नमस्कार मित्रांनो.
श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो ही स्वामी प्रार्थना. स्वामीभक्तहो आपल्या आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत एक अनुभव. बघा अनुभव काही साधा सुद्धा नाही अगदी मरणाच्या दारातूनही स्वामी कशा पद्धतीने आपल्याला परत आणू शकतात.
आणि स्वामींमध्ये ही ताकद आहे याची प्रचिती देणारा आजचा हा अनुभव आहे. तर हा अनुभव ज्या ताईंचा आहे त्यांच्या शब्दातच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर बघा आता त्या ताई काय म्हणतात ते ऐकूया तर बघा त्या ताई सांगतात.
नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव ज्योती संदीप पाटील मी जळगाव येथून आहे. ही जी घटना आहे ती २४/०५/२०२२ रोजी घडलेली आहे. त्या दिवशी झालं काय की माझी आई वडील भाऊ माझा मुलगा जळगाव वरून मुंबईला यायला निघाले होते. आता त्यापूर्वी त्यांनी स्वामींच्या सेवेचा थोडास थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे.
तर त्या काय म्हणतात की माझं कुटुंब म्हणजे माझं सासर आणि माहेर दोन्हीही कुटुंब स्वामी सेवेत अगदी पूर्वीपासून आहे. आणि त्यामुळे आमच्यावर स्वामींचे संस्कार खूप पहिल्यापासून झाले. आणि आता परिस्थिती आमच्या घरची म्हणजे परिस्थिती अशी आहे की आमच्या घरातले जे बाळ आहे किंवा त्याचे छोटी मुलं आहे ते जेव्हा बोलायला लागतात ना तेव्हाच आम्ही त्यांना श्री स्वामी समर्थ अस म्हणायला शिकवतो.
आणि तेही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जप बोबड्या बोबड्या भाषेमध्ये करत असतात.0त्यामुळे आमचं कुटुंब पूर्णपणे संपूर्ण कुटुंब हे स्वामीमय झालेला आहे. आणि स्वामींचे अनुभव आम्हाला आतापर्यंत खूप वेळेस आलेले आहे. आता मी स्वामी सेवेत आहोत म्हणजे आमच्यावर दुःख येत नाही किंवा संकट येत नाही असं नाही.
आपल्या आपल्या कर्माची फळ असतात ती भोगविच लागतात तसेच काही आमच्याही बाबतीत होत. दुःख येतात संकट येतात. परंतु यातून एकच सांगायचा आहे की प्रत्येक संकटातून आणि प्रत्येक दुःखातून स्वामी महाराज अलगतपणे बाहेर काढतात हा अनुभव आम्हाला प्रत्येक वेळेस येतो.
परंतु आज जो काही अनुभव मी सांगणार आहे तो खरोखरच खूप म्हणजे अगदी अंगावर शहारे आणणारा आणि त्या ठिकाणी जर स्वामी नसते तर कदाचित माझं पूर्ण कुटुंब उध्वस्त झालं असत. फक्त स्वामींच्या कृपेने आज आम्ही आनंदात आहोत. आणि त्या खूप मोठ्या दुखद घटनेतून आम्ही वाचलो आहे. तर ती घटना काय होती.
तर २४/०५/२०२२ रोजी माझ्या आई वडील भाऊ आणि माझा मुलगा जळगाव वरून मुंबईला यायला निघाले. आता मुंबईला येताना धुळे हायवे रोडला अचानक स्टेरिंग ब्लॉक झाल. आता स्टेरिंग लॉक झाल्यामुळे गाडी कंट्रोलच्या बाहेर गेली कारण काहीही करणं अशक्य झालं होत. आणि अशातच गाडी एका ठिकाणी खूप जोरात जाऊन धडकली.
आता गाडी जेव्हा त्या जागी जाऊन धडकली तेव्हा गाडीचा एकदम म्हणजे गाडीची अवस्था खूप वाईट झाली होती तर गाडीची अशी अवस्था झाली तर ती बघून कुणालाही असं वाटेल की ह्या गाडीमध्ये जे कोणी प्रवासी होते. किंवा जे कोणी बसलेले होते नक्कीच त्यांचा म्हणजे त्यांचे प्राण वाचू शकत नाही. असं प्रत्येकाला वाटू शकत.
परंतु त्याच ठिकाणी स्वामींची अशी प्रचिती आली की माझे जे कुटुंबीय म्हणजे माझे आई-वडील भाऊ आणि माझा जो मुलगा होता त्यांच्या केसांनाही धक्का लागला नाही. आणि खरोखर या गोष्टीवर थोड्यावेळासाठी कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु हीच गोष्ट आमच्या बाबतीत घडली. आणि माझे जे आई-वडील भाऊ आणि माझा मुलगा आज सुखरूप वाचले हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने झाले.
आणि या ठिकाणी स्वामींनी ही प्रचिती आम्हाला खूप मोठी प्रचिती दिलेली होती. आतापर्यंत आम्ही जी काही स्वामी सेवा केली असेल नक्कीच ती या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने आमच्या मदतीसाठी धावून आली. आणि तारक मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की आज्ञा विनाकाल ना नेय त्याला आणि याची प्रचिती या वाक्याची प्रचिती आम्हाला त्या ठिकाणी आली होती. बघा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेच प्रकार त्या ठिकाणी त्यांच्यासोबत घडला.
आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामी आले होते. आणि स्वामींनी चौघांनाही असं अलगत त्यांच्या हातावर उचलून ठेवलं. गाडीचं नुकसान झालं परंतु जे माझे जवळचे नातेवाईक होते नातेवाईक म्हणण्यापेक्षा माझे आई-वडील भाऊ आणि माझा जो मुलगा होता म्हणजे अगदी माझा जीव त्यांच्यामध्ये अडकलेला होता ते चौघही आज सुखरूप आहेत.
एवढेच माझ्यासाठी खूप आहे. आणि स्वामींनी माझ्यावरच संकट अशा पद्धतीने दूर केल. एवढंच मला या अनुभवातून सांगायचं आहे. आणि असं म्हणून त्या ताई मी तुमचा अनुभव थांबवलेला आहे. तर बघा स्वामी भक्त हो खरोखर स्वामी कुठल्या रूपामध्ये येतील व्यक्तीच्या रूपामध्ये येतील किंवा अन्य मार्गाने येतील. परंतु स्वामी महाराज आपल्या मदतीला धावून येतात हे तितकच खरं आहे.
बघा पुढे त्या ताईंनी हेही सांगितलं होतं की ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस असे एक्सीडेंट अगोदरही झालेले आहे. आणि जे म्हणजे आजूबाजूचे जे तिथे रहिवासी होते ते लोक होते त्यांनी जेव्हा ही गाडी बघितली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आतापर्यंत जेवढे एक्सीडेंट झालेले आहे ते त्यामध्ये कोणीही आतापर्यंत वाचलेलं नाही.
परंतु हे तुमच्या सोबत घडलं कसं काय खरोखर तुमच्या पाठीशी देव आहे आणि म्हणूनच तुमचं कुटुंब आज सुखरूप आहे. असं तिथल्या लोकांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा आमच्या तोंडातून हेच वाक्य बाहेर पडल. की आमच्या पाठीशी स्वामी आहेत तर आमच्या कुणीही वाकडं करू शकत नाही किंवा आमच्या केसालाही कधी धक्का लागू शकत नाही. आम्ही एवढेच त्यांना सांगितलं तर बघा.
खरोखर त्या ताईंनी खूप छान शब्दांमध्ये त्या तिथल्या लोकांनाही उत्तर दिल. आणि खरंच स्वामींचे लीलाही अशीच आहे. आपण जर स्वामींची सेवा केली तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कुठल्या माध्यमातून आपल्या मदतीला धावून येत असतात.
स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत. तर कसा वाटला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामींचे असेच अनुभव सगळ्यांना येऊ स्वामींची कृपा सगळ्यांवर राहू हीच एक स्वामी चरणी प्रार्थना. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.