अधिकाच्या महिन्याने सण लांबणार यंदाचे हिंदू वर्ष १२ नव्हे १३ महिन्यांचे..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

हिंदू नवीन वर्ष २०८० हे इंग्रजी वर्षाच्या २२ मार्च २०२३पासून सुरू झाले आहे. आणि यावर्षी १८ जुलै २०२३ पासून अधिक मास सुरू अधिक मास सुरू होणार आहे यंदाच्या हिंदू नववर्षात अधिक मास जोडला गेल्याने २२ मार्च २०२३ पासून सुरू झालेले हिंदू नववर्ष १२ नव्हे तर १३ महिन्याचे असणार असल्याचे सांगितले जाते तर चला जाणून घेऊयात याबद्दल काही महत्त्वाची माहिती.

दरवर्षी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला होते यावर्षी हे नव सविस्तर २२ मार्च २०२३ रोजी बुधवारपासून सुरू झाले या दिवसापासून चित्र नवरात्रीला ही सुरुवात झाली नवीन वर्ष हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानले जाणार आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे जी या वर्षाला इतर वर्षापेक्षा खास बनवते ती म्हणजे यंदा वर्षाचे महिने बारा नाही तर तेरा राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दर ३ वर्षानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो. याला अधिक मास म्हणून ओळखले जाते.

हिंदूनवीन वर्ष २०८० हे इंग्रजी वर्षाच्या २२ मार्चपासून सुरू झाले आहे. आणि यावर्षी १८ जुलै २०२३पासून अधिक मास सुरू होणार आहे. अधिक मास १६ऑगस्ट २०२३ रोजी संपेल. अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजेचा अनन्य साधारण महत्त्व आहे. यावेळी श्रावण महिना तब्बल दोन महिने चालणार आहे स्थितीत शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र त्यामुळे नागपंचमी श्रीकृष्ण जयंती गणेश चतुर्थी नवरात्र विजयादशमी दीपावली हे सण १९ दिवस उशिरा येणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. आणि चंद्र वर्ष ३५४ दिवसांचे असते या दोघांमधला फरक हा ११ दिवसांचा आहे. सूर्यमाला संक्रांतीपासून संक्रांतीपर्यंत असते तर तो चंद्रमाळ पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत असते.

यावर्षी चंद्र महिना असेल जो मलमास म्हणून ओळखला जातो. चंद्रमा सात किंवा मलमासात लग्न कार्य व इतर विधी करणे वर्ज मानलं गेला आहे. भारतातील सण ठराविक ऋतूंमध्ये यासाठी भारतीय पंचांगणात हे चंद्र सूर्य पद्धतीवर आधारलेले आहे यासाठी विशेष नियम तयार करण्यात आलेला आहे. ते पुढील प्रमाणे समजून घेता येते

मीन राशीत सूर्य असता ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. अशा पद्धतीने ही गणना होते कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चंद्र असताना महिन्याचा प्रारंभ होतो.

त्यावेळी तो पहिला अधिक मास आणि दुसरा तो निजमास समजला जातो या वर्षी कर्क राशीत सूर्य असताना १८ जुलै रोजी आणि१७ ऑगस्ट रोजी अशा दोन चंद्रमासंचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावण मास आले आहेत. त्यामुळे हे वर्ष तेरा महिन्यांचे असणार आहे. अशी माहिती पंचांग तज्ञ देत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *