नमस्कार मित्रांनो.
मंडळी गावागावातून पालख्या आणि दिंड्या पंढरपूरच्या वाटेने निघाल्या आहेत. प्रत्येकाला त्या पांडुरंगाला भेटण्याची आस आहे. वारकऱ्यांच्या मनातला भक्तिभावच त्यांच्या पावलांना गती देतो आणि ते पंढरपूरच्या वाटेने चालू लागतात. वारीला निघालेल्या महिला वर्गाच्या डोक्यावर तुळस असते तर पुरुष वर्गाच्या हातात भगवा झेंडा असतो.
ही भगवी पथाका वारकरी मंडळी हाती का घेतात याचा अर्थ काय आहे. भगवी पथाका भगवा झेंडा हे कशाच प्रतीक आहे. चला जाणून घेऊयात. मंडळी हिंदू धर्मात केसरी लाल पांढरा पिवळा या रंगाचा अधिक वापर केला जातो. हिंदुस्तान उत्सवातही भगव्या ध्वजाच पूजन केल जात. भगवी पथाका लावली जाते आणि विशेषतः आषाढी कार्तिकी एकादशीच्या वारीत भगवा ध्वज उंचावत वारकरी पंढरीची वाट चालतात.
पण भगवाच का या रंगाचा हिंदू धर्मात असलेल एवढे महत्त्व काय केशरी अर्थात भगवा रंग हा त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य,सेवा यांचे प्रतीक आहे. सनातन धर्मात साधुसंत मोक्षमार्गावर चालण्याचा संकल्प करतात. केव्हाही ते वस्त्र ते परिधान करतात. वारकरी प्रांतातही केशरी ध्वज उंचवतात.
केशरी वस्त्र संयम संकल्प आणि आत्म नियंत्रणाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात. त्याचप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात तेव्हा त्यांची काया केशरी रंगा समान भासते. केशरी रंग दुर्गा माता, हनुमान, गणपती देखील धारण करतात. त्यामुळे या रंगा बरोबरच त्याची ऊर्जा आणि आशीर्वादही प्राप्त होतो.
रामायण महाभारत असो किंवा शिवरायांचा काळ असो त्या सर्वांनी विजयाचा निदर्शन म्हणून भगवा ध्वजही फडकवला सनातन धर्माने देखील भगवा ध्वज स्वीकारला. इतकच नाही तर स्वातंत्र्य काळातही भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला. अंधारातही चमकून दिसेल ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणूनच तर द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले जातात.
याचाच अर्थ केशरी रंग अंधारावर अधर्मावर अंधश्रद्धेवर मात करतो. म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो. केशरी हा सूर्योदयाचा देखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ठ नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही. याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलन वलन होणार नाही.
म्हणूनच हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे. केशरी रंग शौर्य बलिदान आणि तीर्थयात्रेचे प्रतीक आहे. तसेच तो मंगल्याचाही प्रतीक आहे. म्हणून वारीच्या मंगलमय उत्साहात भगवा ध्वज फडकवत पंढरपूरच्या दिशेने कुछ केली जाते. बोला जय हरी विठ्ठल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.