना प्रसन्न करून घेतले होते. त्याप्रमाणे भाविकांनी आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी काया वाचा उपासनाने भगवंताची उपासना केली असता त्यांनाही या महिन्यांमध्ये भगवान प्राप्ती होते.

या महिन्यात भगवान विष्णूंच्या ३३ अवतारांची पूजा केली जाते. विष्णू , जीष्णू ,महा विष्णू, हरी ,कृष्ण ,भधोक्षज, केशव, माधव ,राम ,अच्युत ,पुरुषोत्तम, गोविंद ,वामन ,श्रीश,श्रीकांत, नारायण , मधुरीपु ,अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव , यगत्योऊनी, अनंत, विश्व भूषण , शेष शाईन, संकर्षण प्रद्युम्न , दैत्यारि,विश्वतोमुक, जनार्दन ,धारावास, दामोदर , माघाद्रन,श्रीपती. एवढी तेहतीस नावे जी आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची या सगळ्यांची पूजा या महिन्यांमध्ये केली जाते. या नावाचा स्मरण करावे जप करावा.

या महिन्यात घरात देवघरामध्ये शाळीग्राम असल्यास त्याच्या बाजूला अखंड दीप तेवत ठेवला जातो. तुमच्या घरात देवघरात शाळीग्राम आहे का? मग जसा अधिक महिना सुरू होईल अखंड दीप तेवत ठेवा. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या महिन्यात भगवद्गीतेचे पठण करणे लाभदायक ठरते विशेषतः चौदावा अध्याय म्हटला पाहिजे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप जेवढा होईल तेवढा ह्या महिन्यामध्ये करावा.

या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करता येईल. अधिक महिन्यांमध्ये धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते . त्यामुळेच दीपदान किंवा ध्वजदान अन्नदानही सुद्धा केले जाते. हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष महत्त्व आहे. म्हणून शक्य तेव्हा गाईला ताजा हिरवा चारा अधिक महिन्यांमध्ये खाऊ घाला. या महिन्यात एक मुक्त राहून आपल्या वाटणीचे एक वेळचे जेवण किंवा कोरडे धान दान करावे. म्हणजे आपण दिवसातून एकदाच जेवायचे आणि आपल्या वाटणीचे दुसरे जेवण हे एखाद्या ल दान द्यायचे.

किंवा धान्य सुद्धा दान देऊ शकता. मग त्यामध्ये गहू, तांदूळ, मोहरी जिरे दूध दही आवळे पान सुपारी अशा सगळ्या वस्तूंचा समावेश आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अधिक महिन्यात चातुर्मास किंवा श्रावण महिन्याप्रमाणे कांदा लसूण माणस आहार हे काहीही खात नाहीत सगळ्यात महत्त्वाचं मध्य हानिकारक पदार्थ वर्ज करावेत.

कुठलीही व्यसन करू नये. अधिक महिना शुभ आहे तरीसुद्धा या महिन्यात साखरपुडा मुंज लग्न खरेदी हे कार्य करत नाहीत कारण हा महिना आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यावर लक्ष केंद्रित करावे त्यामुळे पदरात पुण्य पडते अधिक मासामध्ये सर्व अर्थसिद्ध योग द्विपुष्कर योग अमृतसिद्धी योग जुळून आले आहेत त्यामुळे दानधर्म करून या योगांचा लाभ घ्या. या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम ऐकण्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे.

खरंतर तुम्ही म्हणत असाल तर म्हणायलाच हवे पण जर म्हणता येत नसेल तर ऐकले तरीही चालेल. विष्णूची हजार नावे घेतली किंवा कानांवर जरी पडली तरी सकारात्मक वातावरण निर्मिती होते आणि घरातलं नैराश्य दुःख दूर होतं असं म्हणतात की अधिक महिन्यात केलेल्या व्रतवैकल्यांना इतर वेळी केलेल्या व्रतांपेक्षा दहापट अधिक फळ मिळतं देवी भागवत पुराण, विष्णुपुराण,भागवत पुराण, अशा धार्मिक ग्रंथांचा पारायण या महिन्यात करायला सांगितल जातात.

अध्यात्मिक उन्नतीसाठी आपले हा महिना अतिशय फलदायी आहे. या महिन्यात कोणतीही उपासना मनोभावे करावी त्यामुळे कुंडलीतील सगळे दोष दूर होतात. कितीही भयंकर दोष असू द्यात सगळे दोष दूर होतात. आणि पुण्य प्राप्त होते. आता आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने सुद्धा अधिक महिना अधिक फलंदाही आहे बर का! त्याचा सुद्धा जरूर लाभ घ्यावा.

थोडक्यात काय तर अधिक महिन्यात देहाची आणि मनाची अंतर बाह्य शुद्धी करून घ्यावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *