आषाढ संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त व उपाय, जाणून घ्या सविस्तर माहिती.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

येणाऱ्या ६ जुलैला आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आषाढ गणेश चतुर्थी व्रत केल जात. या दिवशी खऱ्या मनाने केलेली उपासना प्रत्येक संकटात दूर करतात. गणेशाची आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात अशी मान्यता आहे.

चला तर मग जाणून घेऊयात आषाढ गणेश चतुर्थीचा व्रत पूजा मुहूर्त आणि उपाय त्यामुळे तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती होऊ शकते. गुरुवार दिनांक ०६ जुलै रोजी आषाढ संकष्टी चतुर्थी आहे. यावर्षी याच धार्मिक महत्त्व विशेष मानला गेला आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य वाढत आणि आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असेही म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा करताना चतुर्थीच्या रात्री चंद्राची ही पूजा केली जाते हे विशेष.

संकष्टी चतुर्थी तिथीचा मुहूर्त- ०६ जुलै रोजी सकाळी ०६:३१मि. सुरु होईल तो दुसऱ्या दिवशी ०७ जुलै रोजी दुपारी ०३:१३ संपेल. त्या दिवशी ब्रह्मयोगात येऊन गणेशाची पूजा केली जाते. असे म्हणतात या दिवशी गणपती बाप्पाची पूजा सर्व संकटे दूर होतात. जीवनात सुख शांती मिळून शुभताही वाढते.

आषाढ संकष्टी चतुर्थीच्या व्रताची पद्धत जाणून घेऊयात- भक्ती भावाने गणेशाची उपासना केल्यास आपल्याला ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते त्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नंतर हातात पाणी घेऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि गणेश व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर शुभमुहूर्तावर श्री गणेशाची पूजा करावी.

पूजेच्या ठिकाणी लाकडी चौकटीवर पिवळे कापड पसरून त्यावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी. त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा. चंदन लावाव आणि वस्त्र अर्पित करावी. जर वस्त्र अर्पण करू शकत त्यानंतर फळे फुले अक्षदा खूप दीपगंध इत्यादी अर्पण करून प्रसाद म्हणून मोदक अर्पण करावे त्यानंतर श्री गणेश चालीसाचे पठण करावे आणि संकष्टी चतुर्थीची ही कथा ऐकावी. त्यानंतर आरती करावी.

संध्याकाळी या पद्धतीने गणेशाची पूजा करावी. आरती करून चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य द्याव आणि उपवास सोडावा. आषाढ चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या दर्शन होणे अत्यंत शुभ मानला जात. चंद्र देवाचे दर्शन घेतल्यावर चतुर्थी तिथीचे व्रत पूर्ण मानल जात.

धार्मिक श्रद्धा अशी ही आहे या व्रताचे पालन केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात आणि मुलाशी संबंधित समस्या दूर होतात. या व्रताचा महिमा असाही आहे की कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात कर्जाच्या संबंधित समस्याही सुटतात.

उपाय – १) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला झेंडूचे फूल आणि मोदक याचा नैवेद्य अर्पण करावा. या उपायाने तुमचा प्रत्येक कामात यश प्राप्त होत.

२) तर तुम्हाला घर घ्यायच असेल तर श्री पंचरत्न स्त्रोत्राचे पठण कराव. ३) श्री गणेशांना कुंकू अतिशय प्रिय आहे. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा करताना स्वतः कुंकवाचा टिळा लावावा. त्यानंतर श्री गणेशाची पूजा करून कुंकू अर्पण कराव असे म्हटले जाते. कारण कुंकू हे सुख आणि सौभाग घेते प्रतीक मानले जाते.

४) याशिवाय श्री गणेशाची पूजा केल्यानंतर १०८ वेळा “ओम गंग गण गणपतये नमः विघ्न विनाशिने” या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

५) संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात असेही म्हटले जाते. श्री गणेशाला श्रमिक पान अर्पण केल्याने दुःख आणि गरीबी दूर होते

६) चतुर्थीच्या दिवशी ओम गंग गण गणपतये नमः या मंत्राचा जप करताना सतरा वेळा श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

७) जर तुम्ही विवाहयोग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी २१ गुळाचे मोदक आणि दुर्वा अर्पण कराव्यात. त्यामुळे लवकर विवाह होतो असेही म्हणतात.

८) शिवाय व्यवसाय प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणावी. त्याची पूजा करून हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण कराव्यात. त्यामुळे नोकरीत बढतीची शक्यता वाढते.

९) शिवाय गणेश यंत्र खूप फायदेशीर मानल जात. असे म्हणतात की घरात श्री गणेशा यंत्राची स्थापना केला ना नकारात्मक ऊर्जेचा संचार होता. अशा स्थितीत तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश यंत्र स्थापित कराव असही सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *