वास्तुदोष निवारण यंत्र स्थापना विधी व लाभ, असे करा घरातील सर्व वास्तूदोष दूर.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

वास्तुशास्त्रानुसार घरात काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अनेक वास्तू उपाय सांगितले जातात. त्याचप्रमाणे वास्तु यंत्र वापरून घरातील नकारात्मकता दूर ठेवली जाते. असे म्हणतात की वास्तु यंत्र आपल्या घरात सकारात्मकता कवच पसरवते. नकारात्मकता दूर ठेवते घरात सकारात्मकता येते आणि कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करते.

वास्तु यंत्र घरी कामाच्या ठिकाणी कार्यालयात कारखाना किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी ठेवली जाऊ शकतात. चला तर मग वास्तुदोष वैशिष्ट्येच्या बद्दल आणि त्यामुळे सर्वोत्तम प्रभाव कसा प्राप्त होईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपण एखाद्या घरी राहत असतो तर त्या घरात रहिवाशांच्या शांततेत बाधा आणली जाऊ शकते.अशा घटनेमध्ये वास्तु निवारण यंत्र बचावासाठी उपयोगात आणले जाऊ शकत.आपण ज्या घरी राहतो तिथे अनेक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा अनेक जण आपल्या प्रगतीबद्दल वाईट विचार करत असतात.

तर अशावेळी आपल्या घरात शांतता असावी. यासाठी वास्तु निवारण यंत्र बचावासाठी लावण्यात येतात. अशी अनेक यंत्र आहेत ते आपले वास्तू दोष निवारण दूर करू शकतात. आपल्या घराला संपत्ती शांती आनंद सुसंवाद आरोग्य हे सर्व जपण्याचा दावा या यंत्रामुळे केला जातो.

अष्टधातूचे चौकोन यंत्र- हिंदू ज्योतिष शास्त्रात अष्ट धातूला खूप महत्त्व आहे. यात निसर्गात आढळणाऱ्या पाच महत्त्वाच्या धातू आहेत. सोन, तांबे,चांदी,पितळ आणि लोहा वास्तु धातू यंत्रामध्ये या सर्वांचा समावेश केल्याने घरात शांतता येते आणि आपल वास्तु चक्र म्हणजेच आपल्या घरातील ऊर्जा प्रवाहवर त्याचा प्रभाव पडतो.

मात्र हे वास्तु यंत्र कुठे ठेवा व कोठे लावावे हे अनेकांना माहिती नसत.हे यंत्र ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपल्या घराची जमीन बांधकाम करण्यापूर्वी किंवा बांधकाम झाले असेल तर आपल्या घराची माती खोदून त्यामध्ये हे यंत्र ठेवावे.

जर आपण फ्लॅटमध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर वास्तू यंत्र ईशान्य दिशेला ठेवाव. कारण ही दिशा योग्य मानली जाते. म्हणतात की सूर्य उगवल्यानंतर त्याच्या पहिला प्रकाशाचा किरण इशान्य दिशेला टाकतो. शिवाय ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. त्यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश जेव्हा खिडकीतून चमकतो वास्तु यंत्र अधिक यशस्वीपणे कार्य करत अस म्हणतात.

त्यामुळे तुम्ही हे यंत्र ईशान्य दिशेला ठेवू शकता. तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला हे यंत्र ठेवाव. आग्नेय दिशेला स्त्रियांच आश्रय स्थान मानले जाते. तुमच्या कुटुंबातील महिला सदस्यांचे कल्याण आणि सुरक्षितता सुचिनिश्चिचत करत असे म्हणतात. त्यामुळे सुद्धा अग्नेय दिशेला अष्ट धातूचे यंत्र लावल जाऊ शकत. शिवाय आपल्या दारावर वास्तू यंत्र टांगता येऊ शकत.

दारावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह प्रमाणे वास्तू यंत्र लावणे सुद्धा प्रभावी ठरू शकत. वास्तु यंत्राचा वापर सजावटीच्या वस्तू आणि कार्यात्मक म्हणूनही केला जाऊ शकतो. वास्तू यंत्र साधारणपणे कुठेही ठेवता येत असला तरी ते आरशाजवळ किंवा काचे जवळ नसावे. त्याचे नकारात्मक किंवा सकारात्मक दोन्हीही परिणाम होऊ शकतात. वास्तु यंत्र घरामध्ये सकारात्मक पसरवत असलेली सर्व ऊर्जा आरसा प्रतिबिंबत करेल.

सर्व प्रवेशद्वारावर वास्तू यंत्र प्रामुख्याने जमिनीखाली ठेवले असल्यामुळे भौतिकता अनेक लोक असे म्हणतात की, एखाद साधन भांड्यात गाडणं किंवा जमिनीत गाडणे यात फरक असतो. त्याचप्रमाणे वास्तु यंत्र कुठे ठेवावे. यावर वेगवेगळ्या लोकांची मते भिन्न आहेत. ते सुद्धा वास्तुदोष निवारणासाठी तुम्हाला यंत्र ठेवायच असेल तर ते ज्योतिष शास्त्राच्या मार्गदर्शनाने नक्की ठेवाव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *