व्यक्तीच्या आवडत्या रंगावरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्व आणि ह्या मजेदार गोष्टी…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीची निवड वेगळी असते. समुद्र शास्त्रानुसार जोडीदाराला आवडणाऱ्या रंगावरून आपण त्याचा स्वभाव ओळखू शकतो. यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभाव ओळखण्यास मदत होते. लोकांच्या पसंतीच्या रंगानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वा बद्दल काही रंजक गोष्टीही जाणून घेता येतात.

आवाज ज्या प्रकारे शांतता दूर करतो तसे विविध रंग जीवनातील शांतता दूर करतात आणि जीवनात विविध रंग भरतात. ज्याप्रमाणे पांढऱ्या कपड्याला रंग लावल्याने त्या कपड्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे रंगाची निवड ही माणसाचा स्वभाव सांगते. चला तर मग जाणून घेऊयात.

१) लाल रंग- लाल रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. अनेकांना लाल रंग खूप आवडतो. ज्या लोकांना लाल रंग आवडतो. अशा लोकांना नवीन लोकांशी बोलायला जास्त आवडते. अशी व्यक्ती खूप धैर्यवान आणि आत्मविश्वासी असतात. हे लोक खूप आशावादी असतात.

२) पिवळा रंग- ज्या लोकांना पिवळा रंग आवडतो ते खूप आनंदी असतात ‌. या लोकांना आयुष्यात मजा करायला जास्त आवडते. ही लोक खूपच कल्पक असतात. या लोकांना आयुष्यातील प्रत्येक दिवस खूप आनंदाने जगायला आवडते. हा रंग अध्यात्मिक तसेच प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या रंगाने प्रभावित लोक संवेदनशील असतात. इतरांना मदत करण्याची भावना त्यांच्यात खूप प्रबळ असते. ज्या लोकांना पिवळा रंग आवडतो ते एक तर लाजाळू किंवा मजेदार स्वभावाचे असतात.

३) हिरवा रंग- ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ते लोकं खूप उदार आणि दिलदार असतात. असे लोक खूप प्रेमळ स्वभावाचे असतात. अशा लोकांना सर्वांना आनंदी ठेवायला आवडते. त्यांना बदल करायला आवडतो तरीही ते बुद्धिमान असतात. त्यांच्याकडेही अनेक कल्पना असतात आणि त्या आधारे ते कामही करतात. त्यांच्याकडे प्रचंड स्पर्धात्मक क्षमता असते आणि ते कधीही जोखीम घेण्यास चुकत नाहीत.

४) गुलाबी रंग- अनेकांना गुलाबी रंग खूप आवडतो. ही लोक खूप प्रेमळ असतात. ते इतरांबद्दल खूप संवेदनशील असतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे खूप वाईट वाटत. त्यामुळे अशा व्यक्तीशी बोलताना जरा विचारपूर्वक बोला.

५) पांढरा रंग- ज्या लोकांना पांढरा रंग आवडतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूप सकारात्मक आणि आशावादी आहे. ज्या लोकांच्या मनात कोणतेही कपाट नसते. रंगाप्रमाणे त्यांचे मन देखील शुद्ध असते.

६) काळा रंग- अनेकांना काळा रंग खूप आवडतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूप शक्तिशाली आहे. ते अतिशय प्रतिष्ठित आणि दृढनिश्चयी असतात. असे लोक त्यांची मते खूप ठामपणे सांगतात. ही लोक फणसासारखे असतात. बाहेरून जरी कठीण असतात तरी मनाने मात्र मृदू असतात.

७) तपकिरी रंग- काही लोकांना तपकिरी रंग खूप आवडतो. असे लोक खूप प्रामाणिक असतात. हा रंग आवडणारी लोक कधीच कोणाला फसवू शकत नाहीत.

८) निळा रंग- ज्या लोकांना हा रंग आवडतो. ते पृथ्वीवरील सर्वात प्रेमळ आणि सहकार्य करणारे लोक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनात नातेसंबंध अध्यात्म याचे महत्त्व जास्ती असते. जे लोक शांततेच्या शोधात असतात त्यांनी या रंगाच्या व्यक्तींकडे जायला हवे.

९) जांभळा रंग- जांभळा रंग आवडणारी लोकं खूप मोकळ्या मनाचे असतात. हे गृहस्थ व्यक्तिमत्व आहे. ही लोक मनमिळाऊ असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *