मासिक शिवरात्रीला करा हे सोपे उपाय भोलेनाथ प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकरांच्या पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मानला जातो. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरणारे देव आहेत. मनातील विकार दुःख दारिद्र्य अकाली मृत्यूची भीती दुःख दूर करून पुत्र संपत्ती सुख समृद्धी इत्यादी प्रदान करणारे देव आहेत.

काही सोपे उपाय केल्याने भगवान शंकराला प्रसन्न केले जाऊ शकते. मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात. चला तर मग नाशिक शिवरात्री सामान एक काही खास माहिती जाणून घेऊयात आणि काही महत्त्वाचे उपायही बघूयात. त्यामुळे तुम्ही हव ते फळ प्राप्त करू शकता. वर्षभरात अकरा मासिक शिवरात्रि आणि एक महाशिवरात्री असते.

मान्यता आहे की, शिवरात्रीला श्रद्धा आणि भक्तीने यांची उपासना आणि उपवास केल्यास ते खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दारिद्र्य दूर करतात. मासिक शिवरात्रि दिवशी काही विशेष अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय प्रभावी ठरू शकतात. मग या दिवशी कोणती उपाय करावेत.

१) तर घरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी पारद शिवलिंगाची स्थापना करावी. त्याची नियमित पूजा करावी. त्यामुळे नक्की तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यास मदत होईल.

२) याबरोबरच नंदी हे महादेवाचे आवडते गण आहे. त्याची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात. तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी बैलांना नंदी समजून हिरवा चारा खायला द्यावा. यामुळे गरिबी दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी सुद्धा येते.

३) याबरोबरच ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे. अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी. असे सांगण्यात येत यावेळी त्यांनी ११ शिवलिंग बनवावी आणि त्या सर्वांचा अकरा वेळा गंगाजल आणि अभिषेक करावा आणि मनोभावे पूजा करावी. असे केल्याने संतती योग तयार होतो.

४) याबरोबरच शिवरात्रीला २१ बेलाचे पानावर चंदन आणि ओम नमः शिवाय लिहाव आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ही पाने महादेवाला अर्पित करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

५) शिवाय जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख समृद्धी हवी असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करावे.

६) जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन फुले फळे धूप दिवे फुले यांनी पूजा करावी.

७) याबरोबरच पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे तणावातून सुटका मिळते आणि मनही शांत राहते.

८) जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर शिवरात्रीला पती-पत्नीने मिळून शिवशक्ती म्हणजेच महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो.

९) ज्या लोकांचा कोणत्याही कारणामुळे लग्न जमत नसेल त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा. यामुळे तुम्हाला लवकरच सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मित्रांनो तर हे मासिक शिवरात्रीला हे सोपे उपाय केलेतना तर नक्कीच तुम्हाला हवे ते फळ तुम्ही प्राप्त करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *