या ७ गोष्टींमुळे शनि देव होतात नाराज, बघा तुम्ही तर नाही ना करत या चुका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शनि देव म्हटल तर मनात थोडी भीतीच शनि देवांची आपल्यावर अवकृपा होऊ नये अस प्रत्येकालाच वाटत. पण तुम्हाला हे माहित आहे का तुमच्या काही सवयी शनिदेवांना नाराज करू शकतात. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर विपरीत होऊ शकतो. आर्थिक स्थिती खराब होण, लग्न न जमन, अशा अनेक समस्या तुम्हाला सतावू शकतात. कोणत्या आहेत ते सवयी चला जाणून घेऊयात.

१) शनि देवांना जुगार खेळणाऱ्या लोक आवडत नाही. त्यामुळे धननाश करणारी ही सवय आजच सोडून द्या. नाहीतर शनि देवांची अवकृपा होऊ शकते. २) शनि देवांना दारू पिणारी लोक सुद्धा आवडत नाहीत. त्यामुळेही सुद्धा सवय असेल तर आजच सोडा. त्यामुळे शनि देवांची अवकृपा तुमच्यावर होऊ शकते.

३) जे लोक परस्त्री बरोबर संबंध ठेवतात किंवा अनैतिक रित्या सहवास करतात. असे लोक सुद्धा शनि देवांना आवडत नाहीत. त्यामुळे महिलांचा आदर करा. माता-भगिनींचा दर्जा त्यांना द्या. ४) कोणाही विरुद्ध खोटी साक्ष देणे हे सगळ्यात मोठ पाप आहे आणि या कृतीचा शनि देवांना प्रचंड राग आहे. ही कृती तुमच्या हातून घडले शनिदेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

५) बरोबर निरपराधी माणस मुके प्राणी पक्षी यांना यातना देणारी माणस शनिदेवांना आवडत नाहीत. त्यामुळे तुमच्या हातून जर हे घडत असेल तर आता सावध व्हा. ६) आई वडील वडीलधारी माणस सेवक गुरु यांचा अपमान करणारी लोक सुद्धा शनि देवांना आवडत नाहीत.

७) अबला स्त्री घटस्फोट झालेली स्त्री सफाई कामगार किंवा अपंग अशा व्यक्तींचा अपमान सुद्धा शनि देवांना पसंत नाही. हे तुमच्या हातून घडल तर तुमच काय खर नाही.
८) दात स्वच्छ न ठेवणे वेळेवर स्नान न करन वेळोवेळी शिव्या देण व्यवहार करताना लबाडी करणे या गोष्टी सुद्धा शरीरावर आवडत नाही. आज ना उद्या या गोष्टीचा विपरीत फळ निश्चितच मिळत आणि म्हणूनच मंडळी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर आजच ती बंद करा.

त्याचबरोबर शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आई-वडिलांची सेवा करा. आई-वडिलांची सेवा करणारे लोकशाही देवांना निश्चितच आवडतात. त्याचबरोबर रोज मारुती स्तोत्राचा पठण करा. त्यामुळे सुद्धा मारुतीरायाची कृपा होते आणि मारुतीरायांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्यावर शनि देव सुद्धा प्रसन्न होतात.

तुम्हाला जर शनि देवांची साडेसाती चालू असेल तर काही त्रास असेल तर तुम्ही रोज काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. त्याचबरोबर अन्नदान करा. गरिबांना अन्नदान केल्याने किंवा त्यांच्या गरजा ओळखून दान केल्याने आपल्यावर शनि देव प्रसन्न होतात जे आपल्या जवळ आहे फुल ना फुलाची पाकळी तरी तुम्ही दान करा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ होईल.

मित्रांनो हे जर तुम्ही लक्ष देऊन ऐकल असेल तर चांगल वागा हेच शनिदेव सांगतात. शनिदेव न्यायदंडाधिकारी आहेत. जर तुम्ही चुकीच वागला तरी त्याचा तुम्हाला काहीही तोटा दिसतनसला तरी येणाऱ्या भविष्यात याचे फटके तुम्हला बसणार हे निश्चित त्यामुळे आताच सावध व्हा. जय शनि देव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *