नमस्कार मित्रांनो.
ज्योतिष शास्त्रानुसार देवांचा गुरु गृहस्पती जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या ज्ञान, बुद्धीमत्ता, शिक्षण, संतती, परोपकार, पिता-पुत्रांचे नाते तू का समृद्धीवर दिसून येतो.
२२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६:१२ मिनिटांनी गृहस्पती मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
तर २७ तारखेला गुरु मेष राशी मध्ये उदय होणार आहे. गुरुचा उदय होताच शुभ कार्याला सुरुवात होईल. दुसरीकडे गुरुच्या उदयामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहे. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या पहिल्या घरात गुरुचा उदय होत आहे. या राशीमध्ये गृहस्पती नवव्या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गुरुच्या उदयामुळे तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. तर नोकरदार वर्गाला प्रमोशन सुद्धा मिळू शकते. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला समाजात मानसन्मान प्राप्त होणार आहे.
२) मिथून रास- या राशीच्या अकराव्या स्थानी गुरु उदय होणार आहे. ज्याला इच्छा आणि समाधानाचे स्थान मानले जाते. अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. तर नवीन नोकरी शोधत असणाऱ्या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी गुरुचा उदय शुभ ठरू शकतो. यासोबतच आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.
३) कर्क रास- या राशीच्या दहाव्या स्थानी गुरूचा उदय होत आहे. त्यामुळे तुम्हाला करिअर, पद, प्रतिष्ठा यामध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर कष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. व्यवसायात लाभ सुद्धा होऊ शकतो.
४) सिंह रास- या राशींच्या लोकांसाठी गुरुचा उदय लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या नव्या स्थानी गुरुचा उदय होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो. पण यावेळी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
५) धनु रास- या भावात गुरू पाचव्या स्थानी उगवत आहे. हे घर बुद्धिमत्तेचे आणि मुलांचे मानले जाते. अशा स्थितीत या राशींच्या लोकांना व्यवसायात आणि नोकरीतच लाभ मिळू शकते. बरेच दिवस थांबलेले काम पूर्ण सुरु होऊ शकते. व्यवसायात थोडी अडचण येऊ शकते. परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक होऊ शकते.
६) मीन रास- या राशीच्या दुसऱ्या स्थानी गुरूचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. यासह उत्पन्नाचे नवे स्रोत्र मिळू शकतात. व्यवसाय इथे नफा होऊ शकतो. शिवाय तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची शक्यता आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.