तब्बल ५ महिने महादेव स्वतः आपल्या भक्तांच्या समवेत पृथ्वीवर असतात. सुष्टीचा कारभार ‘इथून’ चालवतात महादेव.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

चातुर्मासाच्या काळात चक्क महादेव ब्रम्हांडाचा कारभार चालवतात असे म्हटले जाते. मात्र महादेव ब्रम्हांडाचा कारभार कुठून चालवतात किंवा श्रीहरी विष्णू पाच महिन्याची विश्रांती कुठे घेतात. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. २९ जून म्हणजेच आषाढी एकादशी किंवा देव शनी एकादशी दिवसापासून भक्तांना दर्शन दिल्यावर देव योगनिद्रेत गेलेत. अशातच ब्रम्हांडाचा गाडा हाकण्याची जबाबदारी सर्वव्यापी भगवान शिव यांच्याकडे येते अस म्हटल जात.

भगवान शिव चातुर्मास आणि अधिक मास सृष्टीचा कारभार किंवा सृष्टीचे पालन हार असणार आहेत. या पाच महिन्याच्या काळात कोणत्याही प्रकारच शुभ कार्य म्हणजेच लग्न मुंज गृहप्रवेश इत्यादी करण हिंदू धर्मात वर्ज मान्यता आला आहे. त्यामुळे सर्व शुभकार्य देव शनी एकादशीलाच थांबली मात्र देवांचे देव महादेव हे ब्रम्हांडाचा कारभार कोठून चालवतात किंवा श्री हरी विष्णू पाच महिने विश्रांती कुठे घेतात.

मित्रांनो खर तर चातुर्मासात चार महिने भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात. यंदा अधिक मास असल्याने भगवान श्रीहरी विष्णूना पाच महिने विश्रांती मिळणार आहे. तर महादेव यांना जगाचा कारभार पाच महिने चालवावा लागणार आहे. अशातच या काळात भगवान शिव पृथ्वीवर निवास करतात आणि जगाचे पालन करतात.

श्रावण महिना हा महादेवांचा शंकरांचा महिना आणि चातुर्मासतील पहिला महिना आहे. असे म्हणतात की याच काळात शिव कैलासातून खाली येतात आणि उत्तराखंड येथील हरिद्वार जवळील कनखल गावात आपल्या कुटुंबात राहतात. श्रावणात भगवान भोलेनाथ कनखल हरिद्वार जवळ दक्षेश्वर नावान वास्तव्य करतात आणि सृष्टी चालवतात असे म्हणतात.

म्हणूनच चातुर्मासाच्या काळात महादेव धरतीवर अवतरताच अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच या महिन्यांमध्ये महादेवाची भक्ती करण्यात येते. मग श्रीहरी विष्णू कोठे विश्रांतीला जातात. तर देव शनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेला जातात. अस म्हणतात. या दिवसापासूनच चार महिन्याच्या तपश्चर्याचा काळ सुरू होतो. त्यालाच चातुर्मास असे म्हणतात.

या काळात भगवान श्रीहरी विष्णू पाताळाचा राजा बळी त्याच्या घरी चार महिने वास्तव्य करतात असेही सांगितले जाते. असे म्हणतात की बळीराजा अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रजेचे हित जाणणारा व्यक्ती होता. मात्र तो अतिशय पराक्रमी होता. त्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या परक्रमाने जिंकली आणि त्यानंतर त्याने देवावर चढाई करून त्यांना पातळात बंदी बनवल.

तेव्हा देवांनी श्रीहरी विष्णूंचा धावा केला होता आणि श्रीहरी विष्णूंनी वामन रूप घेत पृथ्वीची तीन पावल दान मागितली बळीराजा अत्यंत अत्यंत उदार होता. त्याने तथास्तु म्हणतात श्रीहरी विष्णूंनी पहिल्या पावलातच पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात आकाश व्यापल.

आता तिसर पाऊल कुठे ठेवू असा प्रश्न करताच माझ्या डोक्यावर ठेवा बळीने श्रीहरी विष्णूंना सांगितले आणि तिसर पाऊल डोक्यावर पडतात बळी पाताळात गेला. मात्र त्याची भक्ती आणि उदरता पाहून श्रीहरी विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले त्यामुळे विष्णू बळीच्या घरी पातळी विश्रांती घ्यायला जातात. अशी धार्मिक मान्यता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *