नमस्कार मित्रांनो.
तशी तर तुम्ही भगवान शिव भगवान श्रीकृष्ण भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिर पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासु सुनेचे मंदिर पाहिले का. तुम्हाला नक्कीच अशा प्रकारच्या मंदिराबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूर मध्ये आहे. आणि या मंदिराच्या निर्मितीची कथा आणि रोमांचक आहे.
मग काय आहे ती कथा आणि कुठे आहे हे मंदिर चला जाणून घेऊया. हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार अनेकांना वाटलं असेल की या मंदिरात सासु सुनेची पूजा होती की काय. पण तसं नाही या मंदिरात भगवान विष्णूंचीच पूजा होते.
या मंदिराचे २ भाग आहेत एक सासूचा आणि एक सुनेच मंदिर सासूच्या मंदिरा पेक्षा थोड लहान आहे. दहाव्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरलेल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशा प्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आल आहे.
या मंदिरात एकाच मंचावर त्रिमूर्ती म्हणजे ब्रम्हा विष्णू महेषाची मूर्ती आहे. तर दुसऱ्या मंचावर राम बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असं म्हणतात की मेवाड राजघराण्याच्या राजमातासाठी भगवान विष्णूंच हे मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाच मंदिर तयार करण्यात आल.
या सासू-सुनांसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं म्हणून याला सासु सुनेचा मंदिर असं नाव पडल. आणखीन एक मान्यता अशी सुद्धा आहे की अकराशे वर्षांपूर्वी या मंदिराचा निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होत. राजमाता या भगवान विष्णूंच्या भक्त होत्या.
त्यामुळे आधी भगवान विष्णूंचे मंदिर तयार करण्यात आल. त्यानंतर राजा महीपालच लग्न झाल. राजा महिपालची पत्नी ही भगवान शिवाची भक्त होती. त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचे मंदिर तयार करण्यात आले. सासु सुनेचा मंदिर म्हणून ओळखण्यात आलेल्या या मंदिरात 32 मीटर उंच आणि २२ मीटर रुंद प्रतिमा आहे.
या प्रतिमेला हजारो भुजा आहेत. त्यामुळे हे मंदिर सहस्रा बाहू मंदिर म्हणूनही ओळखले जात. भगवान विष्णू आणि भगवान शिवांच्या मंदिराच्या मध्ये भगवान ब्रम्हांचा ही एक मंदिर आहे. आता अशीही एक मान्यता आहे की ते सगळ्यात आधी भगवान श्रीहरी विष्णूंचे मंदिर बांधण्यात आल होत. त्यातल्याच प्रतिमेला हजारो बाहू आहेत आणि म्हणूनच या मंदिराला सहस्त्रबाबू या नावाने ओळखल जात होत.
पण कालांतराने त्या शब्दाची फोड करून लोक त्याला सास बहू मंदिर म्हणू लागले. असंही म्हटल जात की, या मंदिराच्या जवळपास मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती. आणि जेव्हा या परिसरात मुघलांनी ताबा मिळवला तेव्हा हे मंदिर वाळू आणि चूण्याच्या मदतीने बंद करण्यात आल.
जेव्हा इंग्रजांचा राज्य आल तेव्हा हे मंदिर पुन्हा खुल करण्यात आल. मित्रांनो तुम्ही कधी राजस्थानच्या ट्रीपला गेला तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि सासु सुनेच्या मंदिरात जाऊन आलो असा आल्यावर सगळ्यांना सांगायला विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.