नमस्कार मित्रांनो.
१९ मे ला आहे शनि जयंती राशीनुसार जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला लाभ होईल. म्हणजे समस्या कोणत्याही प्रकारची असू दे शारीरिक मानसिक आर्थिक अशी कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या तुम्ही तुमच्या राशीनुसार उपाय करा त्याचा तुम्हाला लाभ होईल. पण मग करायचंय काय चला जाणून घेऊयात.
शनि देवांना कर्मफलदाता म्हटल जात. आपल्या चांगल्या वाईट करण्याची फळ अशी निधी आपल्याला देत असतात म्हणूनच तुम्ही जर शनि जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार उपाय केलात तर त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या अडचणी दूर होतील.
१) मेष रास- ज्या जातकांची मेष रास आहे त्यांनी शनि जयंतीच्या दिवशी रुद्राभिशेक करा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. २) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींनी शनि जयंतीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करवा.
३) मिथुन रास- मिथुन राशींच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथकृत नील शनि स्तोत्र पाठ करावा.
४) कर्क रास- कर्क राशींच्या लोकांनी लोखंडी वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात आपल प्रतिबिंब बघून ते तेल दान कराव.
५) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी काळे तील किंवा अख्खे उडीद दान कराव.
६) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तीने एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो शनि देवांचा बीज मंत्र आहे. मंत्र याप्रमाणे “ओम प्रां प्री`प्रौ स: शनैशचराय नमः ”
७) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीच्या दिवशी शमी वृक्षाला जल अर्पण करावे. आणि शमी वृक्षाची पूजा करावी. ८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तीने जयंतीच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला असहाय्य व्यक्तीला मदत करावी किंवा अन्नदान करा.
९) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींनी शनि जयंतीच्या दिवशी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर खाऊ घालायचे आहे.
१०) मकर रास- मकरराष्ट्रीय व्यक्तींनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथकृत नील शनी स्त्रोत्र पाठन करावे.
११) कुंभ रास- कुंभ राशींच्या व्यक्तीने शनी जयंतीला शनि नक्षत्र आणि उत्तम गुणवत्ता असलेला शनीचा नीलम रत्न धारण करावा. पण हा धारण करताना तज्ञ ज्योतिष शास्त्राचा सल्ला मात्र नक्की घ्यावा.
१२) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तीनी शनि जयंतीच्या दिवशी खूप लहान असल्यान सोबत चांगल वागाव आणि एखाद्या धार्मिक स्थळाच्या मुख्य दाराची स्वच्छता करावी. म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन स्वच्छता करावी.
मित्रांनो याप्रमाणे म्हणजे तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे उपाय केलेत तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील. मंडळी राशीनुसार उपाय तर तुम्ही कराच पण त्याचबरोबर काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आई-वडिलांचा अपमान करणाऱ्या लोकांना शनिदेव कधीही माफ करत नाहीत. त्यामुळेच आपल्या आई-वडिलांची सेवा करा.
आई-वडिलांची सेवा करणाऱ्या लोकांवर नेहमी शनिदेव प्रसन्न होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्राण्यांना त्रास देऊ नका. मुक्या प्राण्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नका. हे सुद्धा हे कारण असतं शनिदेव क्रोधित होण्याच. त्याचप्रमाणे गोरगरिबांची असाह्य व्यक्तींची तुम्हाला जमेल अशी मदत करत रहा. त्यामुळे सुद्धा शनि देवाची कृपा आपल्यावर होते. जय शनि देव.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.