३ जून २०२३ वटपौर्णिमेनंतर “या” राशींना लाभ!. आता कसलीही काळजी करण्याची गरज नाही.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

वटपौर्णिमा आपल्याकडे खास असते. वटपौर्णिमेला सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याण्याची प्रार्थना करतात. पण ज्योतिष शास्त्रानुसार वटपौर्णिमेनंतर काही राशींसाठी खरच कल्याणच कल्याण असणार आहे. कस चला जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला हे तर माहितच असेल की ग्रह परिवर्तन करत असतात. म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. त्याचा परिणाम मग सर्वच राशींवर होत असतो. जाहिराशींना फायदा होतो तर काही राशींना तोटा होतो. असेच ग्रह परिवर्तन जून महिन्यामध्ये सुद्धा होणार आहे.वटपौर्णिमेनंतर जे ग्रह परिवर्तन होणार आहे. त्याचा काही राशींना फायदाच बघायला मिळणार आहे.

या राशी कोणती आहेत आणि त्यांना कसा फायदा होणार आहे. १५ मे २०२३ रोजी सुर्याने वृषभ राशि मध्ये गोचर केले आहे. तर आता बुध ग्रह सुद्धा ७ जून २०२३ रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे राजयोग तयार होणार आहे. बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुधादित्य राज योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. सूर्यदेव आणि बुधदेव यांच्यासाठी आहे राशींच काही राशींचा भाग्य उजळून निघणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोग बनल्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. या योगाचा फायदा कसा होणार आहे आर्थिक लाभ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. व्यवसायात सुद्धा नफाच होणार आहे. अविवाहितांना सुद्धा चांगली स्थळे सांगून येऊ शकतात.

२) कर्क रास- कर्क राशींच्या लोकांना सुद्धा आर्थिक आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काय चांगला असणार आहे. कारण हा योग तुमचे उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात सकारात्मक सुधारणा येताना तुम्हाला दिसून येईल. या दरम्यान तुम्हाला प्रवास देखील करावे लागतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये नव्या संधी मिळते. तसेच पदोन्नती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.

३) सिंह रास- सिंह राशीला सुद्धा अचानक धनलाभ पाहायला मिळेल. या काळात नोकरी व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरदार लोकांचे वेतन सुद्धा वाढेल. व्यवसायिकांना हा काळ चांगलाच म्हणावा लागेल. पैसे मात्र वाचवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कोणत्याही धार्मिक कार्यात तुम्ही भाग घ्याल.

या होत्या त्या राशी ज्यांन बुधादित्य राजयोगाचा फायदा होणार आहे. पण मंडळी तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला व्यवसायामध्ये बरकत हवी असेल तर तुम्हाला बुध ग्रह चांगल्या स्थितीत असायला हवा. बुधाची स्थिती चांगली कशी होते गणपतीची पूजा आराधना केल्याने बुध ग्रह मजबूत होतो आणि व्यवसाय चांगला चालतो.

म्हणूनच तुम्ही गणपतीची उपासना करा. गणपतीची उपासना तुम्ही कशा प्रकारे करू शकता. दिवसातून एकदा अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र आठवणीने म्हणा. त्यामुळे तुमच्या बुध ग्रहाची स्थिती मजबूत होईल जी तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल. गणपती बाप्पा मोरया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *