३० वर्षानंतर होळीला शनि-गुरूचा योग, ४ राशींना होळी रंगवणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

फाल्गुन महिना सुरू होताच वाट असते ती होळीची पुरणपोळी आणि छान छान रंग या रंगांची उधळण झाली की आयुष्य असच रंगमय व्हाव अस सर्वांनाच वाटत. होळी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहेच मात्र या दिवशी केलेल्या उपायांमुळे काही समस्या दूर होतात. त्यात ग्रहांचे पाठबळ असल्यास मोठा फायदाही होतो.

यावेळी तब्बल तीस वर्षानंतर पोळीला शनी गुरुचा योग जमून येतोय आणि याच पाठबळ काही खास राशींना येणार आहे.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या खास राशी आणि काय सांगते ग्रहमान. यावर्षी होळी पौर्णिमा सहा मार्चला आहे. त्यामुळे हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार ही खास आहे.

कारण ३० वर्षानंतर शनिदेव आपल्या स्वराशीत विराजमान झालेत. २० वर्षानंतर गुरु ग्रह आपल्या मीन राशि मध्ये आहे. याव्यतिरिक्त कुंभ राशीत सूर्य आणि बुध एकत्रित त्रिग्रही योग तयार होतोय. जवळपास तीस वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे काही राशींना ग्रहांचा पाठबळ मिळणार आहे.

१) वृषभ रास- या राशींच्या व्यक्तींना होळीच्या दिवशी तयार होणारा ग्रहांचा योग फलदायी ठरणार असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यावेळी मोठा फायदा होऊ शकतो.

२) मिथुन रास- या राशींच्या व्यक्तींना प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. शिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा यश प्राप्त होऊ शकत. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

३) वृश्चिक रास- ग्रहांच्या युतीमुळे वृश्चिक राशींच्या वाहन आणि घर खरेदी करण्याचे सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. तर या काळात तुमचे एखादा स्वप्न पूर्ण होऊ शकत. उद्योग धंदा करणारे व्यक्तींना या काळात इच्छित लाभ होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसाठी ग्रहांची साथ सुद्धा मिळेल. गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ तो म्हणला जातोय.

४) कुंभ रास- कुंभ राशीचा सूर्य, शनि आणि बुध त्रिग्रही योग तयार होत आहे. तर या दुर्लभ योगामुळे शुभ परिणाम दिसून येतोय. कुंभ राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरू असताना देखील या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल आणि कामात यशही प्राप्त होईल. जवळपास तीस वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती तयार होत असल्याने या राशींना होळी चांगलीच रंगवणार असल्याचा पाहायला मिळतय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *