जास्त पूजा पाठ करणारेच. जास्त दुःखी का असतात? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

खूप व्यक्ती अशा असतात ज्या भगवंतांच खूप पूजन करतात. नेहमी भजन कीर्तन पूजन यात दंग असतात. परंतु त्यांच म्हणण अस असत. आम्ही नेहमी भगवंताच पूजन करतो पूजेमध्येच आमचा दिवस घालवतो. तरीही आम्ही आनंदी का नसतो. नेहमी आमच्या वाट्यात दुःखच काय येत आणि इतर नास्तिक जी लोक आहेत कधीच भगवंताला मानत नाहीत.

ते अगदी आयुष्य आरामात थाटामाटात आनंदात आपले जीवन जगत असतात. मग जास्त पूजा पाठ करू न ही लोक जास्तच दुःखी का असतात. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. अनेक व्यक्ती अशा असतात. त्यांच जीवन नेहमी निराशांनी भरलेल असत आणि ते नेहमी दुःखी कष्टी होतात. त्या व्यक्तींना स्वतःबद्दल खूप वाईट वाटत. मी तर इतक भगवंतांचा पूजन करतो कधी कोणाचे वाईट व्हावे असा विचार देखील करत नाही.

तरीसुद्धा मी आनंदी का नाही. माझ्या वाट्याला नेहमी दुःखच का येत. त्या व्यक्तीच्या मनात नेहमी भावना अशी येत असते. मला भगवंतांनी दर्शन द्याव व मला एखादी सिद्धी प्राप्त व्हावी मी इतकी पूजा करतो याच चांगल काहीतरी फळ मिळाव. याच कारण म्हणजे त्या व्यक्ती पूजा पाठ करताना निर्मळ मनाने, स्वच्छ अंतकरणाने पूजा करत नाहीत. त्या व्यक्ती भगवंतांचे पूजन करतात. मात्र भगवंतांच्या पूजेमध्येही त्या व्यक्ती सौदेबाजी करत असतात.

तेव्हा मी तुला हे दिल मला ते दे अस करणाऱ्या व्यक्तींची प्रार्थना कधीही भगवंत मान्य करत नाहीत. कारण भगवंतांना हे मान्यच नाही. अनेक व्यक्ती मनासारख झाल नाही तर भगवंतांना दोष देत असतात. आपल्या अशा परिस्थितीला भगवंतच कारणीभूत आहे. भगवंतच माझ्याकडे लक्ष देत नाही. मी केलेल्या पूजेच हेच फळ का अस म्हणतात. परंतु जे भगवंतांना दोष देतात त्या व्यक्ती आजही दुःखी आहेत. कालही दुःखी होत्या आणि उद्याही दुःखीच असणार.

सर्वात आधी तर आपण केलेल्या पूजेचा देखावा करू नये मी भगवंताबरोबर सौतेबाजी तर अजिबात करू नये. देवाच मंदिर म्हणजे काही दुकान नवे कि आपण पैसे देऊन जे मागाल ते घेता येईल. काही व्यक्तींना नवस बोलण्याची खूप सवय असते. तेव्हा मला हे दे मी तुला ते वाहीन, माझ अस काम कर मी तुला भंडारा करेन. कारण भगवंत हे आपल्या श्रद्धेचा भुकेलेला आहे पैशाचा नव्हे. अनेक जण असे असतात.

जय भगवंतांचे नामस्मरण करतात भगवंत श्रद्धा मिलिन होतात. अनेक जण असे असतात जे फक्त भगवंतावर श्रद्धा ठेवतात. त्यांचे नाम जप करतात नामस्मरण करतात. उपासना करतात परंतु देवाकडून कशाचीही अपेक्षा करीत नाहीत. अशा लोकांना देव भरभरून देत असतो. शिवाय या व्यक्ती आपल्या पूजेचा देखावा देखील करत नाहीत.

त्या नास्तिक व्यक्ती असतात त्या देवांना मानत नाहीत. परंतु नेहमी प्रयत्नशील असतात. स्वतःच्या हिमतीवर ते पुढे जातात. आपले काम जिद्दीने आणि चिकाटीने करतात. जे देव देतो तेच मनापासून आत्मसात करतात स्वीकार करतात आणि त्याच व्यक्ती जीवनात सफल होतात. परंतु ज्या व्यक्ती भगवंतांचे पूजन करतात.

व्यक्ती भगवंतावर सर्व काही सोडून देतात. प्रयत्न सोडतात आणि भगवंतांना दोष देत बसतात.आजारी पडले तरी डॉक्टरकडे न जाता भगवंतालाच म्हणतात देवा मला का आजारी केल. अस प्रत्येक गोष्टीत भगवंताला ओढून कसे चालेल. भगवंतांचे पूजन केलेल नामस्मरण केलेल कधीही वाया जात नाही.

आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळत. पण आपण सांगितल आणि त्याच वेळेत ते आपल्याला मिळाल अस कस चालणार भगवंत कोणत्या रूपात आणि कशा रूपात काय देईल हे सांगता येत नाही. ते त्याच्यावर अवलंबून आहे.ते त्याच्या पद्धतीने फळ आपल्याला नक्कीच देत असते. मला हे मिळाल नाही ते मिळाल नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. ज्यावेळी आपण दुःखी कष्टी होऊन बसतो. मात्र अस कधीही करू नये.

भगवंतावर विश्वास ठेवावा आपल्या कर्माची फळ आपल्याला मिळालंच. परंतु आपले प्रयत्न आपण सोडू नये. कधीही भगवंताला दोष देत बसू नये. एकदा पूजन झाल की आपापल्या कार्याला लागाव आणि बाकीच्या गोष्टी भगवंतावर सोडून द्याव्यात.भगवंतांचे निर्णय भगवंतालाच घेऊन द्यावे. आपले निर्णय त्याच्यावर लाधू नयेत. भगवंतांची पूजा करून झाल्यानंतर ना भगवंतांना सांगाव हे प्रभू मला आशीर्वाद द्या.

आपल्या कामावर शंभर टक्के लक्ष द्यावे. बुद्धीचा भरपूर प्रमाणात वापर करावा. इतरांना आनंद आपण जेवढा देऊ त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदा आपल्याला मिळत असतो. अशा लोकांना देव भरपूर देत असतो. दिवसभर पूजा पाठ करीत बसण आपल्या कामावर लक्ष न देणे आणि भगवंताला दोष देत बसणे. हे तुम्हाला तरी पटत का.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *