तुळशी जवळ कधीही ठेवू नये ‘या’ ७ वस्तू नाही तर अनर्थ घडेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला देवी मानले गेले आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदूंच्या घरासमोर तुळशी असते. दारासमोर तुळस असणे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ आहे. दारात जर तुळस असेल आणि घरात जर काही वस्तू दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो. हिंदू धर्मातील स्त्रिया सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला तांब्याचा कलश घेऊन पाणी अर्पण करतात हळद-कुंकू अर्पण करून तिची पूजा करतात व संध्याकाळी तुपाचा दिवा लावतात आणि सर्वांसाठी तुळशीला प्रार्थना करतात.

ज्यांच्या दारातील तुळस हिरवीगार असते त्यांच्या घरात सुख व समाधान असते. परंतु कधी कधी आपण तुळशीची पूजा करतो त्याचे योग्य प्रकारे निगा राग तो तरी सुद्धा त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. परंतु आपल्याला याचे काय कारण समजत नाही तर अशा काही वस्तू आहेत त्या वस्तू तुळशीजवळ ठेवू नयेत. आणि ज्या द्वारे तुळशीच्या आसपास किंवा आपल्या आसपास नकारात्मक वातावरण निर्माण होईल.

१) त्यातील पहिली वस्तू म्हणजे केर कचरा आपण तुळशीची पूजा करतो परंतु तिच्या आसपास जर कचरा असेल तर तिला कसे काय वाढता येईल. कचऱ्यामुळे व त्यातील वातावरण हे अपवित्र होईल आणि तुम्हाला हे माहितीच असेल की जिथे तुळस असते ते नारायण यांचा म्हणजे स्वामी भगवान विष्णू भगवंताचा वास असतो आणि जिथे भगवान श्रीहरी विष्णू तिथे देवी लक्ष्मी परंतु तेथील वातावरण जर पवित्र नसेल.

स्वच्छता नसेल तर देवी लक्ष्मी देते कशी काय राहील. म्हणून तुळशीच्या आसपास कचरा जमा होऊ देऊ नका. तुळस व तुळशीच्या आसपासचे स्वच्छ पवित्र प्रसन्न असावे. यामुळे तुळस टवटवीत राहील व आपल्यालाही सकारात्मक परिणाम देईल.

२) दुसरे म्हणजे तुळशीजवळ चपला ठेवू नये तुळस हे घराच्या बाहेर असते आणि त्याची आपण पूजा करतो पण बाहेरून कुठूनही आलो चपला काढून तुळशीजवळ ठेवतो. तुळस म्हणजे देवी आहे. आपण देवापुढे चपला कशा काढायच्या हा तुळशीचा तसेच श्रीहरी विष्णूचा आणि देवी लक्ष्मीचा अपमान आहे. म्हणून चपला कधी तुळशीजवळ ठेवू नयेत.

३) जर तुम्ही तुळशीला संध्याकाळी पाणी अर्पण करत असाल तर ते खूप चुकीचा आहे. तुळशीला कधीही रात्री पाणी अर्पण करायच नाही. तुळशीला नेहमी सकाळी पाणी अर्पण करावे. आणि तुळशीजवळ पाण्याने भरलेला कलश बादली व टाकी असून नये. जर पाण्याचा हौद आणि तुळस जवळ जवळ असतील तर ते त्वरित हटवावे. यामुळे तुम्हाला चांगले फळ मिळतच नाही. परंतु आपल्या जीवनात विपरीत घटना घडू लागतात. वाईट परिस्थिती निर्माण होते.

४) काही स्त्रियांना बाहेर उभे राहून केस विचारण्याची सवय असते. केस विचारल्यानंतर ना कंगव्यातून केस काढून तसेच बाहेर टाकून देतात. केस उडून तुळशीच्या रोपात अडकतात आणि केस हे नकारात्मकतेची प्रतीक आहे. त्याचे खूप विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर तसेच आपल्या घरावर पडू शकतात. तुळशीची पूजा करताना सर्वात आधी तिची स्वच्छता करावी तुळशीवर किंवा त्याच्या आसपास जर केस असतील तर ते लगेच काढून घ्यावेत.

५) काही स्त्रियांना तुळशीला सजवून ठेवणे खूप आवडते. यासाठी छोटीशी ओढणी त्या तिच्या अंगावरती टाकतात. यामुळे खूपच सुंदर दिसते. त्यामुळे ती ओढणी उन्हात असल्यामुळे लगेच फाटते तरीही ती तशीच ठेवलेली राहते हे चुकीचा आहे. आपण फाटलेले कपडे घालतो का देवीच्या अंगावरती फाटलेले कपडे तसेच कसे काय ठेवू शकतो.

म्हणून जर ती ओढणी फाटलेली असेल तर ती लगेचच बदलावी. जर बाहेरच्या धुळी मातीने ओढणी खराब झालेली असेल तर ती तिच्या अंगावरती टाकावी. एकादशी पौर्णिमा अशा दिवशी ही ओढणी घालावी. ती फाटली नसल्यास घेऊन परत टाका. अस्वच्छ ओढणी तसेच ठेवू नये.

६) सर्वांच्या अंगणात तुळस असते व काही लोकांच्या अंगणात कपडे सुकट टाकण्याची जागा ही तिथेच असते आणि त्यामुळे आपण वाळत घातलेल्या कपड्यांची सावली तुळशीवर पडत असते हे खूपच अशुभ मानले जाते. जर आपल्या कपड्यांची सावली तुळशीवर पडत असेल तर नकारात्मक सावली आपल्या घरावर पडते आणि म्हणून कपड्यांची जागा बदलावी किंवा तुळशीला उंचावर ठेवावे. म्हणजेच कपड्याची सावली तुळशीवर पडणार नाही.

७) जर तुमच्या तुळशीजवळ खिळे अशा टोकदार वस्तू असतील तर त्या त्वरित हटवा. अशा वस्तू तिथे ठेवू नयेत. काळ्या रंगाच्या वस्तू जसा काळा रंग काळे उडीद,काळे कापड अशा वस्तू तुळशीजवळ ठेवू नयेत. या वस्तूंमुळे तुळस बहरत नाही. जर तुम्ही तुळशीचे रोप गार्डनमध्ये लावल्या तर तेथील तुळशीच्या जवळ काटेरी झाड असेल व तुळशीच्या रोपात ती काटे अडकत असतील तर हा मोठा खूपच अशुभ योग आहे.

म्हणून ते काटेरी झाड तिथून लगेच हटवावे आणि ते झाड जरी गुलाबाचे असेल औषधी वनस्पती असेल तरी ते झाड तेथे ठेवू नये. त्यातून नकारात्मक ऊर्जा प्रकट होते व आपले विचार हे नकारात्मकतेने भरून जातात. आपल्या जीवनात नेहमी अडचणी निर्माण होतात म्हणून काटेरी झाड व तुळस एकत्र कधीच ठेवू नयेत आणि रात्रीच्या वेळी तुळशीच्या पानांना तोडू नये. तुळशीला रात्री हातच लावू नये. जर पाणी लागणार आहे तर ती आधी सूर्यास्ताच्या वेळी तोडून ठेवावीत.
मित्रांनो अशा प्रकारे तुळशीची निगा राखून पूजा करून तिला एकदम बहारदार टवटवित आणि स्वच्छ सुंदर ठेवावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *