नमस्कार मित्रांनो.
नवनागांपैकी एक म्हणजे शेषनाग होय. याला देवांचा आणि मानवाचा मित्र म्हणतात. श्री विष्णूचा अंशवतार म्हणूनही त्याच्याविषयी सांगितले जातात. शेषनाग हा कश्यप ऋषींच्या पत्नी कद्रु हिचा मोठा पुत्र असल्याचे भगवान पुरानात आढळते. तो विश्वासा पहिला साप मानला जातो. कारण तो सर्वप्रथम जन्माला आला आणि या जगातल्या पहिला सर्व शेषनाग बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शेषनागांच्या जन्मापासून ते देवांच्या जन्मापासून ते देवांचे क्षयन होण्यापर्यंत आणि अवतार घेण्यापर्यंत सविस्तर वर्णन शास्त्रात मिळत. शेषनाग म्हणजे हजार फणा असलेल्या साप सापांची उत्पत्ती प्रजापती कश्यपांची पत्नी कद्रुपासुन झाली. जिला पुत्र म्हणून हजार रुपे मिळावी अशी इच्छा होती. शेषनाग हा त्यांचा मोठा मुलगा शास्त्रानुसार शेषनागाची कथा आधी जाणून घेऊया.
कश्यप ऋषींना दोन पत्नी होत्या एक कद्रु आणि दुसरी विनिता. कद्रूने सापांना जन्म दिला तर विनीताने पक्षांना जन्म दिला. कद्रूला विनीताचा हेवा वाटायचा. एकदा तिने विनीताला एका खेळात फसवल आणि तिला गुलाम बनवल. तेव्हा हे शेषनाग आला हे कळल की आई भावांनी मिळून काकू विनिता सोबत कट रचला तेव्हा त्याला खूप वाईट वाटल. तेव्हा त्याने आई आणि भावांची साथ सोडली आणि तो गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करू लागला.
शेषनागाच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्माजी प्रकट झाले. आणि ब्रम्हाजीनी त्याला वरदान दिल की तुझी बुद्धी कधीच धर्मापासून विचलित होणार नाही. नंतर शेषनाग क्षीरसागर येथे पोहोचले. तेथे त्याने भगवान विष्णूचे सेवा केली. भगवान शेषनागाना म्हणाले पृथ्वी सतत फिरत राहते म्हणून ते आपल्या फण्यावर अशाप्रकारे घाल की ती स्थिर होईल.
तेव्हापासून शेषनाग पृथ्वीचा वजन वाहून नेत असल्याच सांगितले जातात. शेषनाग हजार फणा असलेला साप आहे. त्यांना कदृनंदन, अनंत, आदिश, कश्यप इत्यादी नावांनी ओळखल जात.
वासुकी,तक्षक, कालिया, शंख, महापद्म,पद्म,कर्कोटक, धनंजय इत्यादी सह आणि इतर सापांचे शास्त्रामध्ये वर्णन आढळते. हे सर्वजण शेषनागाचे लहान भाऊ आहेत. शेषनागाने भगवान विष्णू सोबत अनेक अवतार द्वापार मध्ये बलराम म्हणून अवतरले होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.