नाशिक मधील स्वामी समर्थ मठातील स्वामी भक्ताला आलेला थरारक स्वामी अनुभव नक्की ऐका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तहो आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत एक अतिशय चित्त थरारक असा अनुभव. बघा स्वामी सर आपल्या पाठीशी असतील तर नक्कीच आपण कुठल्याही संकटातून बाहेर येतोच येतो.

परंतु त्यासाठी स्वामींवरचा असलेला विश्वास हा देखील तितकाच मजबूत असायला लागतो हे तितकच खरं आहे. तर बघा आपण रोजच्या रोज सेवा त्यासोबत उपाय तोडगे आणि स्वामी भक्तांना आलेले स्वामींचे अनुभव घेऊन येत असतो. जर माहिती आवडली तर तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा त्याचप्रमाणे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरत जाऊ नका.

तर बघा आजचा जो अनुभव आहे तो त्या ताईंच्या शब्दातच मी वाचून दाखवत आहे. आता वाचायला सुरुवात करते. तर बघा हा अनुभव ज्यांचा आहे त्यांचा नाव आहे शोभा शांभव पगार मेशी तालुका देवळा जिल्हा नाशिक नाशिक मधला हा अनुभव आहे. तर आता मी त्यांच्या शब्दात वाचून दाखवते.

तर बघा त्या म्हणतात की श्री स्वामी समर्थ माझा इयत्ता नववी मध्ये शिकणारा नातू त्याच्या वडिलांना गावात सोडवण्यासाठी गेला होता. दुचाकी घेऊन गेला होता वडिलांना सोडवल्यानंतर तो पुन्हा घरी यायला निघाला. त्यावेळेस त्याच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्याच्या गाडीला जोरदार खडक दिली. आणि त्याची गाडी तब्बल सहा ते सात फूट उंच उडून एका रस्त्यावर फेकली गेली.

आता हा अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्याच्या अंगावरचा थरकाप होईल. नाशिक येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी भक्ताक्षणी सांगितलं की परिस्थिती फार गंभीर आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता असं सांगितलं की त्याच्या संपूर्ण डोक्यात रक्त पसरल आहे त्यामुळे लगेचच तातडीने आपल्याला ऑपरेशन करावे लागेल.

तरीही परिस्थिती खूप नाजूक आहे परिस्थिती गंभीर आहे असं डॉक्टरांनी सांगितल. आता असं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यासमोर अंधार पसरला. आणि काय करावं ते काहीही सुचत नव्हतं.

तातडीने ऑपरेशन करायला सुरुवात झाली. त्यात मी संपूर्ण संपूर्णतः अडाणी मला लिहिता वाचता काहीही येत नाही आता हा जो अनुभव आहे तो देखील मी माझ्या नाती कडून लिहून घेतला आहे. मी तिला सांगितलं आणि तिने तिच्या शब्दांमध्ये लिहिलं आहे. तर मला फक्त नाव घेता येत होतं श्री स्वामी समर्थ हा जप करता येत होता. परंतु त्या व्यतिरिक्त मला कुठलीही सेवा करता येत नाही.

कारण मला वाचनच करता येत नाही. आणि अडाणी असल्यामुळे डॉक्टर काय म्हणतात डॉक्टरांचे म्हणणं काय किंवा मग रिपोर्ट काय सांगतात यातलं मला काही कळत नव्हतं. परंतु मला एवढं मात्र कळत होतं की मी जर स्वामींचं नाव घेतलं तर नक्कीच माझ्या नातवाला या संकटातून मी बाहेर काढू शकते. मी त्याला परत आणू शकते हा माझा ठाम विश्वास होता. आणि त्यामुळे मी सगळं काही सोडलं. काहीही विचारपूस केली नाही मी फक्त स्वामींसमोर जाऊन बसली.

आणि स्वामींसमोर दिवा लावून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायला घेतला. कारण त्यापलीकडे मला काहीही करणं शक्य नव्हत. श्री स्वामी समर्थ महाराजांवर माझी अठल श्रद्धा होती. आणि त्यामुळे स्वामींवरचा विश्वास माझा कधीही कमी झाला नाही. मागे इथून मागेही कधी कमी झाला नव्हता.

आणि आता अशी गंभीर परिस्थिती आली तर तेव्हा तर मुळीच कमी झाला नाही. उलट मी स्वामींना अजून सांगत होते की स्वामी तुमची प्रचिती मला दाखवा आणि आता माझ्या नातवाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे. तर तुम्ही आमच्या मदतीसाठी धावून या असं मी वारंवार स्वामींना सांगत होते.

श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्राचा मनोभावे मी जप सुरू केला. सुमारे पाच तास नातवाचे ऑपरेशन सुरू होते. माझ्यासारख्या अडाणी स्त्रीने केलेल्या नामजपाने चमत्कार घडला. आणि माझा नातू सुखरूप परतला. आता तो पूर्ण बरा झाला आहे. या ऑपरेशन दरम्यान त्याच्या डोक्यातल्या डोक्यातली जी कवटी होती. त्याला ती संपूर्णपणे उकलून तिचं ऑपरेशन केलं होत.

आणि त्याची वाचण्याची शक्यता ही डॉक्टरांनी कमी सांगितलेली होती. आणि तरीही अशा गंभीर परिस्थितीतून तो जर बाहेर आला असेल तर तो फक्त आणि फक्त स्वामींमुळे आला हा माझा ठाम विश्वास आहे. डॉक्टरांचे प्रयत्न तर होतेच परंतु माझ्यासाठी मला म्हणजे माझ्यासाठी फक्त एवढेच मला माहित आहे की माझ्यासाठी स्वामी धावून आले. आणि स्वामींनी त्या डॉक्टरांचे हात चालवले त्याचा ऑपरेशन केल.

त्या संपूर्ण वेळात स्वामी त्याच्या पाठीशी उभे होते. आणि त्याला सुखरूप बाहेर घेऊन येणारे देखील माझे स्वामीच होते हा माझा ठाम विश्वास आहे. आणि ही स्वामींची लीला आहे हे मी मानते. आणि नक्कीच माझ कुटुंबीय देखील हीच मानत आहे. आणि स्वामींची कृपा जशी माझ्या कुटुंबावर होती तशी सगळ्यांच्या कुटुंबात कुटुंबावर राहो हीच एका अडाणी आजीची इच्छा आहे.

आणि नक्कीच ही इच्छा स्वामी पूर्ण करतील. हाही माझा भरोसा आहे आणि एवढं म्हणून त्या आजींनी त्यांचा अनुभव थांबवला आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *