सर्व नकारात्मकता संपेल वास्तुशास्त्राचे अत्यंत प्रभावी सोपे उपाय.. जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात बरकत येण्यासाठी आपण खूप धडपड करतो. परंतु काही दैनंदिन नियम पाळले. काय करावे आणि काय करू नये याविषयी थोडीफार जाण ठेवली तर आपली भौतिक कामे सोपी होतात आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते.घरात बरकत येते.

हातात पैसा खेळू लागतो. पैसा येण्याचे मार्ग आपोआप दिसू लागतात. घरात सुख,संपन्नता आणि समाधान नांदते. घरातील वातावरण शांत प्रसन्न व उत्साही राहते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार काय करावे व काय करू नये ते

१) सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीही नारळ फोडू नये. कारण नारळ हे ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीक आहे. सोमवारी व एकादशीच्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना त्रास होतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दाखवतो.

२) कधीही गाय दारात आली तिला खाऊ घालावे. हिरवा चारा डाळ गुळ पोळी आपल्याला जे काही शक्य होईल ते गाईला खायला घाला. गाईला कधीही खाऊ न घालता हाकलून देऊ नये. कारण दाराशी आलेली गाई आपले दोष आणि संकटे घेण्यासाठी येत असते. जर तिला आपण तसेच हाकलून दिले आपली संकटे आणि दोष दूर न होता ती वाढत जातात.

३) आपल्या घरातील शिळे झालेले अन्न कोठेही न फेकून देता. मुक्या प्राण्यांना खाऊ घालावे. यामुळे पंचप्राण यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.

४) भर उन्हाळ्यात जर आपल्याकडून कोणी पाणी मागितले किंवा भर उन्हाळ्यात मुका प्राणी आपल्या दारात येऊन उभा राहिला तर आपल्या हातात कितीही महत्वाचे काम असेल ते सोडून त्यांना आधी पाणी देऊन त्यांची तहान भागवावी. कारण उन्हाळ्यात आणलेल्या व्यक्तींची किंवा प्राण्यांची तहान भागवल्यास यापेक्षाही कोणत्याही मोठे पुण्य नाही .

५) तसेच रस्त्याने चालत असताना अंध अपंग वृद्ध या व्यक्तींना आपली आवश्यकता असेल तर त्यांना मदत जरूर करावी. त्यामुळे आपण दोन पाच मिनिटात खूप मोठे पुण्य कमवतो. कारण वृद्ध अपंग अंध व्यक्तींन मदत केल्यास ते खूप मनापासून आशीर्वाद देतात.

६) घरातील झाडू नेहमी आडवा ठेवावा. झाडू कधीही उभा ठेवू नये. झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. म्हणून कधीही झाडूला पाय लावू नये.तसेच झाडू नेहमी लपून ठेवावा. बाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या दृष्टीस झाडू पडणार नाही त्याची काळजी घ्यावी.

७) मीठ कधीही खाली पडू देऊ नये आणि जर मीठ खाली पडले तर त्यावर पाय पडू देऊ नये. ते लगेचच उचलून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रातून मिळते आणि देवी लक्ष्मी ही समुद्रातूनच प्रकट झालेली आहे. म्हणून मिठाचा आणि देवी लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. मिठाला ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून घरातील मीठ कधीही संपूर्ण संपू देऊ नये. मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू देवी लक्ष्मी स्वरूप आहेत.

८) संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. म्हणून संध्याकाळच्या वेळी मीठ झाडू आणि पैसे या वस्तू कोणालाही देऊ नयेत. म्हणजेच घराबाहेर काढू नयेत.

९) आपल्या देवघरात कळशाची स्थापना जरूर करावी. घरात कलश नसेल तर देवघर अपूर्ण असते.म्हणून देवघरात डाव्या बाजूला कळशाची स्थापना करावी आणि उजव्या बाजूला दिवा लाववा.

१०) ताईला आपण माता मानतो म्हणून दूध, ताक, दही, लोणी या वस्तू गाईपासूनच मिळतात. त्या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूपात आहेत. त्यामुळे या वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर काढू नयेत.

११) कधीही कोणाला फसवून कोणाची प्रॉपर्टी पैसा संपत्ती लुबाडून घेऊ नये. यामुळे त्या व्यक्तीचे आपल्याला तळतळाट लागतात आणि तळतळाट लागला असेल तर त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. अशा घरातून देवी लक्ष्मी निघून जाते. अशा घरात बडकत राहत नाही.

१२) घरातील व्यक्तींचा मान ठेवावा. आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची ही जाणीव ठेवावी. आपल्याला कोणी थोडीशीही मदत केली असेल तर ती मदत कधीही विसरू नये.त्या व्यक्तीला गरज पडल्यास आपणही धावून जावे.

१३) कधीही कोणाशी कपटाने वागू नये.कट करस्तान करू नये. एकत्र कुटुंब पद्धतीत देवी लक्ष्मीचा वास असतो.म्हणून शक्यतो एकत्र कुटुंबात राहण्याचा प्रयत्न करावा.खुपच आवश्यक असेल तरच वेगळे राहावे.

१४) सकाळी लवकर उठावे. स्त्रियांनी लवकर उठून घराची व अंगणाची स्वच्छता करावी. दररोज दारात सडा मारावा आणि रांगोळी काढावी. त्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. अंगणात एक छोटेसे स्वस्तिक जरूर काढावे.तसेच पुरुषांचे स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर देवघरात धूप दिवा लावावा.

हा रोजचा नियमच करून घ्यावा. त्यानंतर चहापाणी करावे. सर्वांनीच आपले कामे वेळच्यावेळी पूर्ण करण्याची सवय लावावी. मित्रांनो हे काही नियम आहेत जय दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला खूप उपयोगी पडतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *