१० मे पासून या ५ राशीना इच्छापूर्तीचा काळ, आता हवे ते मिळणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१० मे पासून ५ राशींची इच्छापूर्ती होणार आहे. अस काय घडणार आहे त्या राशींच्या जातकांच्या जीवनात चला जाणून घेऊयात. मित्रांनो नवग्रहांचा सेनापती मानले गेलेला मंगळ ग्रह. १०मे रोजी बुधाच्या मिथुन राशीतून चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करत आहे. मंगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह आहे. मंगळ आता कर्क प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. मंगळाच्या कर्क प्रवेशाने कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरू शकेल. वैवाहिक जीवनातील नाराजी दूर होऊ शकेल. कुटुंबातील इतर सदस्यांची सुद्धा संबंध सुधारतील. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी कामगिरी वाढेल. पालकांच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मंगळाच्या शुभ प्रभावाने तुमची ती इच्छा सुद्धा या काळात पूर्ण होईल. कारण काळच इच्छा प्रतीचा आहे.

२) सिंह रास- सिंह राशीसाठी सुद्धा इच्छापूर्तीचा काळ आहे. अभ्यासासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर यावेळी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जोडीदाराशी वाद वाढू शकतात. त्यामुळे थोड संयमाने घ्या. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल. परंतु यशामुळे तणाव कामे होऊ शकतो. अर्थात तुम्ही कामासाठी प्रवास कराल ज्या कामासाठी प्रवास कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

३) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा मंगळाचा कर्क प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरेल. पण शुभ परिणाम होणार म्हणजे नक्की काय होणार अहो त्यांच्या आर्थिक समस्या कमी होतील. प्रेम संबंध दृढ होतील. आर्थिक बाबतीत हा काळ उत्कृष्ट आहे. नोकरी आणि व्यवसायात सुद्धा काही चांगल्या संधी समोरून येतील. आर्थिक योजना त्यांच्या यशस्वी होतील.

४) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्ती सुद्धा या काळात प्रगती करू शकते. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी त्यांना मिळेल आणि त्याचा त्या लाभ ही घेतील. त्यांच्या कामाच कौतुकही होईल. कौटुंबिक आणि कार्यालयीन कामांमध्ये संतुलन राखण सुद्धा यांना चांगल्या प्रकारे जमेल. कोणत्याही प्रकारच्या वादापासून मात्र तुम्ही थोडा दिवस लांब लांब राहा. कार्यालयात पदोन्नतीची शक्यता आहे. अधिकार वाढू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्ती या काळामध्ये विरोधकांना पराभूत करू शकतील. कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतील. आतापर्यंत पुढे जाण्यात जे अडथळे येत होते ते अडथळे आता दूर होतील. नोकरीत तुमच कौतुक होईल. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. चुकीची संगत मात्र टाळा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

मित्रांनो तर या होत्या पाच राशी दहा मे पासून इच्छापूर्तीचा काळ आहे. पण प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. आता योग आहे गोष्टी आपोआप घडतील अस नाही.तुम्हची जी इच्छा आहे ती पूर्ण तुम्ही आधी प्रयत्न करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *