तुम्हाला माहिती आहे का? महाभारतातला १ योद्धा आजही “या” मंदिरात येतो, रहस्य?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

भारतात असे एक मंदिर आहे. जिथे महाभारतातला एक योद्धा आजही पूजा करायला येतो दर्शनाला येतो. कोणता योद्धा आणि कोणता आहे ते मंदिर कुठे आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तथ्य किती आहे. चला जाणून घेऊयात. मित्रांनो भारतात संस्कृती परंपरा प्राचीन ग्रंथ पुराण या सर्वलाच अनन्य साधारण महत्त्व आहे. महाभारत महाकाव्य ही भारताचा इतिहास आहे.युग लोटली तरी त्या विषयाची जिज्ञासा लालसा आणि गोडी कमी होत नाही.

महाभारतातील अनेक गोष्टी आजच्या काळात आपल्याला अचंबित करतात आणि अशीच अचंबित करणारे गोष्ट म्हणजे महाभारतातला एक योद्धा आजही एका मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतो आणि पूजा करतो. खरंतर कोणाच्याही सदविवेक बुद्धीला पटण अवघड आहे. पण काही गोष्टी बुद्धीच्याही पलीकडच्या असतात. त्यावर विश्वास नाही ठेवला काय आणि ठेवला काय त्या घडतच असतात.

पण काही गोष्टी बुद्धीच्या हे पलीकडच्या असतात. आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. व्रतवैकल्य सण उत्सव त्याने भरलेला श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या सर्वच मंदिरात म्हणजे बारा ज्योतिर्लिंगासह देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. खास करून श्रावणी सोमवारी महादेवांचे दर्शन घ्यायला भाविक मंदिरात येतात.

आपल्या देशात अनेक अद्भुत आणि अलौकिक मंदिर आहेत. यामध्ये एक मंदिर असा आहे ज्याचा थेट संबंध महाभारताचे आहे. या मंदिराच खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे गेल्या पाच हजार वर्षापासून दररोज न चुकता महाभारतातला एक योद्धा पूजा करण्यासाठी येतोय आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करतोय अशी मान्यता आहे.

कोणता आहे तो योद्धा आणि कोणत आहे ते मंदिर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल भूरामपूर राज्यात असलेल असीर गड नावाचं गाव आणि या गडावर असलेल शिवमंदिर या मंदिरातल्या महादेवांना असिरेश्वर किंवा गुप्तेश्वर असे म्हणतात. असिर्गड किल्ला भुरामपुरच्या उत्तरे सुमारे २० किलोमीटर आणि सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांशी आणि या दोन्ही इतिहासाची या मंदिराचा थेट संबंध असल्याचा सांगितल जात. तसे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला या मंदिर परिसरात मिळाले आहेत. भगवान शिव शंकरांच्या याच गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये महाभारतातील एक योद्धा जो द्रोणाचार्यांचा पुत्र होता असा अश्वत्थामा न चुकता दर्शनासाठी येतो.

आजच्या विज्ञान युगामध्ये काही जणांना ही गोष्ट हस्यात पद वाटू शकेल. परंतु तिथे गेल्यावर आपल्याला कळत की विज्ञानाच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात. सगळ्यात आधी जाणून घेऊया की हा अश्वत्थामा नक्की कोण होता. महाभारताच्या युद्धात अनेक पराक्रमी आणि शूरवीर योद्धा होते. त्यांच्यातलाच एक असलेला हा अश्वत्थामा पण अश्वधानाचे वैशिष्ट्य म्हणजे तो गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र होता.

गुरु द्रोणाचार्य म्हणजे कौरव पांडवांचे गुरु कौरव आणि पांडव यांना ज्यांनी धनुर विद्या शिकवली यांना ज्यांनी शस्त्रास्त्र चालवायला शिकवली ते गुरु द्रोणाचार्य आणि या गुरुद्रोणाचार्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे अश्वत्थामा पण महाभारताच्या युद्धात गुरु द्रोणाचार्य आणि अश्वधामा दोघेही कौरवांच्या बाजूने लढत होते.

दोघेही युद्ध कलेमध्ये पारंगत होते. द्रोणाचार्यांना आवरण पांडवांना कठीण होऊन बसल होत आणि अशातच भगवान श्रीकृष्णांनी एक युक्ती लढवली त्याच महाभारताच्या युद्धात एक हत्ती सुद्धा लढत होता. ज्याच नाव अश्वत्थामा होत. तो अश्वत्थामा नावाचा हत्ती युद्धात मारला गेला आणि मग भगवान श्रीहरीकृष्णांनी अश्वत्थामा मारला गेला अशी बातमी सगळ्या रणांगणात पसरवली.

ही बातमी जेव्हा द्रोणाचार्यांच्या कानावर आली तेव्हा त्यांना एवढंच कळल की अश्वत्थामा मारला गेला.हे ऐकून त्यांचा धीर त्यांच धैर्य खचल. त्यांचा एकुलता एक मुलगा युद्धात मारला गेला हे ऐकून त्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. अश्वधामा वीर होता शूर होता तो असा कसा मारला जाईल असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले आणि म्हणूनच ते युधिष्ठराकडे गेले. कारण युधिष्ठिर कधीही खोटे बोलत नाही. खर बोलण्यासाठी तो प्रसिद्ध होता.

म्हणूनच तर त्याचा रथ सुद्धा जमिनीपासून चार बोट वर असायचा.जेव्हा द्रोणाचार्य युधिष्ठेराकडे आणि युधिष्ठराला म्हणाले की आरे अश्वधामा मारला गेलाय असे म्हणतात ते खर आहे का. तेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली युक्ती केली. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला अश्वधामा मारला गेला हे खर पण नरोवा कुंजरवा अर्थात हत्ती की मानव एवढ अर्ध वाक्य युधिष्ठिर बोलना आणि द्रोणाचार्यांनी तिथेच शस्त्र टाकल त्यांनी पुढच ऐकूनच घेतल नाही.

अश्वधामा मारला गेला एवढेच वाक्य त्यांच्यासाठी पुरेस होत त्यांनी शस्त्र खाली टाकून दिली आणि मांडी घालून ते ध्यान लावून बसले आणि याच संधीचा फायदा घेऊन पांडवांच्या बाजूने लढणारा द्रौपदीचा भाऊ हा पुढे गेला आणि द्रोणाचार्यांचा वध केला. ही बातमी जेव्हा अश्वधामाला समजले तेव्हा त्याची तळपायाची आप मस्तकात गेली. तो सुडाच्या भावनेने पेटून उठला त्याला काही करून पाडव्यांशी प्रतिशोध घ्यायचा होता.

तो त्याच द्वेषाने युद्ध लढत राहिला पण युद्ध समता समता शेवटी कौरव हरले आणि पांडव जिंकले कौरवांचे सगळेच मारले गेले. जिवंत होता तो फक्त अश्वत्थामा आणि कृपाचारी आणि अश्वधामा सुडाच्या भावनेने पेटलेला होता. त्याने युद्ध समाप्त झाल्यानंतरही झोपलेल्या पांडव पुत्राला जाऊन मारले. अश्वधामाने ज्यांना झोपेत मारले ते द्रोपतीचे पाच मुले होते. अश्वत्थामा एवढ्यावरच थांबला नाही.

तर त्याने अभिमन्यूची बायको उत्तरा तिच्या गर्भामध्ये असलेला अभिमन्यूचा पुत्र याला मारण्यासाठी सुद्धा ब्रह्मास्त्र सोडल. भगवान श्रीहरी कृष्णांनी तत्काळ आपल्या शक्तीचा वापर करत उत्तराच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या पुत्राचे संरक्षण केले आणि दुसरीकडे अश्वधाम्याच्या या कृतीबद्दल ते प्रचंड क्रोधीत झाले. पण अश्वधामाला मारण शक्य नव्हत कारण त्याला चिरंजीविताच वरदान होत.

अश्वत्थामा हा सात चिरंजीवां पैकी एक आहे. त्याच्या डोक्यावर एक विशिष्ट म्हणी होता तो त्या मन्या सहित जन्माला आला होता. तो एक विशेष बालक होता आणि म्हणून तो चिरंजीवी होता. तो म्हणी त्याचे रक्षण करायचा त्याला सर्व प्रकारच्या त्रासापासून दूर ठेवायचा आणि म्हणूनच अश्वधाम्याला शिक्षा करण्याचा अधिकार भगवान श्रीकृष्णांनी द्रोपतीला दिला कारण तिचे पुत्र मारले गेले होते.

तेव्हा द्रोपती म्हणाली की याच्या डोक्यावरचा हा मनी काढून घ्या कारण तो म्हणे अश्वधाम्यासाठी तो महत्त्वाचा होता. पांडवांनी अश्वधान्याच्या डोक्यावरचा मनी काढून घेतला आणि भगवान श्रीकृष्णांनी अश्वधाम्याला शाप दिला की त्याच्या डोक्यावरची ही भरभळती जखम कायम अशीच राहील. ही जखम बरी करण्यासाठी तो हळद आणि तेल मागत युगाना युगे भटकत राहील.

आणि म्हणूनच असे म्हणतात की आजच्या काळातही अश्वधामा नर्मदा नदीच्या काठी हळद आणि तेल मागत भटकत असतो. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना तो दिसतो आणि हाच अश्वधामा शिवमंदिरात पूजा करण्यासाठी असिर्गड येथे येत असतो. परंतु कोणालाही ती पूजा कोणी केली आहे ते दिसत नाही. येथील स्थानिकांच्या मते भगवान श्रीहरीकृष्णांच्या दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा इथे भटकत असतो.

असिर्गड किल्ल्यातील तलावात स्नानाधिकार्य उरकून अश्वधामा नियमितपणे पहाटे महादेवांच्या पिंडीवर ताजी फुल वाहतो. पूजा करतो आणि निघून जातो. या गावातील स्थानिक माणसांच्या मते अनेकांनी अश्वधाम्याला पाहिलेल ही आहे. मात्र जी व्यक्ती अश्वधाम्याला पाहते त्याच मानसिक संतुलन बिघडत असाही दावा स्थानिकांकडून केला जातो. त्यामुळे कोणीही सूर्योदयापूर्वी सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर जात नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *