कसा असतो वृश्चिक राशीचा स्वाभाव. जाणून घ्या स्वभाव वैशिष्ट्य गुण आणि बरेच काही.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी राशीचक्रातील आठवी राशी म्हणजे वृश्चिक राशी. नक्की काय आहे या वृश्चिक राशीचे गुण वैशिष्ट्ये आणि स्वभाव याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये वृश्चिक राशी बद्दल एका शब्दात सांगायच झाल तर अतिशय तीक्ष्ण व्यक्तीमहत्त्व वृश्चिक ही राशीचक्रातील आठवी रास असून या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. निडर बिनधास्त आणि नेतृत्व यांच्याशी संबंध जोडणारा हा ग्रह आहे. जलतत्त्वाची राशी असून राशीचा वर्ण हा विप्र.

विप्र म्हणजे ब्राह्मण म्हणजे स्वतःची एखादी गोष्ट शिकून ती गोष्ट दुसऱ्यांना शिकवण त्यामध्ये त्यांचा हातखंड अतिशय उत्तम समजला जातो. नैसर्गिक रित्या ही मंडळी शिक्षक आणि चांगली टीकाकार सुद्धा असतात. गोड बोलून खोड मोडण यांच्यासारख कोणाला जमत नाही आणि म्हणूनच यांच्या या स्वभावाचा ज्यांना अनुभव येतो ती मंडळी यांच्यापासून थोड सावध राहण पसंत करतात.

कोणाचा अपमान करायला यांना स्वतःहून बिलकुल आवडत नाही. उलट दुसऱ्या मध्ये असणारे चांगले गुणधर्म हेरून त्यांना होईल तितकी मदत करायला या वृश्चिक राशीच्या मंडळींना अगदी मनापासून आवडते. परंतु अति शहाणपणा करणाऱ्यांना मात्र त्यांची जागा त्यांना दाखवून देतात आणि म्हणूनच मनामध्ये खोट असलेली चुकीची वागणारी मंडळी यांच्यापासून जरा लांबच पळतात किंवा यांना आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात.

मंगळ ग्रहाचा या राशीवर प्रभाव असल्यामुळे सडेतोड स्पष्ट बोलायला आणि न घाबरता यांना फार आवडत. यांच्या याच स्पष्ट आणि खरे बोलण्याच्या स्वभावृत्ति मुळे समाजातील कुटुंबातील मित्र परिवारातील काही वेळेला शूल्क गोष्टींवरून शूल्क कारणांवरून सुद्धा वाद निर्माण होतात. परंतु जी मंडळी खरे वागणारी असतात त्यांना मात्र वृश्चिक राशीच्या व्यक्ती फार आवडतात.

अस म्हणा ना गोड बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खर आणि स्पष्ट बोलणारी माणस की नेहमी दुसऱ्याच्या यशाचा मार्ग खऱ्या अर्थाने प्रशस्त करत असतात. मार्गदर्शन करत असतात. अस असल ना ही वृश्चिक राशी ही जलतत्त्वाची राशी असल्यामुळे तितकीच संवेदनशील सुद्धा राशी समजली जाते. कोणत्याही विषयावर कोणत्याही मुद्द्यावर लोकांवर विचार करताना नेहमीच दुसऱ्याच्या फायद्याचा अगदी कल्याणचा मनापासून विचार ही वृश्चिक राशीची मंडळी करतात.

परंतु त्यांच्या फटकळ स्वभावामुळे काही माणस त्यांच्यापासून बऱ्याचदा कायमची दुरावली जातात. जशास तसे असा यांचा खाते असतो. त्यामुळे चुकीच्या लोकांचे कधीही समर्थन ही कधीच करत नाहीत आणि अशा चुकीच्या लोकांविषयी जास्त विचार सुद्धा करत नाहीत. एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याचा मात्र हा गुणधर्म फार महत्त्वाचा एकमेव असा सुंदर वैशिष्ट्य पूर्ण गुणधर्म समजला जातो.

यामुळे यांच्याबरोबर एखादी गोष्ट आपण शेअर केली असेल यांच्याबरोबर जर तुम्ही सल्लामसलत केली असेल तरीही मंडळी जीव गेला तरीही ती गोष्ट बाहे जाहीर करत नाहीत किंवा एखाद्या वरचा विश्वास संपादन करणे आणि तो विश्वास संभाळणे त्यामध्ये ही मंडळी नेहमीच अग्रेसर असतात. तसेच कोणतीही जबाबदारी अंगावर घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणूनच काही वेळेला यांच्या मनावर नेहमी एखाद्या कामाच मनावर ते दडपण राहत.

यासाठी यांनी मेडिटेशन आणि योगा करणे अतिशय उत्तम समजले जातात. मानसिक प्रभुत्व वाढविण्याकरिता मंगळ ग्रहाची राशी असल्यामुळे स्वभाव धाडसी आणि नेतृत्व करणारा असतो. तसेच स्वभाव मध्ये काही प्रमाणात हट्टीपणा सुद्धा असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण घेतलेला निर्णय ही मंडळी सहसा बदलत नाहीत आणि दुसऱ्यांना आपल्या कामात आपल्या निर्णयात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळ बिलकुल करून देत नाहीत.

त्यांना ते बिलकुल आवडत नाही. स्वभावामध्ये उग्रता थोडी जास्त असते. परंतु जितका लवकर राग येतो तितकाच तो राग लवकर शांत होतो. तसेच वृश्चिक राशीचा वर्णविप्र असल्यामुळे सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा जबरदस्त असते. आशा कार्यामध्ये मंडळी यशस्वी सुद्धा होतात. याच आणखीन एक कारण म्हणजे वृश्चिक राशी ही स्थिर स्वभावाची असते.

त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करताना त्या कामाबद्दलची असणारी संपूर्ण माहिती वेगवेगळ्या माध्यमातून गोळा करणे माहिती जाणून घेणे आणि त्याच व्यवस्थित नियोजन करण ती त्यांच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वीची अतूट असते. त्यामुळे अर्थातच बऱ्यापैकी कामातील यश मिळण्याची जी शक्यता आहे. ती वृश्चिक राशीच्या बाबतीत स्थिरस्वाभावामुळे ती जास्त मोठ्या प्रमाणात असते.

वृश्चिक राशीच्या मंडळींना गुड विषयक अभ्यासाची सुद्धा गोड असते आणि त्यामुळे साधना उपासना मंत्र पाठ या गोष्टी करायला यांना मनापासून आवडतात. याचा अर्थ असा नाही की ही मंडळी अंधश्रद्धाळू आहेत. तर त्यांना आध्यात्मिमधील त्यांना सायन्स शोधायला फार आवडते. माहिती करून घ्यायला यांना आवडत.

प्रत्येक राशीच्या स्वभावामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुणधर्म लपलेले असतात. चांगले आहेत तसे वाईटही असतात. तस वृश्चिक राशीच्या बाबतीमध्ये आपण काही चांगल्या गोष्टीचा आणि वाईट गोष्टींचा अनुभव घेतलाच परंतु राशी स्वामी मंगळ असल्यामुळे हा जर मंगळ पत्रिकेमध्ये बिघडलेला असेल तर सुबह मध्ये जुगारी पद्धती आढळते.

त्यामुळे व्यवहारातील आर्थिक निर्णय व्यवहारिक शहाणपणाना न घेतल्यामुळे नुकसान करताना दिसतात आणि कर्जबाजारी सुद्धा यांच्या आयुष्यात आलेले दिसतात. एखाद्या व्यसनेच्या नादी लागणे तर व्यसनापासून मुक्तता होण त्यांचे बाबतीमध्ये थोडासा अवघड समजले जातात. मंगळ बिघडला असेल तर. आरोग्याचा विचार केला तर पित्त आणि कपाचा त्रास यांना सांभाळावा लागतो.

रक्ताचा दोष, ऍसिडिटी, ब्लड प्रेशर, मधुमेह , किडनीचा आजार यावर यांना लक्ष ठेवाव लागत. त्याचप्रमाणे मुळव्याधी सारखे आजार गुप्त इंद्र यांच्या आजार स्त्रियांच्या बाबतीत म्हणायच झाले तर गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीच्या बाबतीमध्ये वृश्चिक राशीच्या स्त्रियांना फार सांभाळावा लागत.

वृश्चिक राशीचा करिअरचा अभ्यास जर आपण तपासला संरक्षण विभाग, पोलीस खात सैन्यदल,त्याचप्रमाणे मेडिकल सायन्स,वैद्यकीय क्षेत्र त्यांच्यासाठी जास्त अनुकूल राहत.कोणत्याही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावरून काम करण्यासाठी ही मंडळी जास्त मेहनत घेतात. त्याचप्रमाणे ही मंडळी युनियन लीडर म्हणून सुद्धा ही मंडळी काम करतात. लीडरशिप कॉलिटी यांच्यामध्ये भरभरून भरलेली असतात.

एखाद्या सामाजिक किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करताना ही मंडळी आढळतात. तसेच लोक शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही मंडळी यशस्वी होतात. गुड शास्त्राच्या विषयांमध्ये ही मंडळी ज्योतिष शास्त्र अंकशास्त्र आशा विभागामध्ये या मंडळींचे करिअर ही यशस्वी होताना दिसतात. बऱ्याचदा वार्षिक राशीच्या मंडळींना स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त कल असतो.

तोही भागीदारी शिवाय कारण त्यांचा विचार जो असतो नेहमी स्वतंत्रपणे विचार प्रकट करण्याचा स्वभाव असल्यामुळे शक्यतो भागीदारी मध्ये यांनी व्यवसाय करू नये. यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मानसिक शांततेसाठी गणेशाची उपासना यांच्यासाठी म्हणजे वृश्चिक राशीसाठी उत्तम मानली जाते. गणपती अथर्वशीर्ष चे पठण करणे यांच्यासाठी शुभ राहत. त्याचबरोबर दुर्गा स्तोत्राचा पठाण यांनी आवश्यक कराव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *