शनीच्या साडेसातीत रुद्राक्ष करतो रक्षण, कधी व कसा वापरावा? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला शनीची साडेसाती चालू आहे का? किंवा तुम्हाला कुंडलीमध्ये शनिच्या संबंधात काही दोष आहे का? मग रुद्राक्ष तुमच रक्षण करू शकतो. पण तो कधी वापरायचा? कसा वापरायचा? चला जाणून घेऊयात.

रुद्राक्ष ही अशी एकमेव गोष्ट आहे जी ग्रह नियंत्रण आणि मंत्र जपासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनी पीडा सुद्धा शांत होऊ शकते. रुद्राक्षाचा वापर करून शनी कृपा ही मिळवता येते. रुद्राक्षाची शक्तीच अशी आहे की जो त्याचा योग्य वापर करतो तो सर्व प्रकारच्या संकटावर बात करतो. मात्र कोणी ते नियमानशिवाय परिधान केल तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.

याशिवाय नियमानुसार रुद्राक्ष धारण केल्यास शनीच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांचा अश्रू पासुन झाली आहे. अनादिकाळापासून भगवान शंकर अलंकार म्हणून परिधान करतात. रुद्राक्ष अशी एकमेव गोष्ट आहे जी ग्रह स्थितीवर नियंत्रण आणि मंत्र जप साठी उत्तम मानली जाते. शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राक्षचा नियमित वापर करावा.

मात्र त्याचे नियम जाणून घ्यावेत. जसं की नोकरी रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करण शुभ मानले जाते. एकाच वेळेस तीन दहा मुखी रुद्राक्ष धारण करणे अतिशय फायदेशीर ठरते. हा रुद्राक्ष शनिवारी लाल धाग्यात घालून गळ्यात घाला. या उलट कुंडलित शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते टाळण्यासाठी एक मुखी रुद्राक्ष आणि अकरा मुखी रुद्राक्ष असे एकत्र धारण करणे शुभ मानले जाते.

जर तुम्हाला साडेसाती सुरू असेल आणि आरोग्याच्या तक्रारी असतील तर आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी गळ्यात आठ मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. तसंच पंचमुखी रुद्राक्ष वापर नाही लाभदायी ठरते. रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी शनी आणि शिवाच्या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुद्राक्ष प्रत्येकाच्याच प्रकृतीला मानव तोच अस नाही.

त्यासाठी आपले ग्रह बळ चांगले असावे लागते. आणि म्हणूनच रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा. पण रुद्राक्षच्या माळेवर तुमच्या इष्टदेव त्याच्या मंत्राचा जप करायला मात्र तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाचा सल्ला घेण्याची गरज नाही.

रुद्राक्षच्या माळेवर केलेला जप कितीतरी पट लाभदायक ठरतो. तुमचे गुरुदेव असतील किंवा तुमचे इष्ट देव असतील किंवा तुमची कुलदेवता असेल त्याचा कोणाचा जप तुम्ही नियमित करत असाल तो जर तुम्ही रुद्राक्षच्या माळ्यावर केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *