२५ मे २०२३ गुरुपुष्यामृत योग उत्पन्न वाढीसाठी आवश्य करा हे उपाय…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येत तेव्हा त्या दिवसाला म्हणतात गुरुपुष्यामृत योग आणि हा सगळ्याच कार्यांसाठी शुभ मानला जातो. याच गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही तुमचे उत्पन्न वाढाव यासाठी काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फळ प्राप्त होते. कोणत्याही ते उपाय चला जाणून घेऊयात.

मित्रांनो गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. अस मानल जात की त्या सुवर्णामध्ये वृद्धी होते. सोनू आपल्याकडे वाढत जातो जर आपण ते गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केले असल्यास. गुरुपुष्यामृत योग इतका शुभ आहे. पण तरीसुद्धा या दिवशी विवाह मात्र केले जात नाहीत. विवाह करण्यासाठी पुष्य नक्षत्र वर्ज मानले जाते. याचं काय कारण आहे ते सुद्धा जाणून घेऊयात.

ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख उल्लेख आहे. त्यापैकीच एक आहे पुष्य नक्षत्र आणि हे अतिशय खास आहे. हे नक्षत्र मी मगाशी म्हटल तसे हे जेव्हा गुरुवार येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते. हा अतिशय दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा.

या नक्षत्राचे चिन्ह आहे गाईचे स्तन गाईचं दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले जाते. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गाईच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखा आहे. पौष्टिक लाभकारी शरीराला आणि मनाला शांती देणार. या नक्षत्रात तीन तारका दिसतात. जे बाणा प्रमाणे दिसून येतात.पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनि आणि म्हणूनच हे नक्षत्र विवाहासाठी वर्ज आहे. इतर कामासाठी शुभ असल तरी विवाहासाठी वर्ष मानले जाते.

२०२३ मध्ये दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग येत आहे. तो ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी अर्थात २५ मे २०२३ ला गुरुवारी सकाळी ०५:२६ मिनिटांनी ते संध्याकाळी ०५:५५ मिनिटांत पर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे. याच योगात तुम्हाला एक उपाय करायचा आहे. जो तुमचे उत्पन्न वाढवायला मदत करेल. त्यामध्ये एक जो उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पण ते हे जाणून घ्या की पूजा, स्नान,दान,खरेदी, हे सर्व करण लाभदायक असत.

धार्मिक श्रद्धा अशी आहे की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त जप केला तर त्याचा तुम्हाला विशेष लाभ होतो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जो उपाय तुम्हाला करायचा आहे. तो असा आहे ” ज्योतिष शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळे कपडे घालावेत. तसंच शक्य झाल्यास आंघोळ करताना पाण्यामध्ये हळद टाकावी.

स्नान आणि ध्यान केल्यानंतर देवतांची विशेष करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा करून दिवा लावावा. यादरम्यान पिवळी फुले हळदी धूप दीप हे सर्व माता लक्ष्मीला अर्पण करावे. शेवटी श्रीसूक्त किंवा श्री महालक्ष्मी अष्टक या स्त्रोत्रांपैकी कोणत्याही एका स्त्रोताचा पाठ करावा.

गुरुपुष्ययोग धनत्रयोदिशीय योगांसारखाच फलदायी मानला जातो. म्हणून या दिवशी सोन चांदी जमीन घर वाहन या सर्व गोष्टी खरेदी करण्या अतिशय शुभ मानल्या जातात. या दिवशी जर तुम्ही गुंतवणूक केली तर विशेष लाभकारी ठरते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *