नमस्कार मित्रांनो.
मंडळी पन्ना रत्न यालाच पाचू रत्न सुद्धा म्हणतात. हा बुध ग्रहाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी परिधान केला जातो. या रत्नाला विशेष महत्त्व आहे. पण कोणीही पन्ना रत्न परिधान करू शकत नाही. हा रत्न काही राशींसाठी उत्तम तर काही राशींसाठी हानिकारक राहू शकतो. त्यामुळे काही राशींनी हा रत्न चुकूनही परिधान करू नये. चला तर मग याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
१) वृषभ रास – मित्रांनो वृषभ राशीसाठी पन्ना रत्न खूप खास मानले जाते. बुध आणि शुक्राचे चांगले संबंध असल्यामुळे वृषभ राशींसाठी हा रत्न उत्तम आहे. वृषभ राशींच्या लोकांनी हा रत्न परिधान केल्यावर नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात चांगली प्रगती होते.
२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी पन्ना रत्न खूप खास मानला जातो. या राशींच्या लोकांचा आत्मविश्वासही वाढतो आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहत.
३) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना हा रत्न खूप फायदा देतो. म्हणून सिंह राशींच्या लोकांनी हा रत्न परिधान करू शकता.
४) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांनी पन्ना रत्न परिधान करायला पाहिजे. याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
५) मीन रास- मीन राशींच्या जातकांनी पन्ना एखाद्या इतर रत्ना सोबत धारण करा. यासाठी आधी ज्योतिषीय सल्ला घ्या. कारण पन्ना रत्न धारण करणे तुमच्यासाठी कधीकधी आणि कारक सुद्धा ठरू शकते.
६) मकर रास – मकर राशींच्या लोकांनी पन्ना रत्न कधीही धारण करू शकता.
७) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांनी पन्ना धारण करण्या अगोदर ज्योतिषीय सल्ला आवश्यक घ्या आणि पन्नाला विशेष परिस्थितीत नीलम रत्न सोबत धारण करा.
८) कर्क रास- कर्क राशींच्या लोकांनी हा रत्न कधीच परिधान करू नका.
९) मेष रास- मेष राशींच्या जातकांना पन्ना रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
१०) तुळ रास- तूळ राशीसाठी पन्ना रत्न चांगला असतो आणि चांगलाही असतो. त्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्यानेच हा रत्न परिधान केला पाहिजे. मुळात कुंडली मध्ये बुध ग्रह कोणत्या स्थितीत आहे हे बघून हा रत्न परिधान करावा की नाही असा सल्ला दिला जातो.
पन्ना रत्न धारण केल्यानंतर व्यक्तीची बुद्धी वाढते आणि लॉजिक क्षमता तेज होते. पन्ना रत्न तुम्ही चांदीच्या अंगठीमध्ये हातांच्या बोटांमध्ये परिधान करू शकतात. पन्नाला बुधवारी सायंकाळी सुरुवातीला गाईच्या कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा आणि त्यानंतर धूप जाळून बुध मंत्रांनी तीन माळ जप करत. हे रत्न धारण करावे.
पन्ना रत्न धारण केल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. याच्या प्रभावाने मानसिक विकारांमध्ये सुधारणा होते. ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर असतो. त्यांनी मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी पन्ना धारण केला पाहिजे. ज्या लोकांना बोलण्यात त्रास होतो किंवा बोबडे बोलतात त्यांना पन्ना रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.