स्वामी महाराजांची सेवा करताना नक्की करा हे उपाय सर्व चुका होतील माफ…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली जाते. स्वामीभक्त दुःख भीती चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. आपण रोज स्वामींची उपासना करतो. पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो. पण या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिली आहे. आपण स्वामींच्या सेवेमध्ये काही कुठेतरी कमी पडलो आहे असे वाटत असते.

काहीतरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीये. असे आपल्याला वाटत राहते तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचा आशीर्वाद हे मिळतच असतात. आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच. परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात.

ते नियम आपल्याला पाळावे लागतात. स्वामी हे पूर्ण विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्व सन्याशी आहेत. स्वामी स्वयंभू आहेत. ते भक्तांसाठी रूप घेतात. स्वामींना जात धर्म सांप्रदाय नाही. स्वामी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटातून मुक्त करणारे आहेत. मोहा पासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. रागावर त्यांचे नियंत्रण आहे.

स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणार नाही व ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. अपराधांना क्षमा करतात स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्री वचन हे अविनाशी त्रिकालवादी सत्य आहे. मित्रांनो आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत. या रोजच्या आपल्या स्वामी पूजनांमध्ये करायचे आहेत.

जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच. या तीन गोष्टी जरी आपण केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल. स्वामींचे सेवेचे फळ आपल्याला मिळेल. जर आपण नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही फक्त या गोष्टी स्वामी सेवेमध्ये करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करावी.

१) सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या आद्याचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज तीन अध्ययन वाचावेत. कारण त्यात २१ अध्ययन असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्ययन होतील. पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा कारक मंत्र म्हणावा.

२) कारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचे ११माळी जप करावे. हे न चुकता रोज करावे. आपण देवघरात बसतो.

३) या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी. जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल. तसेच एका ग्लास मध्ये पाणी ठेवावे. आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे.

अशाप्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी. म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये या तीन गोष्टी नक्की करा. तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *