नमस्कार मित्रांनो.
तुम्ही तुमच्या राशीनुसार जर घरात जर काही वास्तुशास्त्राच्या टिप्स फॉलो केल्या तर त्याचा तुम्हाला विशेष लाभ होतो. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही छोट्या-मोठ्या गोष्टींनी तुम्ही तुमच घरही सजवू शकता आणि तुम्ही तुमच्या राशीनुसार हे केल्यामुळे त्याचा तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक लाभ होऊ शकतो. पण मग कोणत्या राशीनुसार घरात काय बदल करायला हवेत चला जाणून घेऊयात.
मित्रांना तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल घरामध्ये चार माणस आहेत आणि चौघांच्याही वेगवेगळ्या राशी आहेत. प्रत्येकाने आपापल्या राशीप्रमाणे घरात बदल करायच म्हटल तर घराच काहीच ठिकाणावर राहणार नाही. म्हणूनच कुटुंबप्रमुखाच्या घरामध्ये वास्तु टिप्स फॉलो करायचे असतात. त्याचा सगळ्यांना घरात लाभ होतो. चला तर मग बघुयात राशीनुसार कोणत्या टीप्स फॉलो कराव्या लागतात.
१) मेष रास- मेष राशी चक्रातील पहिली रास आहे. ही अग्नी तत्वाची रास आहे. ही लोक नेहमी बहुतेक घटक शोधत असतात. राशीनुसार त्यांनी पूर्व दिशेला घर बांधावे. त्यांनी त्यांच्या घराचे द्वारही पूर्वेस दिशेला ठेवावे. तसेच दारावर स्वस्तिक लावल्याने सुद्धा यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. यांनी त्यांचे देवघर आहे ते ईशान्य दिशेला बनवावा.
घराच्या पूर्वेला जास्त भार मात्र देऊ नये. कमी फर्निचर त्या दिशेला ठेवावे. शक्य असल्यास पूर्व दिशा ओपन ठेवावे. पूर्वेकडे झाडे लावल्याने मानसिक आजार चिंता होऊ शकतात. मेष राशींच्या व्यक्तींच्या घरात काही वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर भागामध्ये त्यांनी झाडे लावावे. कोणत्याही पवित्र ठिकाणी पिंपळाच झाड लावाव.
२) वृषभ रास- वृषभ राशीची लोक स्वभावाने थोडी हट्टी असतात. पण सौंदर्य आणि कलात्मक गोष्टींना प्राधान्य देणारी असतात. त्यांच्या राशीनुसार आतल्या भिंतीस बेबी पिंक पांढऱ्या अशा प्रकारच्या छटा वापरू शकतात. त्यांनी आपल घर ईशान्य दिशेला बांधाव. आणि त्याच दिशेला प्रवेशद्वार ठेवावा. ही दिशा वृषभ राशीसाठी खूप शुभ मानले जाते.
सकारात्मकता आरोग्य संपत्ती शक्ती आणि समृद्धी या सर्वच गोष्टी या सर्वच गोष्टी त्यामुळे आकर्षित होतात. वृषभ राशीच्या व्यक्तींनी घरात मध्ये वास्तुदोष उपाय करताना घरामध्ये तुळशीचे झाड लावावे. घराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये घरात जड फर्निचर ठेवाव.
३) मिथुन रास- मिथुन रास ही वायू तत्वाची रास आहे. आणि यांना विरोधाभासी गोष्टी आवडतात. मिथुन राशीच्या लोकांनी आपल घर ईशान्य दिशेला बांधाव. कारण सकारात्मकता आणि समृद्धी यांना प्रदान करेल. वास्तुनुसार फिकट पिवळ्या रंगाच्या छटा उत्तम मानल्या जातात. त्यांना घराचा मधला भाग मोकळा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्या भागात तुम्ही गणपतीची मूर्ती मात्र ठेवू शकता. उपाय करायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांनी देवधर वृक्षाचे रोप लावाव. रोज तुळशीच्या रोपा जवळ दिवा लावावा.
४) कर्क रास- कर्क रास ही अतिशय संवेदनशील रास आहे. उत्तर दिशा ही यांच्यासाठी उत्तम आहे. उत्तरही संपत्तीचा स्वामी कुबेर यांच्याशी संबंधित आहे. हलका हिरवा किंवा पिस्ता रंग कर्क राशीसाठी चांगला आहे. घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला ठेवू शकतात. तसेच घराच्या पश्चिम दिशेला पिवळ्या रंगाची फुले असलेली झाडे लावावीत.
सकारात्मकतेसाठी हिरव्या रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवा. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर चांदीच स्वास्तिक लावा. त्याचबरोबर धावत्या घोड्याचा ही चित्र तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्र देखील स्थापित करू शकता.
५) सिंह रास- सिंह रास ही आक्रमक रास आहे.म्हणूनच पांढऱ्या रंगाच्या मिश्रानासह कोणताही चमकदार रंग या राशीसाठी अनुकूल ठरतो. सिंह राशीसाठी घर बांधण्यासाठी उत्तर पश्चिम दिशा ही उत्तम मानले जाते. वास्तू नुसार समृद्धी आकर्षित करण्यासाठी घराच्या उत्तर पश्चिम दिशेस चंद्राचा फोटो लावा. सिंह राशींच्या लोकांनी चांदीचे स्वस्तिक लावावे.
सिंह राशीच्या लोकांनी उपाय करण्यास झाल्यास सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे आयोजन करावे. घरात तुम्ही डाळिंबाचे झाड देखील लावू शकता. त्याचबरोबर त्या राशींच्या लोकांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी कपाळावर चंदनाचा टिळक करावा.
६) कन्या रास- पांढरा तपकिरी आणि हिरवा यासारख्या निसर्ग प्रेरित रंग कन्या राशीसाठी उत्तम आहेत. तुझ्यासाठी घर बांधण्यासाठी उत्तम दिशा आहे उत्तर पश्चिम दिशा यांच्या घराचा पश्चिम भाग अंगण बाग किंवा देवघरासाठी उत्तम आहे. कन्या राशीच्या लोकांनी उपाय करायचा झाल्यास कडूलिंबाचे झाड लावावे. वायव्य दिशेला केळीचे झाड लावा. गणपतीची मूर्ती घरात उत्तर दिशेला ठेवा.
७) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना घर सुंदर सजवायला आवडत. त्यांचं घर त्यांनी पश्चिम दिशेला बांधावा आणि त्यांचा प्रवेशदार उत्तर दिशेला असावा. त्यामुळे घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते. दरवाजावर स्वास्तिक लावल्याने शत्रू दूर राहतात. उपाय करायचा झाल्यास घरात मनी प्लांट लावा. घराच्या दक्षिणेला लाल बल्ब लावा. घराच्या दक्षिण भिंतीवर डोंगराचा फोटो लावा आणि आग्नेय दिशेला बांबूच छोटसं झाड लावा.
८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीची लोक स्वभावाने संवेदनशील असतात. पण आक्रमकही तितकेच असतात. त्यांच्या घरात पारंपरिक आणि सजावटीला कमीत कमी देतात. त्यांना उत्कृष्ट सजावट ठेवायला आवडते. या राशीसाठी पंचमुखी हनुमानाची मूर्ती स्थापन करणे ही अनुकूल ठरत. वृश्चिक राशीने उपाय काय करायचे ते बघूया.घराच्या छतावर जड वस्तू ठेवण्यात टाळा. घरात कधीही रद्दी साठू देऊ नका. सार्वजनिक ठिकाणी पिंपळाच झाड लावा. घराच्या उत्तर दिशेला तुम्ही फिश टॅंक ठेवू शकता.
९) धनु रास- धनु राशीला सर्वात जास्त परोपकारी रास मानल जात. गरजू लोकांना मदत करायला यांना खूप आवडत. जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या छटा धनु राशीसाठी योग्य ठरतात. प्रवेशद्वार मात्र उत्तर पश्चिम दिशेला ठेवण मात्र टाळा. त्यामुळे कुटुंब प्रमुखाला आजार होऊ शकतो. घरात तुळस अवश्य लावा. उपाय करायचा झाल्यास मंदिरा दिवा लावा. प्रवेशद्वाराजवळ असतात मग बुद्धाची मूर्ती ठेवा. घरातील सर्व पाणी साठवण्याच्या जागा स्वच्छ ठेवा.
१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांना मोठ मोठ फर्निचर आवडत. त्याचबरोबर त्यांना पांढऱ्या किंवा काळया अशा शेडमध्ये फर्निचर आवडत. त्याचबरोबर नैसर्गिक छटा त्यांना आवडतात. मकर राशीसाठी दक्षिण मुखी घर शुभ असत. मकर राशीच्या लोकांनी घरामध्ये स्पटिक श्री यंत्राची स्थापना करावी. काही सुखद सुगंध पसरवणारी यंत्र घरात ठेवा .
११) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांना घरात सामानाची खूप गर्दी आवडत नाही. त्यांना मोकळी जागा आणि कमीत कमी फर्निचर आवडत. कुंभ राशीच्या लोकांना निळ्या आणि राखाडी रंगाच्या छटा अनुकूल ठरतात. या राशीच्या लोकांनी अग्नेय दिशेला घर बांधाव.त्याचबरोबर घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक नक्की लावाव. कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या घराच्या ईशान्य दिशेला देवघर बनवावा.त्याचबरोबर घराच्या पूर्व दिशेला काही फुले झाडे लावावी. फुले लावणे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे.
१२) मीन रास – मीन राशी एक जरा तत्वाची रास आहे. त्यांना त्यांच्या घरी पाहुण्यांचे स्वागत करायला नेहमीच आवडत. मीन राशि साठी आग्नेय दिशा अतिशय शुभ आहे. प्रवेशद्वारावर स्वस्तिक ठेवल्याने सुद्धा यांना समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. हसणाऱ्या मुलांचे फोटो सुद्धा तुम्ही तुमच्या घरात लावा. आणि घराच्या बागेत चमेलीचे फुलाचे झाड लावा. त्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.