नमस्कार मित्रांनो.
मंडळी एखाद्यासाठी प्रेम हे सर्वस्व असते. प्रेमात अखंड बुडालेल्या अनेक जण आपल्या अवतीभवती असतात. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे अस म्हटले जाते. परंतु दोन जण एकत्र आले की काही दिवसांनी परिस्थिती बदलते छोटे छोटे गोष्टींमुळे भांडणे गैरसमज वाद आणि नंतर नातं दुरावत. दोन प्रेमी युगल अचानक वेगळे होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार दोन प्रेमळ लोकांमध्ये ब्रेकअप झाले तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असालच अस नाही. कधी कधी कुंडलीतील ग्रह नक्षत्राची स्थिती बदलून एखादी छोटीशी गोष्ट नात्यात दुरावा आणते. चला तर मग जाणून घेऊयात कुंडलीत कोणते ग्रह दोष आहेत. ज्यामुळे प्रेमात दुरावा येऊ शकतो.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीतील सातवा स्वामी पीडित असेल तर असे लोक प्रेम करतात. पण त्या प्रेमाला लग्नापर्यंत नेण्यात अपयशस्वी ठरतात. अथक प्रयत्न करूनही अशा प्रेमी युगालांना प्रेमविवाहात यश मिळत नाही. अशा परिस्थितीमुळे दोन प्रियकरांमध्ये ब्रेकअप होते. जन्म कुंडलीतील सहावा,आठवा किंवा बारावा भावात पाचवा स्वामी आणि सप्तम स्वामी दोन्ही स्थित असेल तर अशा व्यक्तींना काही प्रमाणात प्रेमप्रकरणात यश मिळते.
परंतु तो पूर्णतः यशस्वी होऊ शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि शेवटी ब्रेकअप होते. जर कुंडलीत पंचम आणि सप्तम दोन्ही स्वामी पीडित असेल तर अशा व्यक्तीची फसवणूक होते आणि प्रेमात अपयश मिळते. दुसरीकडे मंगळ सूर्य आणि शनी यापैकी कोणतेही ग्रह उच्च राशीत असतील तर उच्च राशीतून त्यांची दृष्टी पाचव्या भावात आणि सातव्या भावात पडल्यास प्रेम जोडीदारांसाठी ते चांगले नाही.
कुंडलीतील या स्थितीमुळे ब्रेकअप होते. ज्योतिष शास्त्रात जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम स्वामी असल्यामुळे शुक्र पीडित असेल तर अशा व्यक्तीला प्रेम जीवनात यश मिळत नाही. अशा लोकांचे प्रेम एकतर्फी असते आणि कायमस्वरूपी नातेसंबंधात राहू शकत नाही. दुसरीकडे राहू आणि केतूचा प्रभाव पाचव्या स्थानी असल्यास स्वामी वर्ण असेल तर चांगले नाही. त्यामुळे नातेसंबंधही तुटतात.
जर कुंडलीत राहू आणि केतू व चंद्राचा योग असेल तर प्रेम जीवनात अडचणी येऊ लागतात. चंद्रामुळे विचार बदलू लागतात आणि एखादी लहान गोष्टी मोठे होऊन वाद निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ब्रेकअप खूप लवकर होते.याउलट कुंडलीतील सहाव्या आठव्या आणि बाराव्या भावात चंद्र कमजोर स्थितीत असेल तर अशा स्थितीत ब्रेकप लवकर होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.