नमस्कार मित्रांनो.
मुली जन्माला आल्या की, घरात चैतन्य आनंद येतो. घरातील वातावरण प्रसन्न राहते. ज्या घरी मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो अस म्हटल जात. सर्वच मुली शुभ असतात आणि सर्वच मुली कर्तुत्वान असतात. मात्र काहींना जास्त संघर्ष करावा लागतो तर काहींना अगदी सहज कोणतीही गोष्ट प्राप्त होते. शास्त्रानुसार काही महिन्यात जन्मलेल्या मुली यांच्या साक्षात महालक्ष्मीचा अंश असतो अस म्हटल जात.
त्या खूप भाग्यवान असतात आणि यामुळेच घराच भाग्य उजळून टाकतात. कोणत्या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली साक्षात महालक्ष्मीचे रूप असतात चला जाणून घेऊयात.
काही महिने खूप शुभ असतात. या महिन्यांमध्ये जर मुलींचा जन्म झाला तर ते खूप शुभ मानल जात आणि साक्षात महालक्ष्मीच रूप मानल जात यामुळे फक्त आई-वडिलांकडेच नाही तर सासरी सुद्धा भाग्यवान समजल्या जातात.
त्यांच्या सासरसाठी सुद्धा लक्ष्मीची प्रतीक त्या मानले जातात. या मुली प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःच चांगल स्थान निर्माण करतात आणि स्वतःला सिद्ध करण्यात कधीही मागे हटत नाहीत. स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी सतत त्या प्रयत्नशील राहतात आणि स्वतःला सिद्ध करूनच दाखवतात अस म्हटल जात.
१) फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात आणि खूपच बुद्धिमान स्वभावाच्या असतात अस म्हणतात. लग्न करून सासरी जाणाऱ्या या मुली स्वतःबरोबर सुख आणि समृद्धी सुद्धा आणतात असेही म्हटले जाते. यामुळे मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप सुख समाधान ऐश्वर्या प्राप्त होत अस म्हटल जात.
२) एप्रिल मध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानल जात. हिंदू धर्मशास्त्रानुसार हा महिना खूपच शुभ समजला जातो. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात. ज्यामुळे या मुली प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात. या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तेथे त्यांना कशाची कमी भासत नाही अस बोलल जात. सोबतच ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो. त्या मुलांचा भाग्य आणखीनच उजळत अस म्हटल जात.
३) तिसरा शुभ मानला जाणारा महिना म्हणजे जून या महिन्यांमध्ये जन्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात.परंतु अंकशास्त्रानुसार हा महिना मुलांच्या जन्मासाठी अशुभ मानला जातो. या महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीच रूप मानल जात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात. मात्र त्या आपली ध्येय गाठण्यासाठी खूपच मेहनत करतात.
४) ज्योतिष शास्त्रानुसार पुढील शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना या महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र बुध आणि शुक्र या तिन्ही ग्रहांच मिलन होत. यामुळे या महिन्यात जन्मलेल्या मुली खूप श्रीमंत असतात त्यांना त्यांच्या नशिबामुळे सर्व काही प्राप्त होत.
या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता जाणवत नाही आणि जे घर धनधान्याने संपन्न असते त्याच घरी या मुलींचा विवाह होत असतो अस सांगितल जात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.