१८ मार्च २०२३ पापमोचनी एकादशीला ४ गोष्टी करा, सर्वच समस्या मिटतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१८ मार्चला आहे पापमोचनी एकादशी आणि या एकादशीला तुम्ही चार गोष्टी केल्यात ना तर तुमच्या आयुष्यातली ज्या काही समस्या असतील त्या लगेच सुटतील. मग त्या समस्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या पण मग कोणत्या आहेत त्याच्यावर गोष्टी चला जाणून घेऊयात.

१) जर तुमचा कोणताही व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये नफा कमी झाला असेल म्हणजे नफा वाढण्याऐवजी कमी कमी होत चालला असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता. पापमोचनी एकादशीच्या दिवशी अर्थात येत्या १८ तारखेला अकरा गोमती चक्र आणि तीन एकाक्षी नारळ घ्या. आता तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा.

धूपदीपत्यांनी या सगळ्याची पूजा करा आणि पूजेनंतरही गोमती चक्र आणि नारळ पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून तुमच्या कार्यालयात किंवा दुकानात मुख्य दरवाजा जवळ टांगून ठेवा. पापमोचनी एकादशीच्या दिवशी हे केल्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला व्हायला लागेल.

२) जर तुमचे पैसे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडेच आहेत आणि तो आता तुमचे पैसे तुम्हाला परत करत नसेल किंवा तुम्हालाही अस झाले असेल कस मागायच तर तुम्ही एक उपाय करू शकता. पापमोचनी एकादशीच्या दिवशी गोमती चक्र घ्या आणि संध्याकाळी प्रार्थना करा.

अंधार पडल्यावर एखाद्या निर्जन ठिकाणी जा आणि तिथे घराच्या बाहेर रिकाम्या जागी एक खड्डा खाणून श्रीविष्णूचे नामस्मरण करतानाच त्या खड्ड्यामध्ये गोमती चक्र टाका आणि तो खड्डा मुजवून टाका. देवाला प्रार्थना करा त्या व्यक्तीला समृद्धी दे की तुमची पैसे ते परत करेल. या उपायामुळे बुडालेले पैसे परत मिळतात असे म्हटले जाते.

३) जर तुम्हाला नोकरीमध्ये बढती हवी असेल तर एकादशीला एक शहाळ आणि आठ बदाम घेऊन भगवान विष्णूंच्या मंदिरात अर्पण करा. तसंच भगवान श्रीहरी विष्णूच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा. असे केल्याने नोकरीत बढती वाढण्याची शक्यता वाढते.

४) जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समजते असतील काही अडचणी असतील प्रत्येक मुद्द्यावर भांडण होत असतील तर पापमोचन एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर देवघरासमोर बसा एका भांड्यामध्ये एका ग्लास मध्ये पाणी भरा आणि त्यात थोडा गुळ आणि फुल घाला. आता भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करा. “ओम नमो नारायणाय” किमान एक जप माळ तरी करा.

या प्रकारे नामस्मरण केल्यानंतर तुमच्या नात्यातील अडचणी दूर व्हाव्या यासाठी देवाकडे प्रार्थना करा पाणी ठेवलेले पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी घाला. पापमोचनी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे नात्यांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि दुरावा दूर होतो अस म्हटल जात.

पापमोचनी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुमची सर्व पापातून मुक्तता होईल आणि लक्षात घ्या सध्या जे तुम्ही भोगत असतात तुमचाच काही ना काही पूर्वीच कर्म असते आणि त्या पाप कर्मातून मुक्ती हवी असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत नक्कीच करा. सगळ्या कामातून मुक्तता सकाळी लवकर आंघोळ करा.

त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करा. पूजेमध्ये तुपाचा दिवा लावा. जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा. लक्षात घ्या की प्रार्थना करताना पुन्हा माझ्या हातून अस घडू नये.

यासाठी सुद्धा भगवंताकडे विनंती करा आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी दिवसभर भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणामध्ये रहा. स्तोत्र म्हणा आणि द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी कथा ऐकून उपवास सोडा. मित्रांनो एकादशीच्या दिवशीचे हे व्रत तुम्ही नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *