कोणत्या प्रकारच्या माळेने जप केल्यास काय लाभ होतो.? घ्या सविस्तर माहिती जाणून.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

कलियुगामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक साधा सोपा सरळ मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे नामस्मरण करणे. “हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी”या मंत्राचा नामस्मरण करत करत आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो ईश्वर आपल्यापर्यंत पोहोचतो आपल्या मधल आणि ईश्वरा मधल अंतर निघून जाते.

पण हेच नामस्मरण करताना ते वेगवेगळ्या प्रकारच्या माळेने केले जाते. बऱ्याचदा गोंधळ असतो की कोणत्या प्रकारची माळ वापरावी. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारच्या माळेचा वापर केला असता कशा प्रकारचा लाभ होतो आणि त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेप्रमाणे कोणत्या जप माळेची निवड करायला हवी.

मित्रांनो सुरुवात करून या रुद्राक्षाची जप माळेपासून हे सगळेजण सरासपणे वापरतात नामस्मरण करताना ज्या विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात. त्यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर अधिक दिसून येतो. रुद्राक्षेची अनेक प्रकार असतात. एक मुखी,पंचमुखी असे बरेच मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्रक्षाची माळ वापरली तरी चालते.

गणपती, गायत्री देवी, दुर्गादेवी, महादेव शिवशंकर, कुमार कार्तिकीय आणि पार्वती माता यांचे नामस्मरण करताना किंवा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणे लाभदायक ठरत. याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने सुद्धा हृदयरोग, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. तसेच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मित मृत्यू टाळण्याची मोठी ताकद सुद्धा असते आणि म्हणूनच तुम्हाला यावेळी भीती वाटत असेल किंवा तुमचे मन बेचैन राहत असेल तर तुम्ही नामस्मरण करताना रुद्राक्षाची माळ वापरू शकता.

आता दुसरे एक माळ असते ती म्हणजे तुळशीची माळ नामस्मरण जेवढे जास्त करता येईल तेवढे जास्त चांगल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात आंधळ्याने पाणी भरावा तस नामस्मरण कराव. भांड भरल किती आणि रिकामा किती हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो. तस सतत नामस्मरण करत राहा.

श्रीहरी विष्णू, श्रीराम श्रीकृष्ण, श्री सूर्यनारायण यांच नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी. वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ दिसते. तुळशीची माळ घातल्याने शरीर आणि मन शुद्ध होत.

त्यानंतर माळेचा एक प्रकार आहे स्पटिकाची जप माळ नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्त्व असत. दुर्गादेवीच्या सर्व रूपांचे नामस्मरण करण्यासाठी स्फटिकाचे जपमाळ वापरावी. देवीच्या नऊ ही रूपांचे जप करताना ही माय लाभदायक ठरते. याशिवाय लक्ष्मीदेवी, माता सरस्वती यांचा नामस्मरण करण्यासाठी सुद्धा स्पटिकांच्या माळेचा वापर केला जातो.

स्फटिकाची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही स्पटिकाच्या माळेवर माता लक्ष्मीचे नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर रक्त संबंधितचे आजार,रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा स्पटिकांची माळ गळ्यात घालण्याचा सल्ला दिला जातो.

त्यानंतर शुभ्र चंदनाची जप माळ नामस्मरण कुठेही करता येते स्थळ काळजी त्याला बंधन नाही. नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नामस्मरण करताना आपल मन पवित्र हव, प्रसन्न हव. नामस्मरणाला किंवा नाम जपला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवाच्या नामस्मरणासाठी तुम्ही शुभ्र चंदनाची माळ वापरू शकता.

देवी देवतांच्या पूजनाच्या वेळी चंदन वापरतोच की वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास शुभ्र चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध होत, ताजतवान होत मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यानंतर रक्तचंदनाची माळ दुर्गा देवीचे नामस्मरण करण्यासाठी सुद्धा रक्तचंदनाच्या माळेचा वापर होतो आणि ती लाभदायक सुद्धा ठरते.

त्याचबरोबर रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही होतो. मंडळी तर नामस्मरण कुठल्याही माळेने करा पण नामस्मरण नक्की करा. नामस्मरण केल्याने आपल्यामधील आणि ईश्वरा मधील अंतर कमी होत. पण हे नुसत ऐकून उपयोग नाही तर त्याचा अनुभव घेऊन पाहायला हवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *