नमस्कार मित्रांनो.
२२ एप्रिलला गुरुचे राशी परिवर्तन झाले आहे.२२ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी गुरुने मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी सूर्य,बुध आणि राहू देखील मेष राशीतच असतील. गुरुच्या आगमनामुळे मेष राशीत चतुर गृही योग तयार होईल आणि राहूशी गुरु चांडाळ योग तयार होईल.
गुरु चांडाळ योग हा ३० ऑक्टोबर पर्यंत राहील. गुरु अजून अस्त स्थितीत राहील.२७ एप्रिल रोजी गुरु मेष राशीत उदयास येईल. कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल ते जाणून घेऊयात.
१) मेष रास – गुरुने मेष राशीमध्ये भ्रमण केले आहे. पण त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला गुप्ततेने काम करावे लागेल. अन्यथा यश मिळणे कठीण होईल. रागवू नका आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर चालू असणारी कामे बिघडू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात अडथळे येतील किंवा नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
२) वृषभ रास – गुरुचे संक्रमण तुमच्यासाठी धनहनी दर्शवत आहे. या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका. कारण ते पैसे अडकवू शकतात. जाणकारांच्या सल्याशिवाय गुंतवणूक करू नका.तुमचे नुकसान होऊ शकते.शैक्षणिक स्पर्धेशी संबंधित लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. परिणाम तुमच्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतात. वाद विवादाची परिस्थिती टाळा किंवा वाद मिटवा नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील.
३) कर्क रास – गुरुचे संक्रमण तुमच्या करिअरवर परिणाम करू शकते. नोकरदार लोकांची बदली होऊ शकते. या काळात तुमच्या अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमची कीर्ती आणि प्रसिद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो.तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
४) कन्या रास – तुमच्या राशींच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. गुरुच्या संक्रमणामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. वैवाहिक जीवनातही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगले वागा. अन्यथा गोष्टी वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याबद्दल मागे वाईट बोलू शकतात आणि तुमचा अपमान करू शकतात.
५) मकर रास – गुरुच्या संक्रमणामुळे कुटुंबात असंतुष्टा येऊ शकते. घरगुती तणावामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या त्रस्त होऊ शकता. कुटुंबातील सदस्यांची वादाची परिस्थिती टाळा. गोष्टींमध्ये यश मिळेल परंतु तुम्ही घरातून त्रासलेले राहू शकता. या दरम्यान बदलत्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मंडळी या राशींच्या लोकांनी विचार करून पावले टाका आणि स्वतःची काळजी घ्या.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.