नमस्कार मित्रांनो.
मंडळी होळीच्या आधी येणारे एकादशीला आम लकी एकादशी असे म्हणतात. यावर्षी फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी तीन मार्च २०२३ रोजी आहे आणि चार मार्च २०२३ रोजी सकाळी ६:४८ मिनिटांनी ते ०९:०९ मिनिटांनी या वेळेत व्रत केले जाईल. ही स्थिती श्रीहरींना अत्यंत प्रिय आहे.
जगाच्या स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आम लकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करावी असे मानले जाते. त्यामुळे संसारिक सुख व मोक्ष प्राप्त होते. आमलकी एकादशीला राशीनुसार उपाय आणि पूजा केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येईल. तुम्हीसुद्धा राशीनुसार अशी पूजा करा. चला तर मग जाणून घेऊया.
१) मेष रास- मेष राशीच्या लोकांनी आमलकी एकादशीला एकाक्षी नारळ घ्यायचा आहे तो नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेसाठी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला धनस्थानावर ते नारळ ठेवावे. असे मानले जाते की यामुळे घरात लक्ष्मी वास करते आणि पैशाची समस्या दूर होते.
२) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांसाठी आमलकी एकादशीच्या दिवशी घरामध्ये आवळ्याचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने कामाच्या ठिकाणी आशीर्वाद मिळेल संपत्ती मिळवण्याच्या नवीन संधी येतील.
३) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांनी आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला पाणी द्यावे आणि सात वेळा प्रदक्षिणा केल्यावर कच्चा सुतामध्ये हळद टाकून झाडावर गुंडाळा. या उपयोगामुळे नोकरीचा मार्ग सुखकर होईल.
४) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख शांतीचा अभाव असेल तर आमलकी एकादशीला भगवान विष्णूंना आवळ्याच्या पाण्याने अभिषेक करावा.यादरम्यान “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे पती-पत्नी मधील वाद दूर होईल.
५) सिंह रास- तुमच्या कामात जर अडथळे येत असतील तर आमलकी एकादशीला सिंह राशींच्या लोकांनी श्रीहरी विष्णूंना चंदनाचा टिळक लावावा व आवळा अर्पण करावे आणि नंतर स्वतः वैष्णव तिलक लावा आणि आवळा सोबत ठेवून ज्या शुभकार्यासाठी जायच आहे त्या शुभकार्यासाठी जायला निघावे.
६) कन्या रास- रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी आमलकी एकादशीला आवळ्याची पेस्ट लावावी आणि नंतर पाण्यात आवळा टाकून स्नान करावे. अस म्हटल जाते की या उपायाने गंभीर आजारही दूर होतो.
७) तुळ रास- तूळ राशींच्या व्यक्तींनी आमलकी एकादशीला १०८ आवळ्याचे फळ दान करावे. जर व्यवसायात कष्ट करूनही लाभ होत नसेल तर असे केल्याने व्यवसाया फलदायी होईल.
८) धनु रास- आमलकी एकादशीला २१ पिवळ्या फुलांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. या उपायाने विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल.
९) मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींनी या दिवशी उपवास करावा आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होईल. आमलकी एकादशीचे व्रत केल्यास पुण्य प्राप्त होईल.
१०) कुंभ रास- आमलकी एकादशीला कुंभ राशींच्या लोकांनी मोक्ष प्राप्तीसाठी केशर मिश्रित पाण्याने लक्ष्मीनारायणाला अभिषेक करावा. नंतर विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे.
११) मीन रास- मीन राशीच्या लोकांनी आमलकी एकादशीला श्रीहरीला एकवीस हळद अर्पण करा आणि नंतर एका पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दारावर टांगून ठेवा. यामुळे वाईट गोष्टींचा नाश होईल आणि घरात सुख-समृद्धी नांदेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.