नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना असून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्रमा आल्याने सूर्यग्रहण होत असते. त्याबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो ग्रहणाविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. निसर्गामध्ये होणारा हा अद्भुत देखावा. प्रत्येकाच्या मनामध्ये मोठ कुतूहल निर्माण करीत असते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे ज्योतिष शास्त्रानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रहणाचे वेद अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात.
ग्रहण कालावधीमध्ये काही कामे करणे वर्जित मानले जाते.२०२३ मध्ये होणारे पहिले सूर्यग्रहण अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण मित्रांनो हे सूर्यग्रहण मेष राशी मध्ये होणार असून यावेळी मेष राशीमध्ये राहू असणार आहे. राहुलच्या उपस्थितीमध्ये सूर्यग्रहण पार पडणार आहे. मेष राशीत या वर्षाचे पहिले ग्रहण होणार असून मेष राशि बद्दल राहू तर असेलच पण सोबतच गुरुचा प्रवेश देखील होणार आहे.
राहू आणि गुरुच्या उपस्थितीमध्ये हे ग्रहण होणार असून या ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक संपूर्ण बारा राशींना प्रभावीत करणार आहे. काही राशींसाठी हे ग्रहण नकारात्मक ठरणार असले तरी या पाच राशींसाठी ग्रहणाचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या पाच राशीचा भाग्यदयो घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.
मित्रांनो चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या गुरुवार दिनांक २० एप्रिल २०२३ अश्विनी नक्षत्रावर मेष राशी मध्ये हे खग्रास सूर्यग्रहण होत आहे. ग्रहण कालावधी २० एप्रिल सकाळी ०७:०६ मिनिटापासून दुपारी १२:३० मिनिटापर्यंत राहणार आहे. ग्रहणाचा सुतका कालावधी जवळपास साडेपाच तासांचा असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेध पाळणे गरजेचे नाही म्हणजे ग्रहणाचे वेद पाळले जाणार नाहीत.
मित्रांनो हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, दक्षिण पूर्व आशिया अशा काही भागांमध्ये दिसेल पण भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेद पाळण्याचे जरी कारण नसले तरी ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण दिसो अथवा न दिसो नकारात्मक अथवा सकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करत असतो.
अश्विनी नक्षत्रावर मेष राशीमध्ये होणाऱ्या हे सूर्यग्रहण या पाच राशींसाठी साठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) वृषभ रास- वृषभ राशीसाठी मेष राशी मध्ये होणारे हे खग्रास ग्रहण शुभ फलदायी ठरणार आहे. वृषभ राशीच्या जीवनातील आर्थिक संकटे आता सामान होणार असून आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. धनलाभाची योग जमून येतील. मानसिक ताण तणाव दूर होईल. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.
सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान वाढणारा असून वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पती-पत्नी मधील वाद आता मिटणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. नातेसंबंध मजबूत बनणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येतील. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडामोडी घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या मोठ्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. संतान सुखाची प्राप्ती देखील आपल्या घरी या काळामध्ये होणार आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्या मध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. मिथुन राशीच्या कलाकार लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याची योग आहे.
३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्राचे अतिशय शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरमध्ये संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होईल. सरकार दरबारी आढलेली कामे पूर्ण होतील.
या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार असून नोकरीच्या मध्ये अधिकारी प्रसन्न असते. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग व्यापारच्या दृष्टीने शुभ घडामोडी घडून येतील. आपले स्वप्न साकार होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल राहणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा आवश्यक आहे. व्यवसाय निमित्त प्रवास घडतील.
४) तुळ रास- तूळ राशी वाल्यांसाठी ग्रह नक्षत्रांच्या मध्यम फुल आपल्याला प्राप्त होणार असून येणार काळामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. अतिशय सुंदर सुरुवात होणार आहे. मेष राशी मध्ये होणारे हे खग्रास ग्रह आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या राशीवर ग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. इथून पुढे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक तणाव दूर होईल.
मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. अरे दिवसापासून बंद पडलेले कामे पुन्हा सुरू होतील. अवघड उठणारे कामे सहज पूर्ण करून दाखवणार आहात. जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत बनत आहेत. व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. पारिवारिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील. मनासारखा जोडीदार आपल्याला मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शत्रूपासून थोडेसे सावध राहणे गरजेचे आहे. महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका.
५) धनु रास- धनु राशीसाठी मेष राशी मध्ये होणारे सूर्यग्रहण शुभ फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग बनत आहे. सूर्यग्रहण धनलाभ घेऊन येणार आहे. पद प्रतिष्ठा मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे अवघड वाटणारी कामे सहज सोपी करून दाखवणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मोठी प्रगती जीवनामध्ये घडून येणार आहे.
आपल्या महत्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. या काळात जर आपण आपले कर्म चांगले ठेवले आणि चांगले कर्म केले तर निश्चित मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. सासरच्या मंडळीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. त्याबरोबर विद्यार्थी वर्गालाही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. नोकरदार करण्यासाठी काळ शुभ ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.